06/01/2017
जय हिंद ....!!
जय राष्ट्रवीर ...!!
एक अवडलेला लेख ....!!!!!!!!
गाडीतून फिरताना प्रत्येक गावात एक समानता दिसून आली,
ती म्हणजे प्रत्येक चौकात गर्दीने दिसणारे *फ्लेक्स बॅनर व त्यावर खालच्या बाजूला दिसणारे ऊर्जावान तरुणांचे फोटो,* (वय 15 ते 35 जवळपास).....!!!
महाराष्ट्रात कुठेही चौकात असे दृश्य कॉमन झाले आहे...
ते बॅनर असतात आदरणीय आबा-आप्पा- दादा- बाप्पु- भैय्या- आण्णा-भाऊ- नाना- तात्या- साहेब- मालक-शेठ- सरकार, तसेच इत्यादी मान्यवरांचे.....!!
या सर्व आदरणीय नेत्यांना एवढीच विनंती आहे की;
बॅनर च्या खालच्या बाजूला छोटया छोट्या फोटोची जी लाईन असते त्यातील 90% मुले ही बेरोजगार असतात,
*त्या गरीब बेरोजगार तरूणांचे आयुष्य चौकातील बॅनर वरच वाया न जाता त्यांना तुमच्या महानतेतुन कुठलातरी रोजगार मिळवुन द्यावा,*
*फक्त एवढं छोटसं क्षुल्लक मात्र पुण्यवान कार्य आपल्या हातून घडावं या मनपूर्वक शुभेच्छा !!!*
*स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो देऊन*
बॅनर मध्ये खालच्या बाजूला झळकणारे ते तरुण आयुष्यात कुठवर आणि कुणाच्या जीवावर जगणार आहेत??
त्यांच्या कुटुंबियांचा उदर निर्वाह करु शकणार आहेत का ते ????
*कसल्या तरी कोणत्या तरी प्रभावाने, आशेने ते तुमच्याकडे आलेले आहेत,*
त्यांच्या आयुष्याचे सोने जरी नाही करता आले तर कचरा तरी होऊ नये हीच इच्छा...!!
बेरोजगार तरुणांची फौज समाजात भरपूर आहे, कोणालाही आमिष दाखवून सहज कामाला लावता येते, आणि सरावलेल्या मंडळींना ते आजिबात अवघड नाही...!!!
*जर आपण आधीच अशा तरुणांची इन्कम/अर्निंग/उत्पन्नाची तरतूद करणार असाल तर, मग त्या तरुणांनी खुशाल कोणाचेही झेंडे घेऊन फिरावे,*
*व्हॉट्सअपवर नेत्यांची नावे लावून पोस्ट फॉरवर्ड करत बसणे ही काळाची गरज असली तरी,*
आधी कुटुंब, शिक्षण, दवाखाना, बचत, व्यवसाय, नोकरी याची सोय करणेही गरजेचे आहे, त्या शिवाय कुटुंब चालू शकते काय???
🙏🏼