Agricultural Development Trust,Baramati

Agricultural Development Trust,Baramati Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Agricultural Development Trust,Baramati, At Post. Shardanagar tal. Baramati Dist. Pune. INDIA pin 413102, Baramati.

09/09/2026

क्रीडा क्षेत्रात शारदानगरचा डंका; गुणवंत खेळाडूंचा सत्कार, १२ राष्ट्रीय खेळाडूंना शिष्यवृत्ती

बारामती : ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित शारदाबाई पवार महिला कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शारदानगर येथे शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मध्ये क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत खेळाडूंचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ क्रीडा शिष्यवृत्ती जाहीर झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

मल्लखांब क्रीडा प्रकारात महाविद्यालयाची खेळाडू कु. श्रुती संतोष गुळवे हिने अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत रौप्यपदक तसेच विद्यापीठाच्या खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले. तसेच कु. प्रतीक्षा आप्पासो पाटील हिने महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवातील व्हॉलीबॉल स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल दोन्ही गुणवंत खेळाडूंचा संस्थेच्या विश्वस्त-सचिव सुनंदा पवार यांच्या हस्ते शारदा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स च्या भव्य मल्टीपर्पज हॉलमध्ये सत्कार करण्यात आला. तसेच महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या राष्ट्रीय स्तरावरील १२ खेळाडूंना महाविद्यालयात मोफत प्रवेश व शिष्यवृत्तीच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी सुनंदा पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आपल्या संस्थेतील उपलब्ध अत्याधुनिक क्रीडांगणे,जिम, जलतरण तलाव,सिंथेटिक ट्रॅक,इनडोअर हॉल इ. सोयी- सुविधांचा पुरेपूर वापर करून सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि शिस्तीच्या जोरावर क्रीडा क्षेत्रात विद्यार्थी विद्यार्थिनींना आपले नाव उज्ज्वल करा, तसेच क्रीडा कोट्याअंतर्गत उपलब्ध विविध शासकीय नोकरीच्या संधी व योजनांचा लाभ घेऊन आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करावेत,असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.रा.बा. देशमुख, शारीरिक शिक्षण संचालक प्रा.आर.एस. देवकर, क्रीडा समिती सदस्य डॉ.जयवंत राठोड तसेच क्रीडा विभागातील सर्व खेळाडू उपस्थित होते.

🇮🇳 Celebrating the Spirit of IndependenceA glimpse of the vibrant Independence Day Celebration at Agricultural Developme...
15/08/2026

🇮🇳 Celebrating the Spirit of Independence

A glimpse of the vibrant Independence Day Celebration at Agricultural Development Trust, Baramati.

The celebration brought together our students, faculty, staff, and the entire ADT family to honour the spirit of freedom, unity, patriotism, and nation-building.

Sharing some memorable moments from the celebration that reflect the pride, enthusiasm, and spirit of togetherness of the entire ADT family.

Jai Hind! 🇮🇳

JaiHind ProudIndian

14/08/2026
कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा ‘डॉ. सी.डी. मायी कृषीतज्ज्ञ’ पुरस्कार बारामती येथील ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ...
18/07/2026

कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा ‘डॉ. सी.डी. मायी कृषीतज्ज्ञ’ पुरस्कार बारामती येथील ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांना ना. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ डॉ. सी.डी. मायी, ज्येष्ठ कृषी पत्रकार सुधीर भोंगळे, कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी, श्रीराम काळे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘राजेंद्र पवार आणि ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट चे यांचे कृषी क्षेत्रातील कार्य आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे डॉ. सी.डी. मायी यांच्या नावाने असलेला पुरस्कार त्यांना मिळत असल्याचा मनापासून आनंद आहे.
शेतीमध्ये जमीन हा महत्त्वाचा घटक आहे. दर्जेदार उत्पादनासाठी माती परीक्षण आवश्यक आहे. पाण्याच्या संदर्भात काम करण्याची गरज आहे. ठिबक सिंचन, ड्रोनद्वारे फवारणी हेही घटक शेतीमध्ये महत्त्वपूर्ण ठरत आहेत. या सर्व तंत्रांचा वापर शेतीमध्ये केला तरच एकरी उत्पन्न वाढेल आणि शेतकरी समृद्ध होईल. राजेंद्र पवार आणि त्यांचे ट्रस्ट यासंदर्भात सातत्याने शेतकऱ्यांचे मार्गदर्शन करीत आहे, ही समाधानाची बाब आहे, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले.

मा राजेंद्र पवार यांनी संस्थेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या वाटचालीचा मागोवा घेतला मा शरद पवार आणि मा आप्पासाहेब पवार यांचे संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थेने भारतातील पहिले ठिबक सिंचनाचे मॉडल, मुक्त संचार गोठा, सायलेज मुरघास ते संस्थेचे विश्वस्त मा प्रतापराव पवार यांचे पुढाकारातून सुरू असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान यासह गेली ५७ वर्षांचा संस्थेने केलेला कार्याचा मागोवा मा राजेंद्र दादा यांनी मांडला.

06/06/2026
17/05/2026
पुण्याच्या महापौर मल्लखांब चषक स्पर्धेत बारामतीच्या शिवजीत वळकुंदेची सुवर्ण कामगिरीअॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, शारद...
15/05/2026

पुण्याच्या महापौर मल्लखांब चषक स्पर्धेत बारामतीच्या शिवजीत वळकुंदेची सुवर्ण कामगिरी

अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, शारदानगर (बारामती) अंतर्गत कार्यरत असलेल्या शारदा स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी पुण्यात झालेल्या महापौर मल्लखांब चषक स्पर्धेत दमदार कामगिरी करत बारामतीचे नाव उज्ज्वल केले आहे. संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या या क्रीडा सुविधांमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संधी उपलब्ध होत आहेत.

पुण्यात झालेल्या या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील १८ संघांतील ५४ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. बारामतीच्या दोन मल्लखांबपटूंनी विशेष यश संपादन केले. शिवजीत संतोष वळकुंदे याने १४ वर्षांखालील गटात सुवर्णपदक पटकावत प्रथम क्रमांक मिळवला, तर वेदांत गाढवे याने १२ वर्षांखालील गटात रौप्यपदकाची कमाई केली. दोघांचीही ‘बेस्ट ऑफ सिक्स’ फेरीसाठी निवड झाली होती.

यामध्ये शिवजीत वळकुंदे याने पुन्हा एकदा उत्कृष्ट कामगिरी करत संपूर्ण स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले आणि ‘सर्वोत्कृष्ट मल्लखांबपटू’ हा मान मिळवला. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते त्याला ट्रॉफी आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

शिवजीतला प्रथम क्रमांकासाठी जाहीर करण्यात आलेला ११ हजार रुपयांचा धनादेश, तसेच ‘बेस्ट ऑफ सिक्स’ सर्वोत्कृष्ट मल्लखांबपटू म्हणून १५ हजार रुपयांचा धनादेश शारदानगर येथे संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

प्रशिक्षक सोमनाथ कोठावळे यांनी या दोघांना मार्गदर्शन केले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे, मानव संसाधन प्रमुख गार्गी दत्ता, समन्वयक प्रशांत तनपुरे, संतोष वाघ, प्राचार्य सूर्यकांत मुंढे आदी मान्यवरांनी खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

12/05/2026

📖🖋️📔📚

Address

At Post. Shardanagar Tal. Baramati Dist. Pune. INDIA Pin 413102
Baramati
413115

Alerts

Be the first to know and let us send you an email when Agricultural Development Trust,Baramati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Agricultural Development Trust,Baramati:

Shortcuts

Share