Baramati Loksabha-Vidhansabha

Baramati Loksabha-Vidhansabha लढाई स्वाभिमानाची...

दी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक सुरेश खलाटे यांची कांबळेश्वर ता: बारामती येथे भेट घेतली. तसेच विविध विषय...
08/04/2026

दी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक सुरेश खलाटे यांची कांबळेश्वर ता: बारामती येथे भेट घेतली. तसेच विविध विषयांवर संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी आपुलकीने विचापूस केली. याबद्दल त्यांचे आभार!

07/04/2026
अंजली दमानिया यांच्यावर टिका करताना भाजपचे सध्याचे आमदार सुरेश धस म्हटले होते की अंजली दमानिया या गोपीनाथ मुंडेसाहेबांचे...
07/04/2026

अंजली दमानिया यांच्यावर टिका करताना भाजपचे सध्याचे आमदार सुरेश धस म्हटले होते की अंजली दमानिया या गोपीनाथ मुंडेसाहेबांचे प्रीपेड सीम कार्ड आहे जे रिचार्ज मारला की नेत्यांवर आरोप करायला सुरू होते.तेव्हा महत्वाची बाब घडली होती ती म्हणजे नितीन गडकरी दुसऱ्यांदा भाजपचे अध्यक्ष होणार होते त्यासाठी पक्षाच्या घटनेत बदलही करण्यात आला होता पण भाजपच्याच दिल्ली, गुजरात आणि महाराष्ट्रातील मंडळींना नितीन गडकरी सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष नको होते. ऐन त्याचवेळी अंजली दमानियानी नितीन गडकरींवर आणि त्यांच्या पूर्ती उद्योगसमूहाबद्दल आरोप केले.आणि याचा फायदा घेत भाजपच्या नेत्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप झालेला अध्यक्ष बनवून २०१४ लोकसभा निवडणूक लढवू नये असा निर्णय घेतला. नितीन गडकरींचे दुसऱ्यांदा अध्यक्ष होण्याचे स्वप्न भंगले.मधला मार्ग म्हणून राजनाथ सिंह अध्यक्ष झाले.

त्यानंतर अंजली दमानिया ऑफिशियली आप पक्षाकडून निवडणूक लढली पण समाजसेवक हाच धंदा बरा हे लक्षात आल्याने पुन्हा त्या सक्रिय झाल्या.अंजली दमानिया यांनी ठरवून राष्ट्रवादीचे अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि आता धनंजय मुंडे रडारवर घेतले.यासाठी त्यांना कुणी रिचार्ज मारला असेल हे सांगायची गरज नाही.

अंजली दमानिया कधीच भाजपच्या मंत्र्यांचे मोठे घोटाळे बाहेर काढत नाही. भाजपच्या छूटपूट घोटाळ्यावर एखादी सौम्य प्रतिक्रिया देऊन हि बाई शांत बसते.बऱ्याच इतर प्रकरणांत जेव्हा सोशल मीडिया आणि मेन्स्ट्रीम मिडिया आघाडी घेतो तेव्हा जेष्ठ समाजसेविका आणि महिला या नात्याने खूपच आघात झाल्यासारखे नैतिकतेच्या चार गोष्टी हि बाई मिडियात येऊन बडबडत असते. आणि जेव्हा या बाईला कुणी फोन लावून जाब विचारतो तेव्हा हि कांगावा करते की मला धमक्या येत आहेत.

या बाईचा सगळ्यात मोठा फेक दावा म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात फरार आरोपींच्या डेड बॉडी कर्नाटक सीमेवर पडलेल्या आहेत.म्हणजे इतक्या लेवलची सनसनाटी हि बाई निर्माण करते. प्रत्यक्षात तिच्या या दाव्यात कसलेही तथ्य निघाले नाही अन् नंतर तिने तिला एक व्हॉट्स ॲप कॉल आला होता म्हणून तिने वेळ मारून नेली. हिला न्यूज18 मराठीच्या विलास बडेंनी एक प्रतिप्रश्न विचारला तर हि रडायला लागली होती आणि पुन्हा तुमच्या चॅनलवर कधीच येणार नाही म्हणून डिबेटमधून पळाली.

अंजली दमानियाच्या माहितीचा सोर्स म्हणजे व्हॉट्स ऍप मेसेजेस असतात.कधीकधी रिचार्ज मारणारी मंडळी या बाईला कागद पुरवतात आणि हि कोर्टात याचिका टाकते.पण उभ्या आयुष्यात हि एकही प्रकरण तडीस नेऊ शकली नाही.सध्या राज्यातील एक धूर्त नेता ह्या बाईला स्वकीय आणि मित्रपक्ष यांचा गेम वाजवण्यासाठी रिचार्ज मारतो आणि माहिती पुरवतो. हि बाई खरात सोबत कोण किती सेकंद बोललं याची अक्युरेट माहिती देते अन् आधी म्हणते एका अनोळखी व्यक्तीने माहिती दिली आणि नंतर म्हणते Cloude AI वापरून माहिती मिळवली.या बाईचे सिलेक्टीव टार्गेट करण्याचे धंदे हे रिचार्ज कोण करतं यावर ठरतं. आजपर्यंत आरोप करून सनसनाटी निर्माण करण्याचे काम या बाईने केले आहे.त्याबदल्यात तिला आर्थिक फायदेही झाले आहेत आणि तसे आरोपही तिच्यावर होतात.

अशा कांगावेखोर समाजसेविकेकडून महाराष्ट्राची सुटका कधी होईल हे देवाच जाणो!

© रविकुमार सुभाषराव

विकी कौशल ने आजपर्यंत खूप कॉमेडी भूमिका केल्या परंतु छावा चित्रपटात त्याला एक संधी मिळाली आणि त्याच्याकडे बघण्याचा दृष्ट...
07/04/2026

विकी कौशल ने आजपर्यंत खूप कॉमेडी भूमिका केल्या परंतु छावा चित्रपटात त्याला एक संधी मिळाली आणि त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, रणवीर सिंग ने अलीकडेच कांतारा चित्रपटावर हास्यास्पद टिप्पनी करूनही धुरंधर नंतर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला मग रितेश देशमुख ला एक संधी द्यायला हरकत नसावी...

केवळ त्याच्याकडे असलेला राजकीय वारसा आपल्याला नापसंत आहे म्हणून त्याच्यावर टीका होतेय कि त्याने महाराजांची भूमिका केलीये म्हणून टीका होतेय हे समजण्यापलीकडचे आहे..

धुरंधर बघायला गेली तेव्हा त्यात राजा शिवाजी चा ट्रेलर बघितला तेव्हाच ठरवले होते हा सिनेमा नक्कीच चांगले यश संपादन करेल... बाकी महाराजांना बघून तीळपापडी होणाऱ्यांच्या टिकेकडे दुर्लक्ष करून आधी सिनेमा बघूनच मग तो चांगला कि वाईट ठरवावा!!

बस इतकेच!

Copyright

03/04/2026

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं विलिनीकरण हा विषय जेव्हा शरद पवार मविआकडून राज्यसभेवर गेले तेव्हाच मागे पडलेला आहे. ऊलट शरद पवारांच्या पक्षात सुप्रीम कोर्टाच्या खटल्यात आपली जमेची बाजू असल्याने नमतं न घेण्याविषयी एकमत दिसतेय. सुप्रीम कोर्टाच्या खटल्यात आता राष्ट्रवादीच्या तीन गटांमुळे म्हणजे एक गट हा तुतारीवाला पवारांचा गट आणि दोन गट हे घड्याळवाल्या गटात पत्रव्यवहारांमधून पडलेले पार्थ-सुनेत्रा पवार वि. पटेल-तटकरे गट, अशा तीन गटांचा विषय रंगणार आहे. तिथे आव्हान याचिकाकर्ता पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार हयात असल्याने आणि अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षातली गटबाजी १६ फेब्रुवारी आणि १० मार्चच्या पत्रांमुळे केंद्रीय निवडणूक आयोगासमोर रेकॅार्डवर आल्याने मोठा युक्तिवाद होणार आहे. इथेच खरं तर गुपित दडलंय. म्हणूनच विलिनीकरणाचा मुद्दा चर्चेत आणला जातोय. जेणेकरून सत्ताधारी राष्ट्रवादीच्या अधिकृत गटबाजीचा विषय दबला जाईल. So, Interesting times ahead. 🗞

03/04/2026
01/04/2026

...आणि खांडजचा वीजपुरवठा सुरळीत झाला!

बारामती तालुक्यातील ग्रामीण भागात सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत होणाऱ्या सक्तीच्या भारनियमनामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सायंकाळी वीजपुरवठा खंडित असल्याने जनावरांची देखभाल, दूध काढणे, स्वयंपाक, घरकाम, विद्यार्थ्यांचा अभ्यास अशा सर्वच बाबी विस्कळीत होत आहेत. याबाबत महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांची नुकतीच भेट घेऊन उपाययोजना करण्याची मागणी केली होती.

श्री. पेठकर यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर महावितरणने एक उपाय सुचविला की, सायंकाळच्या वेळी वीजेचा वापर फक्त घरगुती कारणांसाठीच केल्यास आणि यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य केल्यास वीजपुरवठा सुरळीत होऊ शकतो. खांडज ग्रामस्थांनी ही जबाबदारी स्वीकारत जनजागृती मोहीम राबवली, घरोघरी वीज सुरळीत होण्यासाठी आवश्यक सहकार्य करा असे सांगण्यात आले. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विशेष पुढाकार घेतला. यासाठी ग्रामसभेत ठराव मंजूर करुन तो महावितरणकडे सादर केला.

या ठरावाची दखल घेत महावितरणने तातडीने यावर कार्यवाही केली आणि कालपासून खांडजमध्ये सायंकाळचा वीजपुरवठा सुरळीत झाला. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून गावात समाधानाचे वातावरण आहे. विशेषतः महिला, जेष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा झाला आहे.

महावितरणने मोलाचे सहकार्य करून वीजपुरवठा तातडीने सुरळीत केल्याबद्दल खांडज ग्रामस्थांच्या वतीने महावितरणचे खुप खुप आभार! खांडजप्रमाणे इतरही सर्व गावांना महावितरणचे असेच सहकार्य राहील, असा विश्वास आहे.

खांडजचा हा आदर्श बारामती तालुक्यातील इतर गावांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो. प्रत्येक गावाने असा ठराव करून महावितरण सोबत समन्वय साधल्यास लोडशेडिंगची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. यासाठी आम्ही सर्वजण सर्व ग्रामस्थांसोबत आहोत.

सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की, आपल्या गावातही असा ठराव करून पुढाकार घ्या. आम्ही महावितरणसोबत समन्वय साधून आपल्याला पूर्ण सहकार्य करू.
चला, आपण सर्व मिळून आपला गाव ‘प्रकाशमय’ बनवूया.
#बारामती

Address

Baramati
413102

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Baramati Loksabha-Vidhansabha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Baramati Loksabha-Vidhansabha:

Share