वासुदेव जोशी समाज बहुउद्देशीय संस्था जळगाव

  • Home
  • India
  • Baramati
  • वासुदेव जोशी समाज बहुउद्देशीय संस्था जळगाव

वासुदेव जोशी समाज बहुउद्देशीय संस्था  जळगाव 🙏समाज सेवा हीच खरी ईश्वर सेवा🙏

*भारतीय संविधान दिवस*अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम), ही संस्था 2016 पासून “सरकारी प्रयत्नांना जनसहभागाची साथ” हे ब्...
26/11/2025

*भारतीय संविधान दिवस*

अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम), ही संस्था 2016 पासून “सरकारी प्रयत्नांना जनसहभागाची साथ” हे ब्रीद घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काम करत आहे. सरकारी यंत्रणेला मदत व्हावी व तळागाळा पर्यंत योग्य लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ पोहोचावा या उद्देशाने व विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून “एकात्मिक विकासाच्या” उद्देशाने काम करते आहे.
याचाच एक भाग म्हणून 26 नोव्हेंबर रोजी आपल्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहे आपल्या संविधानाची 75 हा कार्यक्रम प्रतिभा महाविद्यालय येथे घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये अनंत प्रमोद जोशी यांनी सूत्रसंचालन केले व पवन येपुरे सर यांनीयांचे उपस्थिती आभार व्यक्त केले या ठिकाणी प्रतिभा प्राथमिक विद्यामंदिर येथील संपूर्ण शिक्षक व कर्मचारी वर्ग व विद्यार्थी यांचे उपस्थिती लाभली

🙏 जय माता दी 🙏वासुदेव जोशी तरुण मित्र मंडळ व महिला मंडळ यांच्या वतीने आज दिनांक 07/10/2025 रोजी सप्तश्रुंगी माता मंदिर व...
14/10/2025

🙏 जय माता दी 🙏

वासुदेव जोशी तरुण मित्र मंडळ व महिला मंडळ यांच्या वतीने आज दिनांक 07/10/2025 रोजी सप्तश्रुंगी माता मंदिर वर्धापन दिना निमित्त महा प्रसाद चे आयोजन केले व या ठिकाणी सन्माननीय पंच मंडळ तरुण मित्र मंडळ महिला मंडळ व समाजसेवक प्रकाश भाऊ बालानी व समस्त पंच मंडळी यांच्या हस्ते आरती झाली परिसरातील नागरिकांनी महाप्रसाद चा लाभ घेतला व ज्यांनी या महाप्रसाद ला देणगी वस्तू सेवा दिली त्यांचे देखील मंडळा कडून धन्यवाद असच प्रेम. राहु द्या

🙏 जय माता दी 🙏

✨ *भव्य गणेश उत्सव सोहळा* *2025*✨   ‼️ *उत्सव एकत्मतेचा*‼️ ‼️ *उत्सव मराठी अस्मितेचा*‼️     ‼️ *उत्सव आपल्या लाडक्या बाप...
02/09/2025

✨ *भव्य गणेश उत्सव सोहळा* *2025*✨
‼️ *उत्सव एकत्मतेचा*‼️ ‼️ *उत्सव मराठी अस्मितेचा*‼️

‼️ *उत्सव आपल्या लाडक्या बाप्पा चा*‼️
‼️ *उत्सव आपल्या जोशी काँलणी च्या राजा चा 👑*‼️


⚜️ *भव्य गणेश उत्सव सोहळा* ⚜️
*दी 1 /09/2025* *सोमवार*
*आपल्या लाडक्या बाप्पाची आरती चे मानकरी*

समाजसेवक प्रकाश भाऊ बालानी यांच्या हस्ते

*स्वप्नील चितारे जोशी* *गोविंदा झोटुंगे*. *आबा भाऊ दोरकर*. *निलेश मोरकर*. *निलेश गोंधळी*. *जयेश गोंडे*. *अरुण झोटुंगे*. *छोटू मामा शिंदे*. *सुनील मामा शिंदे*. *बाळू दादा दोरकर*
*चेतन विधाते*
*कुबेर गोंधळी*
*राहुल विधाते*

*सर्व नागरिकांनी सामुहिक महाआरती साठी आरतीचे ताट घेउन यावे* *ही नम्र विनंती*

✨ *महाआरती*✨

*संध्याकाळी 8.00 वाजेला वासुदेव जुनि जोशी काँलनी चौक येथे आयोजित करण्यात योजिले आहे तरी समाजातील सर्व तरुण व जेष्ठ नागरिकांनी व समस्त पंच मंडळींनी उपस्थीती द्यावी ही नम्र विनंती*

✨ *आयोजक*✨

‼️ *वासुदेव जोशी तरुण मित्र मंडळ* ‼️

*सर्व गणेश भक्तांनि उपस्थित राहावे ही नम्र विनंती*🙏🏻🙏🏻
👑 *गणपति बाप्पा मोरया*👑

वासुदेव जोशी तरुण मित्र मंडळ जळगाव शहर यांची यंदाच्या वर्षी वासुदेव जोशी समाज यांचे दैवत श्री वासुदेव भगवंताच्या  सुरूपा...
25/08/2025

वासुदेव जोशी तरुण मित्र मंडळ जळगाव शहर यांची यंदाच्या वर्षी वासुदेव जोशी समाज यांचे दैवत श्री वासुदेव भगवंताच्या सुरूपात आकर्षण असलेली व समाज ऐकतेची मिसाल देणारी अशी आकर्षक श्री गणेशा च्या रूपात आपण या ठिकाणी विराजमान करणार आहोत तरी सर्व समाज बांधव व राज्यातील सर्व वासुदेव जोशी समाज यांनी आवर्जून बगा

वासुदेव जोशी समाज बहुउद्देशीय संस्था व पिरामल सनोफी सिविल हॉस्पिटल जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आज जोशी कॉलनी येथे ...
15/07/2025

वासुदेव जोशी समाज बहुउद्देशीय संस्था व पिरामल सनोफी सिविल हॉस्पिटल जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आज जोशी कॉलनी येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी 100 रुग्णाची बीपी व शुगर मुख्य तपासणी करण्यात आली व सर्दी जखम खाज चे क्रीम व मल्टी विटामिन च्या गोळ्या सर्दीच्या गोळ्या पेन किलर यांचे मोफत वाटप करण्यात आले ही सेवा सहा महिने या ठिकाणी काम करणार आहे आणि सहा महिने मोफत मेडिसिन चे वाटप करण्यात येणार आहे या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष अनंत जोशी उपस्थित होते व पिरामल सस्ते करण्यात कम्युनिटी फॅसिलिटेशन ऑफिसर अनंत जोशी यांनी काम पाहिले जीएनएम ज्योती महाजन व पायलेट ज्ञानेश्वर कोळी उपस्थित होते तसेच कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडावा यासाठी संस्थेचे पदाधिकारी गजानन ठाकरे दिलीप श्रीखंडे दीपक जोशी प्रथमेश जोशी सागर जोशी सचिन शिंदे करण जोशी साई जोशी इत्यादी लोकांची उपस्थिती या कार्यक्रमाला होती

🌕✨ गुरुपौर्णिमा निमित्त ✨🌕शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमवासुदेव जोशी समाज बहुद्देशीय संस्था, जळगावव्हाईट लोटस मल्टीपर्प...
11/07/2025

🌕✨ गुरुपौर्णिमा निमित्त ✨🌕

शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम

वासुदेव जोशी समाज बहुद्देशीय संस्था, जळगाव
व्हाईट लोटस मल्टीपर्पज फाउंडेशन, जळगाव
ॲग्रेरियन कन्सल्टन्सी अँड सर्विसेस एलएलपी, जळगाव
यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 11/07/2025 रोजी 60 विध्यार्थी यांना
विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी,
ज्ञानाचा दीप उजळवणारा एक उपक्रम...
प्रतिभा प्राथमिक विद्या मंदिर,
या ठिकाणी घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल भोकरे सर अनंत जोशी शंकर पाटील पवन येपुरे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा मॅडम यांनी केले या ठिकाणी शिक्षक कर्मचारी वर्ग मुख्याध्यापक बाळू बाविस्कर सर संजय सिंग पाटील सर वैशाली चंदनकर मॅडम छाया पाटील यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडाव यासाठी ठिकाणी सहकार्य केले विनोद भोपे सचिन कानडे सागर जोशी अजय गोमाणे यांचे खूप सहकार्य लाभले
🎁 विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप
🎤 गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा एक भाविक क्षण

वासुदेव जोशी समाजीला गुणवंताचा सत्कारजळगाव :वासुदेव जोशी समाज सेवा संघ व वासुदेव जोशी समाज बहुउद्देशीय संस्था यांचे संयु...
16/06/2025

वासुदेव जोशी समाजीला गुणवंताचा सत्कार

जळगाव :

वासुदेव जोशी समाज सेवा संघ व वासुदेव जोशी समाज बहुउद्देशीय संस्था यांचे संयुक्त विद्यमाने समाजातील दहावी बारावी मध्ये यश प्राप्त केलेल्या गुणवंतांचा गुण गौरव सोहळा नुकताच श्री गुरु गोरक्षनाथ समाज मंदिर जळगाव येथे पार पडला या सोहळयात वासुदेव, जोशी गोंधळी समाजातिल इयत्ता दहावी, बारावी, , अभियांत्रिकी, पदवी, पदवित्तर, परीक्षेत पास झालेल्या गुणवन्त विध्यार्थीचा मनिवरांच्या हस्ते सत्कार करण्यात् आला.
गुणगौरव सोहळा खालील मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला समाज अध्यक्ष सदाशिव जोशी, समाज सेवा संघ अध्यक्ष आनंदा जोशी, किरण मोरकर प्रमोद जोशी. अनिल पवार,पांडुरंग शिंदे, सुनील कांनडे, विजय जोशी,अनिल जाधव, रवीद्र रणदिवे, अनिल दोरकर, रमेश विधाते,राकेश भोजने , भानुदास जोशी, रितेश जोशी, अनिल लागवनकर, राजेश जोशी, दीपक जोशी,हिरामण जोशी, विशाल जोशी, सुहास जोशी, विनोद भोपे, सागर जोशी, रवींद्र जोशी,निखिल जोशी, सचिन कानडे, गोपी बाबा, यांच्यासाह सर्व समाज बांधवांची उपस्थिती होती सूत्रसंचालन श्री प्रमोद जोशी यांनी केले व आभार प्रदर्शन वासुदेव जोशी समाज बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री अनंत जोशी यांनी केले

*आज दिनांक 29/5/2025 रोजी जळगाव शहराचेआमदार माननीय राजू मामा भोळे व त्याच प्रमाणे जळगाव शहराचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे सा...
31/05/2025

*आज दिनांक 29/5/2025 रोजी जळगाव शहराचेआमदार माननीय राजू मामा भोळे व त्याच प्रमाणे जळगाव शहराचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे साहेब यांना जोशी कॉलनी प्रभाग क्रमांक 16 शहीद हेमू कलानी उद्यान या ठिकाणी तरुण मुलांसाठी व नागरिकांसाठी बंदिस्त जिम व जॉगिंग ट्रॅक बनवण्यात यावा ज्याने नागरिकांचे शरीर प्रकृती निरोगी राहील व तरुण मुलांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढले आहे ते त्यापासून दूर होईल यासाठी वासुदेव जोशी तरुण मित्र मंडळा तर्फे व वासुदेव जोशी समाज बहुउद्देशीय संस्थे तर्फे निवेदन देणात आले, या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष अनंत जोशी,सचिव रवींद्र जोशी, व सदस्य सागर लागवणकर,सचिन जोशी, रोहन जोशी,यश जोशी, प्रथम जोशी,विनोद भोपे,मयंक जोशी, रोहन दोरकर आदी सदस्यांनी उपस्थिती दिली*

*वासुदेव जोशी तरुण मित्र मंडळ*                                 व *वासुदेव जोशी समाज बहुउद्देशीय संस्था..यांच्या वतीने* *...
20/02/2025

*वासुदेव जोशी तरुण मित्र मंडळ*



*वासुदेव जोशी समाज बहुउद्देशीय संस्था..यांच्या वतीने*

*सार्वजनिक शिवजयंती मोहोत्सव आज दिनांक 19/2/2025 रोजी जोशी कॉलनी चौक जळगाव येथे शिव जयंती महोत्सव निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून पुष्प हार घालून व सामूहिक समाज बांधव व महिलाच्या हस्ते आरती कारणात आली..*

*या ठिकाणी उपस्थित.. समाजसेवक प्रकाश भाऊ बालानी, पंच मंडळ किरण मोरकर संतोष जोशी, अरुण जोशी, जागेश्वर जोशी, भिकन भोजने, अनिल जोशी,व बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष.. अनंत जोशी, सचिव रवींद्र जोशी,विशाल जोशी,निखिल जोशी, सचिन कानडे, दिलीप जोशी,स्वप्नील जोशी ,कृष्णा जोशी , मोहित मोरकर , रोहन, महेंद्र जोशी, अर्जुन जोशी, अनुप जोशी, गजानन ठाकरे,जयेश जोशी, यश जोशी,संतोष बागडेयांच्या कडून टेन्ट सेवा मिळाली इत्यादी ची उपस्थिती होती..*

*वासुदेव जोशी समाज बहुद्देशीय संस्थे तर्फे आज प्रजासत्ताक दिन 26  जानेवारी जोशी कॉलनी येथे भारत माता पूजन करण्यात आले व ...
26/01/2025

*वासुदेव जोशी समाज बहुद्देशीय संस्थे तर्फे आज प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी जोशी कॉलनी येथे भारत माता पूजन करण्यात आले व प्रतिभा प्राथमिक विद्यालय यांची रॅली मधील मुलांना खाऊ वाटप करण्यात आला व रोहित भाट व गजानन जोशी याच्या कडून लहान मुलांना खाऊ देण्यात अनमोल सहकार्य केले या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष अनंत जोशी, भिकन भोजने, रवीद्र सोनावणे, गोपी बाबा, कृष्णा जोशी, मोहित जोशी, गणेश जोशी, अरुण जोशी, अजय दुसाने,गजानन जोशी, सोमनाथ जोशी, महेंद्र जोशी, अर्जुन जोशी आदिनी सहकार्य केले*

Address

प्लॉट नं 15 जुनी जोशी कॉलोनी हेमू कलानी गार्डन के सामने सिंधी कॉलोनी रोड जलगाव. 425001
Baramati
425001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when वासुदेव जोशी समाज बहुउद्देशीय संस्था जळगाव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category