Siddharth Bansod Badnera सिध्दार्थ बनसोड बडनेरा

  • Home
  • India
  • Badnera
  • Siddharth Bansod Badnera सिध्दार्थ बनसोड बडनेरा

Siddharth Bansod Badnera सिध्दार्थ बनसोड बडनेरा Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Siddharth Bansod Badnera सिध्दार्थ बनसोड बडनेरा, Social service, Mil Chal New Town Badnera, Badnera.

   #सिद्धार्थ_बनसोड_बडनेरा   a    #सिद्धार्थबनसोडबडनेरा बडनेरा शहरातील पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्ति...
16/03/2026

#सिद्धार्थ_बनसोड_बडनेरा a #सिद्धार्थबनसोडबडनेरा
बडनेरा शहरातील पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे सिद्धार्थ बनसोड

प्रत्येक व्यक्ती जन्मतः वेगळी आणि विशेष आहे. प्रत्येकाच्यात एक वेगळी खासियत आहे जिच्यामुळे आपण इतरांपेक्षा वेगळे असतो. हा वेगळेपणाच ठरवतो कि आपण कोण आहोत, कसे आहोत आणि एखाद्या परिस्थितीत आपण कसे वागतो.मनुष्याचा स्वभाव कसा असावा; अष्टपैलू हे एक हरहुन्नरी आणि विकसित व्यक्तिमत्व असते.अशा व्यक्ती आळस, अनुत्साह यात अडकत नाही. आपल्या वैशिष्ट्यांना कोणत्याही प्रतिकाराशिवाय आणि आपल्या सीमांच्या बंधनांना त्यागने शिकतात.अष्टपैलू व्यक्ती कोणतेही काम अति उत्साहाने करतो आणि त्यांची काम करण्याची रीत इतरांपेक्षा उत्कृष्ट असते.जेंव्हा पूर्ण उत्साहाने आपण प्रयत्न करतो तेंव्हा आपल्या जीवनातील श्रेष्ठतांना आपण स्वतः अनुभव करतो.बुद्धिचातुर्य,परिपक्व विचार, प्रभुत्वप्रियता, आनंदी, कार्य-सातत्य, साहसप्रियता, स्वतंत्र वृत्ती, सुसंस्कृत सफाईदारपणा,समजूतदार वृत्ती आणि विवेकशीलता असे गुण अष्टपैलू व्यक्ती मध्ये असतात असेच बडनेरा शहरातील पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे सिद्धार्थ बनसोड यांच्या व्यक्तिमत्वावर लिखाण करने तेवढं कमीच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज,विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महापुरुषांच्या विचारांना समर्पित असलेले पुरोगामी विचारांचे पाईक असल्यामुळे त्यांच्या निवासस्थानी ग्रंथाचे पुस्तकांचे संग्रह आहेत.विविध सामाजिक, आंबेडकरी आंदोलनात सहभाग असल्याने घरातील दर्शनी भाग हें क्रांतिकारी विचारांचे असल्याचे दिसून येते.स्वाभिमान कामगार युनियन चे जिल्हाकार्याध्यक्ष असताना कामगारांच्या विविध न्याय हक्काच्या मागण्यासाठी काम केल्याचे वृत्तपत्राचे कात्रणाची फाईल बघून स्तब्ध झाल्याशिवाय राहत नाही.डॉ. बाबासाहेब आंबेडकर युथ वेलफेअर सोसायटी ही संस्था स्थापन करून समाजातील विविध प्रश्न शासन प्रशासना पर्यत पोहचविले तसेच विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीचा शिव-फुले-शाहू-आंबेडकर स्मृती गौरव पुरस्कार समारोह आयोजित करून त्यांचा सन्मान सुद्धा केला विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील धुरंधर व्यक्तिमत्व असलेले माजी खासदार विदर्भवीर जाबुवंतराव धोटे यांना बडनेरा शहारात प्रथमच आणणारे व्यक्ती म्हणजे सिद्धार्थ बनसोड व त्यांचे मित्रबंधू विलास वाडेकर होत.याच संस्थे च्या माध्यमातून 'भारतीय संविधानाला' राष्ट्रीय ग्रंथ घोषित करण्यात यावे यासाठी केंद्र सरकार कडे आजही ते पाठपुरावा करीत आहे. त्याच बरोबर ऐतिहासिक 'भीमा कोरेगाव' लढाईची शौर्य गाथा शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडे करून 'विद्या प्राधिकरण' पुणे यांचे संचालकांनी याबाबत सकारत्मक असल्याचे पत्र सुद्धा सिद्धार्थ बनसोड यांना प्राप्त झाले आहे परंतु अद्यापही त्यांनी आपला पाठपुरावा निरंतर सुरुच ठेवला आहे.बडनेरा नवी वस्ती, आठवडी बाजारातील छत्रपती शिवाजी महाराज, ऐतिहासिक समता चौकातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच जुनी वस्ती बडनेरा येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच पुतळे उभारण्यात सामाजिक कार्यकर्ता सिद्धार्थ बनसोड यांचे योगदान अमूल्य आहे त्याकरिता...(*बडनेरा येथे उभारण्यात आलेल्या महापुरुषांच्या पुतळा उभारणीत सिद्धार्थ बनसोड यांची महत्वपूर्ण भूमिका : या आशयाचे लेख वाचावे*) महाराष्ट्राच्या राजकारणातील द्रष्टनेते अमरावती चे सुपुत्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे अध्यक्ष माजी खासदार, माजी राज्यपाल दिवंगत रा.सू.गवई यांच्या उपस्थितीत सन 2006 मध्ये श्री.दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट,अमरावती कडून माजी लेडी गव्हर्नर प्रा.डॉ.कमलताई गवई यांच्या हस्ते 'मानपत्र' देऊन गौरविण्यात आले होते.

*सिद्धार्थ बनसोड हे अनेक पुरस्कारांनी सन्मानित :*
ज्यामध्ये (1) बहुजन (कर्मचारी-बेरोजगार) अन्याय निवारण अॅक्शन कमेटी, अमरावती. यांचा भारतीय संविधान सुवर्ण महोत्सव वर्ष दिनानिमित्य सन्मानपत्र देवुन गौरव, (2) डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघ, अमरावती यांचेकडून प्रमाणपत्र देऊन गौरव, (3) मा.श्री.दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट, अमरावती तर्फे "मानपत्र", (4) फुले-शाहू-आंबेडकर प्रतिष्ठानचा "विद्यार्थी युवारत्न पुरस्कार", (5) मल्हार क्रांती संघटनेचा "मातोश्री अहिल्यादेवी होळकर समाज गौरव पुरस्कार", (6) एकता रॅली आयोजन समिती, अमरावती यांचा "डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजसेवा गौरव पुरस्कार", (7) अमरावती महानगरपालीका (आरोग्य विभाग) तर्फे "धन्यवाद पत्र", (8) गांधी ज्ञान मंदिर, वर्धा तर्फे "सन्मानपत्र", (9) राज्यरक्त संक्रमण परिषद महाराष्ट्र राज्य यांचे "प्रमाणपत्रे", (10) संत गाडगेबाबा रक्तपेढी तर्फे "अभिनंदनपत्र", (11) श्री.हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती यांच्या नागरी संरक्षण दलाचा "प्रथम क्रमांकाचा पुरस्कार", (12) संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती (चक्रधर स्वामी अध्यासन केंद्र) कडून "सन्मानपत्र", (13) संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती (जनसंपर्क विभाग, जिल्हा मराठी पत्रकार संघ, अमरावती व श्रमिक पत्रकार संघ, अमरावती) यांचा 'आजची पत्रकारीता' या विषयावरच्या पत्रकारीता "कार्यशाळे चा प्रमाणपत्र" प्राप्त, (14) राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ, यवतमाळ कडून "दर्पण पुरस्कार", (15) भीम ब्रिगेड संघटना, अमरावती कडून "सन्मान चिन्ह", (16) सांध्य. दैनिक मतदार राज वृत्तपत्राचा "भीमरत्न पुरस्कार" देऊन गौरव करण्यात आले आहे. हेच नव्हे तर,

*वृत्तपत्रा मधुन विविध लेखन प्रसिध्द :*
समाजात वैचारिक प्रबोधन करण्याचे कार्य सुद्धा सिद्धार्थ बनसोड यांनी केले.त्यांचे अग्रलेख खऱ्या अर्थाने शिव फुले शाहू आंबेडकर पुरोगामी विचारधारेला समर्पित असे आहे ज्यामध्ये (1) समाज संभ्रमीत कां होतो ?, (2) बौध्द धम्म आणि राजकारण, (3) छ.शिवाजी महाराज यांचा चरित्र विकृत करण्याचा प्रयत्न का ?, (4) लालकृष्ण अडवाणी आणि राम मंदिराचे राजकारण, (5) दरवर्षी सोळा कोटी मागासवर्गीय ठरतात जातीयवादाचे बळी, (6) बौद्ध विवाह आणि वारसा हक्क कायदा लागू केला पाहिजे!, (7) याला स्वातंत्र्य म्हणता येईल का?, (8) हा बुरखा नव्हे, पडदा आहे?, (9) पण.... धनंजय कुंदे, जरा याचे उत्तर द्या? (प्रतिक्रिया), (10) आता दलित शब्द कशासाठी', (11) काय नाही दिलं... या महाराष्ट्राने (वेगळ्या विदर्भाच्या समर्थनास लेखन), (12) प्रजासत्ताक दिनी नेमकी डॉ. आंबेडकरांची उपेक्षा का?, (13) पण महाराष्ट्रात राहुन विदर्भाला काय मिळाले ?', (14) स्वा. सावरकर आणि डॉ. आंबेडकर यांच्यात तुलना ! एक डावपेचांची आखणी', (15) यापुढे सत्तेसाठी संघर्ष कोणाशी ...? (सन 2009 च्या 15 व्या लोकसभेच्या निवडणुकीत रिपब्लीकन नेत्यांचे दारुण परभवावर मंथन करणारा लेख), (16) पुरोगामी महाराष्ट्रातील मंत्री व सत्य साईबाबा, (17) वृत्तपत्रांचे लोकशाहीतील असलेले स्थान कोणते ?, (18) श्रध्दा ठेवा पण अंधश्रध्दा कशाला ?, (19) भारतीय संविधान व त्याची प्रस्तावना त्याच प्रमाणे पत्रकारिता क्षेत्रात कार्य करीत असताना सामाजिक, लोकहितार्थ विपुल लिखाण व अग्रलेख वृत्तपत्रात लिहिले.

*सामाजिक संस्था व संघटना मध्ये कार्यरत :*
(1) *संस्थापक अध्यक्ष:* डॉ. बाबासाहेब आंबेडकर युथ वेल्फेअर सोसायटी आर. क्र. महा/२८४/एफ १७४४७ (अम.),(2) *सचिव:* विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समिती, समता चौक, बडनेरा, (3) *संयोजक:* आधारवड फाऊंडेशन, (4) *माजी जिल्हाकार्याध्यक्षः* स्वाभिमान कामगार युनियन, जि. अमरावती, (5) *माजी सचिव /प्रसिद्धी प्रमुख:* भारतीय बौध्द महासभा,शाखा-बडनेरा, (6) *आयोजक :* फुले-शाहू-आंबेडकर स्मृती गौरव पुरस्कार आयोजन समिती, (7) *सदस्य:* महाराष्ट्र वृत्तपत्र लेखक असोशिएशन, (8) *प्रतिनिधि:* सांध्य दैनिक मतदार राज (9) *अध्यक्ष:* संयुक्त पत्रकार संघ, बडनेरा जि. अमरावती असे विविध पदे भूषविले आहे व ते जबाबदारीने सुद्धा पार पाळत आहे.त्यांनी सामाजिक तसेच पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कार्यामुळे विविध सामाजिक संस्था, संघटनांशी त्यांचे जिवाळ्याचे संबंध आहेत.

*बडनेरा येथे उभारण्यात आलेल्या महापुरुषांच्या पुतळा उभारणीत सिद्धार्थ बनसोड यांची महत्वपूर्ण भूमिका*

अमरावती जिल्हा विभागीय मुख्यालय असून विदर्भातील महत्वाचे शहर आहे 1983 ला बडनेरा नगरपरिषद बरखास्त करून अमरावती महानगर पालिकेची स्थापना करण्यात आली बडनेरा नगरपरिषद अस्तित्वात असताना बडनेरा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व नवि वस्ती, पोलीस स्टेशन जवळील समता चौकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याचा ठराव करण्यात आला होता परंतु हें पुतळे उभारण्याकरिता गेल्या चार दशकापासून आंबेडकरी व शिवप्रेमी चळवळीतील तत्कालीन कार्यकर्त्यानी कागदोपत्री मोठी लढाई लढली आणि तेच ऐतिहासिक कागदपत्रांचा आधार घेत 2016 रोजी सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ बनसोड यांनी मा.जिल्हाधिकारी, अमरावती यांना दि.03 जून 2016 रोजी निवेदन देऊन बडनेरा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी केली व दैनिक हिंदुस्थान व दैनिक मातृभूमी या वृत्तपत्रातून सोमवार दि. 06 जून 2016 ला बातम्या प्रकाशित करून प्रसिद्ध केली या निवेदनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी, अमरावती यांनी पत्र क्रमांक 910 दि. 06 जून 2016 रोजी पत्र काढून मा.आयुक्त, अमरावती महानगर पालिका यांना कळविले त्यावर मा.सहाय्यक नगररचना अधिकारी,अम.मनपा यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारण्यासंदर्भात मार्गदर्शन बाबत सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ बनसोड यांच्याशी जा.क्रं. 1476 /2016 दि. 24 जून 2016 पत्र दिले आणि हिच ठिणगी याला कारणीभूत ठरली.त्यावर याबाबत बडनेराचे आमदार रवि राणा यांना वेळो वेळी भेटून याबाबत माहिती देऊन अवगत केले त्यावर अखेर आमदार रवि राणा यांनी वेळेचाही अवलंब न करता याबाबत बडनेरा शहरातील शिवप्रेमी मंगेश सोळंके, पवन भोयर, नितीन सोळंके, अमोल काळे, मंगेश पवार,अवि जगदाळे, शशीकांत नन्नावरे, पंकज शर्मा, अमित काळेकर, पवन बिंडा, राहुल जाधव, प्रमोद लवटे, अमृत यादव या युवकांनी पुढे जीवाचे रान करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारण्यासाठी परिश्रम घेतले या युवकांना सोबत घेऊन मा.नितीन मोहोड यांच्या अमरावती - बडनेरा रोड वरील हरियाली या निवास्थानी बैठक घेण्यात आली त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ बनसोड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याबाबत सविस्तर माहिती विशद केली आणि अखेर बडनेरा नवी वस्ती आठवडी बाजार येथे 19 फेब्रुवारी 2019 (शिवजयंती) रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याची घोषणा आमदार रवि राणा यांनी केली. विशेष म्हणजे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकापर्ण कार्यक्रमाचे निमंत्रण पत्रिकेच्या मुखपृष्ठावर समितीच्या प्रमुख सदस्यांच्या नावासोबत बडनेरातील आंबेडकरी चळवळीतील एकमेव नाव कोणाचे असेल तर ते सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ बनसोड यांचे नाव दिसून येते एका ऐतिहासिक कार्यात आपले थोडे का होईना हातभार लागले हें आपले भाग्य आहे अशी प्रतिक्रिया देताना भावना व्यक्त करतात.(याबाबत सिद्धार्थ बनसोड यांच्याकडे संपूर्ण कागदपत्रे उपलब्ध आहेत)

*समता चौकातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा*

तत्कालीन बडनेरा नगरपरिषद अस्तित्वात असताना बडनेरा येथे छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज पुतळा उभारण्यासह विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सुद्धा पुतळा उभारण्याचा ठराव करण्यात आला असता त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती स्थापन करण्यात आले व पो. स्टे. बडनेरा जवळील "समता चौकाची" जागा निश्चित करण्यात आली व कागदोपत्री पाठपुरावा करण्यात आला परंतु बडनेरा नगरपरिषद बरखास्त करून 1983 ला अमरावती महानगर पालिकेची स्थापना करण्यात आले तेव्हा सुद्धा स्मारक समितीने आपली मागणी रेटून धरली तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, बडनेरा यांना जागेचे संबंधात ना हरकत व पुतळा उभारणे या बाबी विचारात घेता प्रशासकीय काळात पत्र क्रं.335 दि.19/04/1987 अन्वये महानगर पालिका प्रशासना तर्फे ना हरकत देण्यात आले होते.*(अशी माहिती सहाय्यक संचालक नगर रचना, अमरावती महानगर पालिका यांनी जा.क्रं 39 /2018 दि. 05 एप्रिल 2018 ला मा.आयुक्त, अमरावती महानगर पालिका यांचे दि.29 मार्च 2018 रोजीच्या आदेशान्वये सिद्धार्थ बनसोड यांना पत्र देऊन कळविण्यात आले होते हें विशेष)* परंतु तत्कालीन स्मारक समितीचे पदाधिकाऱ्यांकडून ही मागणी काही कालावधी करिता मागे राहली तेव्हा समता ऑटो युनियन या नावाची ऑटो चालक बांधवानी 'समता चौकात' विविध कार्यक्रम राबवून सदर स्मारकाच्या नियोजित जागेला जपून ठेवले काही कालांतराने आंबेडकरी नव युवकांची फळी तयार होऊन समता ऑटो युनियनच्या खांद्याला खांधा देत "समता सामाजिक संघटनेची " स्थापना करण्यात आली त्यात सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ बनसोड हें प्रामुख्याने 'सचिव' म्हणून पदाधिकारी होते.तत्कालीन माजी युवा नगरसेवक अभिजित जाधव यांच्या स्थानिक विकास निधी मधून सर्वात प्रथम स्मारकाच्या जागेचे सौदर्यकरण करण्यात आले होते त्याचप्रमाणे माजी विधी सभापती तथा नगरसेवक दिवंगत प्रा.विजय नागपुरे यांच्या माध्यमातून अधिकृतरित्या "समता चौक" नामकरण करण्यात आले.त्यानंतर सदर स्मारकच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्या संदर्भातील कागदपत्रे मिळवून घेऊन पुन्हा या मागणीला जोर मिळाला दि. 19 फेब्रुवारी 2018 ला बडनेरा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आले परंतु विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सुद्धा पुतळा उभारण्याची मागणी आंबेडकरी अनुयायी कडून होत असल्याचे जाणीव बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवि राणा यांनी "समता चौकात" डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णांकृती पुतळा उभारले जाणार अशी घोषणा केली व दि. 14 एप्रिल 2018 रोजी ऐतिहासिक "समता चौक" येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला गेला. आज सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ बनसोड, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समिती, समता चौक, बडनेरा चे पदसिद्ध 'सचिव' म्हणून कार्यरत आहे. समितीचे समस्त पदाधिकाऱ्यांचे विश्वासू असून स्मारकाच्या सौदर्यकरणाचा विषय असो अथवा प्रशासनास कागदपत्राचा पाठपुरावा करणे असो समितीचे अध्यक्ष मनोज गजभिये, उपाध्यक्ष अशोक नंदागवळी, कोषाध्यक्ष मधुकर साखरे यांचे सहकार्य सदैव त्यांना असते. आज अमरावती-बडनेरा मुख्यमार्गांवर जेथून मुंबई, अकोला, यवतमाळ, हैद्राबाद अश्या महत्वाच्या शहराला जोडणाऱ्या मार्गांवर आज 'समता चौकात" विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णा कृती पुतळा दिमाखात उभा आहे.आणि लाखो नागरिकांना स्वातंत्र्य, समता, बंधूत्व, न्यायाचा संदेश देत आहे.

*बडनेरा येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा उभारण्यात सहभाग*

जुनी वस्ती बडनेरा येथील साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात सुद्धा सिद्धार्थ बनसोड अग्रस्थानी होते.बडनेरा शहरात छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभारण्यात आले यावेळी सिद्धार्थ बनसोड यांचे मित्रबंधू युवा पत्रकार रवि वानखडे यांनी बडनेरा शहरात साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी अथंग प्रयत्न केले यात त्यांना साथ लाभली ती स्वाभिमान कामगार युनियन चे विलास वाडेकर व सिद्धार्थ बनसोड यांची याबाबत आमदार रवि राणा यांना जाणीव करून देण्यात आली तसेच अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा देण्याची घोषणा आमदार रवि राणा यांनी रवि वानखडे यांची तळमळ व जिद्द बघता पुतळा उभारण्याची घोषणा केली याची जबाबदारी रवि वानखडे सह विलास वाडेकर तसेच सिद्धार्थ बनसोड यांच्याकडे सोपवली व ऑगस्ट 2019 मध्ये लहू शक्ती सेनेचे डॉ.रुपेश खडसे, पंकज जाधव, गौरव गवळी, ज्ञानेश्वर झोंबाडे, अनिल सोनटक्के व निलेश वानखडे यांच्या सहकार्याने अण्णाभाऊ साठे नगर,जुनी वस्ती,बडनेरा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा पत्रकार रवि वानखडे यांनी जिद्दीनें कोणतीही तमा न बाळगता परिश्रमाने उभारण्यासाठी लढा दिला याच्यासोबत या कार्यात आपण असल्याचा सार्थ अभिमान असल्याचे सिद्धार्थ बनसोड मनोगत व्यक्त करतात.समितीचे अध्यक्ष रवि वानखडे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरात मोठ्या गर्वाने फ्लेक्स (पोस्टर) लावतात यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा उभारण्याचे शिल्पकार म्हणून डॉ.रुपेश खडसे, विलास वाडेकर, सिद्धार्थ बनसोड, गौरव गवळी, पंकज जाधव, ज्ञानेश्वर झोंबाडे व निलेश वानखडे यांचे नावे आवर्जून लिहितात.
एकीकडे पत्रकारिता आणि दुसरीकडे समाजकारण या दोन्ही क्षेत्रांमध्ये समर्पण, प्रामाणिकपणा आणि वैचारिक बांधिलकी जपत कार्य करणारे सिद्धार्थ बनसोड हे बडनेरा शहरातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. सामाजिक प्रश्नांवर निर्भीडपणे भूमिका मांडणारा पत्रकार, तसेच वंचित-पीडित घटकांच्या हक्कांसाठी झटणारा सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुरोगामी विचारांचा प्रभाव त्यांच्या कार्यात स्पष्टपणे दिसून येतो. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित समाज घडविण्याच्या ध्येयाने त्यांनी सतत कार्य केले आहे. बडनेरा शहरात महापुरुषांच्या पुतळा उभारणीच्या ऐतिहासिक कार्यात त्यांचा सहभाग हा सामाजिक बांधिलकीचा आणि विचारनिष्ठेचा उत्तम नमुना ठरतो.पत्रकारितेच्या माध्यमातून समाजप्रबोधन आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनहिताची लढाई या दुहेरी जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडणारे सिद्धार्थ बनसोड हे खऱ्या अर्थाने समाजासाठी झटणारे कार्यकर्ते आहेत. त्यांचे कार्य, विचार आणि संघर्षमय प्रवास हा आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे.समाजहितासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला त्यांच्या पुढील सामाजिक आणि वैचारिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

20/08/2024

मी खरं बोलतो... याच वाईट वाटून घेऊ नका... ही नम्र विनंती
आपण माझ्या पेक्षा मोठे आहात... याची जाणीव आहे मला.. क्षमा असावी जय भीम... जय भारत... जय संविधान

Address

Mil Chal New Town Badnera
Badnera

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Siddharth Bansod Badnera सिध्दार्थ बनसोड बडनेरा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category