आपले शहर बदलापूर,अंबरनाथ आणि उल्हासनगर

  • Home
  • आपले शहर बदलापूर,अंबरनाथ आणि उल्हासनगर

आपले शहर बदलापूर,अंबरनाथ आणि उल्हासनगर media

बदलापूरकरांनो तुमच्याकडे या दिवशी पाणी येणार नाहीवाचा सविस्तर यादी #बदलापूर      #पाणी
13/06/2026

बदलापूरकरांनो तुमच्याकडे या दिवशी पाणी येणार नाही
वाचा सविस्तर यादी
#बदलापूर #पाणी

अंबरनाथकरांनो पाणी जपून वापरा     #अंबरनाथ  #पाणीटंचाई
13/06/2026

अंबरनाथकरांनो पाणी जपून वापरा

#अंबरनाथ #पाणीटंचाई

अतिरिक्त टीप मागणाऱ्या ओला, उबेर, चालकांवर कारवाई होणारखासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीची परिवहन मंत्र्यांकडून ता...
11/06/2026

अतिरिक्त टीप मागणाऱ्या ओला, उबेर, चालकांवर कारवाई होणार

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीची परिवहन मंत्र्यांकडून तात्काळ दखल

ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांवर मंत्री प्रताप सरनाईक यांचे कारवाईचे निर्देश

कल्याण : ॲप-आधारित टॅक्सी आणि राईड-हेलिंग सेवांच्या माध्यमातून प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप मागणे, अतिरिक्त रकमेची सक्ती करणे तसेच प्रवाशांच्या अडचणीचा गैरफायदा घेत आर्थिक शोषण करण्याच्या प्रकारांविरोधात कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या मागणीची राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तात्काळ दखल घेत संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन आयुक्तांना दिले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून विविध ॲप-आधारित टॅक्सी सेवांबाबत प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी समोर येत होत्या. प्रवास स्वीकारल्यानंतर अतिरिक्त टिप किंवा जादा रकमेची मागणी करणे, ती न मिळाल्यास प्रवास रद्द करणे अथवा प्रवाशांना मानसिक त्रास देणे असे प्रकार वाढल्याने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती.

या मागणीची दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तात्काळ प्रतिक्रिया देत प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप मागण्याचा प्रकार अन्यायकारक असल्याचे स्पष्ट केले. तसेच संबंधित कंपन्यांच्या कारभाराची चौकशी करून आवश्यक ती कठोर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन आयुक्तांना देण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी परिवहन मंत्री सरनाईक यांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्याबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभारही व्यक्त केले. ॲप-आधारित टॅक्सी आणि राईड-हेलिंग सेवा देणाऱ्या कंपन्यांचा मनमानी कारभार रोखण्यासाठी परिवहन विभागाकडून महत्त्वपूर्ण उपाययोजना राबविण्यात येणार असून या क्षेत्रासाठी लवकरच नवीन ॲग्रीगेटर धोरण जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रवाशांच्या हितासाठी सातत्याने आवाज उठविला असून ग्राहकांना पारदर्शक, न्याय्य आणि सुरक्षित सेवा मिळावी यासाठी त्यांनी ही मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्यानंतर राज्य सरकारने तात्काळ पावले उचलल्याने लाखो प्रवाशांना दिलासा मिळेल.

चौकट
मागणी काय होती ?

अॅप-आधारित टॅक्सी आणि राईड-हेलिंग सेवांकडून प्रवाशांवर लादल्या जाणाऱ्या या अन्यायकारक पद्धतीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना कठोर कारवाई करण्याचे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले होते. तर गरजेच्या वेळी प्रवाशांना वेठीस धरणे, त्यांची अडचण ओळखून आर्थिक शोषण करणे आणि जादा रक्कम देण्यास भाग पाडणे, हा प्रकार ग्राहकांच्या हक्कांवर गदा आणणारा आहे. ही केवळ चुकीची व्यावसायिक पद्धत नसून ग्राहकांना अक्षरशः ओलीस ठेवण्यासारखी बाब आहे. ग्राहकांकडून स्वेच्छेने मिळणारी टिप ही सेवेच्या गुणवत्तेची पावती असते; मात्र टिप किंवा अतिरिक्त शुल्कासाठी दबाव टाकणे, सेवा नाकारण्याची धमकी देणे किंवा ग्राहकांना मानसिक त्रास देणे हे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही.ग्राहकांना पारदर्शक, न्याय्य आणि सुरक्षित सेवा मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे अशा शोषणात्मक आणि ग्राहकविरोधी प्रकारांवर तातडीने अंकुश ठेवून संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खासदार डॉ.शिंदे यांनी केली होती.

In a significant judgment, the Supreme Court held that an accused need not be heard at the pre-cognizance stage of compl...
25/09/2025

In a significant judgment, the Supreme Court held that an accused need not be heard at the pre-cognizance stage of complaints filed for dishonour of cheque as per Section 138 of the Negotiable Instruments Act.

In a significant judgment, the Supreme Court held that an accused need not be heard at the pre-co

17/02/2025

मोटार वाहन विभाग, महाराष्ट्र (https://transport.maharashtra.gov.in) यांनी दि. ०४ डिसेंबर २०२४ रोजी अध्यादेश काढून महाराष्ट्रातील जुन्या/नव्या सर्वच वाहनांना HSRP (High Security Registration Plate) बंधनकारक केली आहे. ३१ मार्च २०२५ ही शेवटची तारीख आहे. मात्र इतका महत्वाचा निर्णय असूनही सर्वसामान्य लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी या निर्णयाची कोठेही जाहिरात केली जात नाही. मुंबई, पुणे, नाशिक व इतरही शहरातील वाहतूक पोलीस हा निर्णय जनसामान्यांना पोहोचवण्यासाठी काहीही प्रयत्न करत नाहीत.
मुदत संपल्यावर मात्र म्हणजे १ एप्रिल २०२५ पासून हेच इ-चलान मशीन घेऊन फौज रस्त्यावर उतरवतील आणि धडाधड चलान मारतील! त्यांना HSRP चे चलान फाडण्याची संधी देऊ नका. मुदतीपूर्वीच आपापल्या गाड्यांना HSRP बसवून घ्या आणि ही माहिती आपले मित्र, नातेवाईक, ओळखीचे यांच्यापर्यंत पोहोचवा.

शासन आदेश पाहण्यासाठी:-https://transport.maharashtra.gov.in/Site/Upload/GR/HSRP-SOP-13122024.pdf

HSRP बुक करण्यासाठी भेट द्या :- https://transport.maharashtra.gov.in/ZoneWiseWebsiteRedirect.html

अधिक माहितीसाठी video :
https://www.youtube.com/watch?v=mna7XdZCoQc
https://www.youtube.com/watch?v=M5J5OC_owr4
https://www.youtube.com/watch?v=N5H5fFUCigs

🏴🏴🏴
21/08/2024

🏴🏴🏴

21/08/2024

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आपले शहर बदलापूर,अंबरनाथ आणि उल्हासनगर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to आपले शहर बदलापूर,अंबरनाथ आणि उल्हासनगर:

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share