20/05/2025
उल्हास नदी व नाले बचाव समिती, बदलापुर
आंदोलनाला यश; अनधिकृत भराव प्रकरणात दहा कोटींचा दंड
हेंद्रेपाडा, 23 एप्रिल 2025 – उल्हास नदीमध्ये करण्यात आलेल्या अनधिकृत भराव, संरक्षण भिंतीचे बांधकाम व नदीपात्रातील अतिक्रमण प्रकरणी उल्हास नदी बचाव समितीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. हेंद्रेपाडा येथील सत्संग विहार समितीने नदीपात्रात अनधिकृतपणे भराव टाकण्याचे आणि संरक्षक भिंतीचे काम सुरू केले होते.
या अतिक्रमणाची माहिती मिळताच बचाव समितीने महसूल, पोलीस आणि पालिका प्रशासनासह संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. त्वरित कृती करत प्रशासनाने संबंधित काम थांबवले आणि वापरात असलेल्या जेसीबी, पोकलेन मशिनरी सील केली होती.
याप्रकरणी तहसीलदार मा. अमित पुरी यांनी ठोस कार्यवाही करत सत्संग विहार समितीवर १० कोटी १६ लाख १७ हजार १४१ रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यांच्या या निर्णयाचे उल्हास नदी बचाव समितीने मनःपूर्वक कौतुक करत त्यांचे आभार मानत आहोत
तसेच सर्व पत्रकार बांधव यांनी महत्व पूर्ण सहकार्य केले यांचे सुद्धा मनःपूर्वक धन्यवाद.🙏🙏🙏🙏
#आपले_शहर_आपला_अभिमान