Avhan Youth Foundation

Avhan Youth Foundation We learn To Give Not Because We Have Many,
But Because We Know Exactly How It Feels To Have Nothing.

संयुक्त जयंती उत्सव – कृतीतून अभिवादन ११ वा वार्षिक उपक्रमकाल छत्रपती संभाजीनगर येथील श्री भगवानबाबा बालिका आश्रमात संयु...
15/04/2026

संयुक्त जयंती उत्सव – कृतीतून अभिवादन
११ वा वार्षिक उपक्रम

काल छत्रपती संभाजीनगर येथील श्री भगवानबाबा बालिका आश्रमात संयुक्त जयंती निमित्त एक अर्थपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. आपण महापुरुषांची जयंती साजरी करतो, कारण त्यांच्या विचारांमधून आपल्याला शिक्षण, समानता आणि स्वाभिमानाचा मार्ग मिळतो. आणि या विचारांना खऱ्या अर्थाने पुढे नेण्यासाठी, आम्ही हा दिवस या मुलींसोबत साजरा करणे निवडले ❤️

मुलींशी संवाद साधत त्यांना शिक्षणाचे महत्त्व, स्वप्न पाहण्याची हिंमत आणि आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला. या सोबतच त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी लागणारे आवश्यक साहित्य, राशन आणि शैक्षणिक साहित्य देण्यात आले.

✨ हा फक्त उत्सव नाही… हा परिवर्तनाचा एक छोटासा प्रयत्न आहे
✨ आपली छोटी मदत कोणाचं मोठं भविष्य घडवू शकते
🙏 या उपक्रमासाठी मदत, सहकार्य आणि साथ देणाऱ्या प्रत्येकाचे मनापासून आभार. आपल्या सहकार्यामुळेच हा ११ वा वार्षिक उपक्रम यशस्वी झाला

🌟 Celebrating the Legacy of Social Reformers 🌟11th Annual Celebration📅 11 to 14 April 2026📍 Chhatrapati Sambhaji Nagar (...
10/04/2026

🌟 Celebrating the Legacy of Social Reformers 🌟
11th Annual Celebration

📅 11 to 14 April 2026
📍 Chhatrapati Sambhaji Nagar (Aurangabad), Maharashtra

On the occasion of the Joint Birth Anniversary of
Shri Chatrapati Shivaji Maharaj, Mahatma Jyotiba Phule, and Dr. Babasaheb Ambedkar,
AVHAN Youth Foundation is organizing meaningful social initiatives. This is not just a celebration… it is a step towards transformation

For the past 11 years, we have been working with
orphaned children, HIV-positive children, and youth outside orphanages,
supporting their education, care, and better future.

🧡 Our Focus This Year:
- Adopt a Child for One Year
- Aftercare Support for Youth (18+)
- Community Libraries
- Teacher & Mentorship Support
- Food & Basic Needs for 200+ Children

🤝 Be a part of this change – Donate & Support

💸 ₹300 / ₹500 / ₹1000 (as per your capacity)
📞 GPay / PhonePe: 9503284581

📲 Follow us on social media:
Facebook: https://www.facebook.com/AvhanFoundation
Instagram: https://www.instagram.com/avhanfoundation/

👉 Your small support can change a child’s future

AVHAN Youth Foundation

🌟 जल्लोष जयंतीचा महोत्सव विचारांचा 🌟११ वा वार्षिक उत्सव📅 ११ ते १४ एप्रिल २०२६📍 छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), महाराष्ट्रश...
10/04/2026

🌟 जल्लोष जयंतीचा महोत्सव विचारांचा 🌟
११ वा वार्षिक उत्सव

📅 ११ ते १४ एप्रिल २०२६
📍 छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), महाराष्ट्र

श्री छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले आणि
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त
आव्हान यूथ फाउंडेशन द्वारे सामाजिक उपक्रम आयोजित
- हा फक्त उत्सव नाही… हा परिवर्तनाचा प्रयत्न आहे

गेल्या ११ वर्षांपासून, आम्ही अनाथ मुले, HIV पॉझिटिव्ह मुले
आणि आश्रमाबाहेर पडलेल्या युवकांसोबत काम करत आहोत
त्यांच्या शिक्षण, काळजी आणि उज्ज्वल भविष्यासाठी
या वर्षीचे आमचे उद्दिष्ट:
- एका मुलाचे एक वर्षासाठी पालकत्व स्वीकारा
- १८+ युवकांसाठी आफ्टरकेअर सहाय्य
- समुदाय ग्रंथालये उभारणे
- शिक्षक व मार्गदर्शक सहाय्य
- २००+ मुलांसाठी अन्न व मूलभूत गरजा

🤝 या बदलाचा भाग बना – मदत करा

💸 ₹300 / ₹500 / ₹1000 (आपल्या क्षमतेनुसार)
📞 GPay / PhonePe: 9503284581

📲 आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा:
Facebook: https://www.facebook.com/AvhanFoundation
Instagram: https://www.instagram.com/avhanfoundation/

👉 आपल्या छोट्या मदतीने एका या लेकरांच भविष्य बदलू शकते

#जल्लोष_जयंतीचा_महोत्सव_विचारांचा

11th Year of CelebrationSomething meaningful is coming…Supporting orphaned & HIV+ children ❤️Stay tuned 🤝
07/04/2026

11th Year of Celebration
Something meaningful is coming…
Supporting orphaned & HIV+ children ❤️
Stay tuned 🤝

🪔✨ This Diwali, Let’s Light the Lamp of Education! ✨🪔Your small act of kindness can brighten the lives of orphan and HIV...
21/10/2025

🪔✨ This Diwali, Let’s Light the Lamp of Education! ✨🪔

Your small act of kindness can brighten the lives of orphan and HIV-positive children. 🌼
For the past 10 years, Avhan Youth Foundation has been celebrating Diwali in a special way
by sharing joy, spreading knowledge, and bringing hope to children who need it the most. 🎓💫

Through our continuous efforts, we’ve been working for the education, care, and well being of underprivileged children, ensuring that every child gets the right to learn, grow, and dream. 🌱

This year too, we’re dedicating our Diwali celebration to them
by providing educational materials, books, one time meals, and other essential needs.

Donation Options: ₹300, ₹500, ₹1000, or any amount you wish to contribute
📚 You can also donate educational items and essentials for children.

📞 To Contribute / Know More:
Avhan Youth Foundation
📲 9503284581 (GPay / PhonePe available)

Let’s spread the light of knowledge, celebrate happiness,
and make this Diwali truly meaningful. 🌟


💥 ❤️

🪔✨ या दिवाळीत, दिव्यांच्या प्रकाशासोबत पेटवूया शिक्षणाचा दीपही! ✨🪔आपल्या छोट्याशा मदतीनं अनाथ आणि एचआयव्ही पॉझिटिव्ह मुल...
19/10/2025

🪔✨ या दिवाळीत, दिव्यांच्या प्रकाशासोबत पेटवूया शिक्षणाचा दीपही! ✨🪔

आपल्या छोट्याशा मदतीनं अनाथ आणि एचआयव्ही पॉझिटिव्ह मुलांच्या शिक्षणासाठी एक छोटीशी मदत होऊ शकते. 🌼
मागील दहा वर्षांपासून आव्हान युथ फाउंडेशन या मुलांसाठी दिवाळी साजरी करत आहे.
त्यांच्या शिक्षणासाठी, आनंदासाठी आणि उज्वल भविष्यासाठी. 🎓

या वर्षीही आपण त्यांना शैक्षणिक साहित्य, पुस्तके, आणि आवश्यक वस्तू देऊन त्यांच्यासाठी आशेचा दीप पेटवूया. 💖

₹300, ₹500, ₹1000 किंवा आपल्या क्षमतेनुसार कोणतीही रक्कम
📚 किंवा शिक्षणासाठी आवश्यक वस्तू घेण्यास मदत करा.

📞 संपर्क:
आव्हान युथ फाउंडेशन
📲 9503284581 | (GPay / PhonePe उपलब्ध)

चला, या दिवाळीत शिक्षणाचा प्रकाश पसरवूया आणि आनंद साजरा करूया! 🌟

💥 ❤️

सध्या मी तेलंगणामध्ये आणि कर्नाटक सीमेला लागून असलेल्या काही जिल्ह्यांमध्ये, आमच्या संस्थेमार्फत चालू असलेल्या एका शैक्ष...
29/06/2025

सध्या मी तेलंगणामध्ये आणि कर्नाटक सीमेला लागून असलेल्या काही जिल्ह्यांमध्ये, आमच्या संस्थेमार्फत चालू असलेल्या एका शैक्षणिक उपक्रमाचं नेतृत्व करत आहे. या मोहिमेअंतर्गत १३ शाळांमधील सुमारे ८०० विद्यार्थ्यांबरोबर, १३ मुख्याध्यापक आणि ४० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबर मी काम करत आहे. या तरुण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आम्ही Gender, शरीरात होणारे बदल, मानसिक आरोग्य, हक्क आणि जबाबदाऱ्या, लैंगिकता आणि प्रजनन आरोग्य यांसारख्या संवेदनशील पण अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर प्रशिक्षण देतो. प्रशिक्षणानंतर त्यांना या लहान मुलांना शिकवण्यासाठी विविध शाळांमध्ये पाठवले जाते, आणि त्यांचं निरीक्षण, मार्गदर्शन करण्याचं काम माझ्याकडे आहे.

या संपूर्ण उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे अशी विद्यार्थी घडवणे, जे समाजात लिंगसमतेसाठी आवाज उठवतील, प्रश्न विचारतील, आणि परिवर्तनाची मशाल उंचावून धरेल. ही फक्त माहिती देण्याची प्रक्रिया नाही, तर विचार, समज आणि कृती यांचं पक्कं बळ देण्याची एक सखोल प्रक्रिया आहे. हेच तर आहेत आमचे ‘Gender Ambassadors’ जे समाजात सकारात्मक बदल घडवू शकतात. या कामाच्या माध्यमातून मला तेलंगणा सोशल वेल्फेअर रेसिडेन्शियल स्कूल्स (TGSWREIS) सोबत जवळून काम करण्याची संधी मिळाली. या शाळा अनुसूचित जाती, जमाती, व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील मुलांसाठी शिक्षणाचं केंद्रबिंदू आहेत. इथे केवळ पुस्तकी ज्ञान दिलं जात नाही, तर मुलांच्या राहण्याची, पोषणाची, स्पर्धा परीक्षांची तयारी, डिजिटल साक्षरता आणि जीवनकौशल्यांची जबाबदारीही शाळा उचलते. जरी सर्व सुविधांमध्ये एकसंधता नसेल, तरीही आज या मुलांच्या डोळ्यांमध्ये जे स्वप्नं मी पाहतो, त्यांच्या चेहऱ्यावर जो आत्मविश्वास दिसतो, तो या शाळांच्या अथक प्रयत्नांचा परिणाम आहे. ही केवळ शिक्षणसंस्था नाही, तर सामाजिक परिवर्तनाची कार्यशाळा आहे.

TGSWREIS ही संस्था राज्यातील अनुसूचित जाती विकास विभागांतर्गत कार्यरत आहे. ५वी ते पदवीपर्यंतच्या २५० पेक्षा अधिक निवासी शाळा ती चालवते. तिचा उद्देश म्हणजे वंचित आणि गरजू मुलांना इतर सुसंस्कृत पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांसारखंच दर्जेदार शिक्षण देणं. गेल्या तीन दशकांपासून ही संस्था शिक्षण, क्रीडा, संवादकौशल्यं, आणि नेतृत्व यामध्ये विद्यार्थ्यांना घडवत आहे. इथे आत्मभान आणि २१व्या शतकातील आव्हानांना सामोरं जाण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली जाते. या शाळांमध्ये शिक्षण ही फक्त पदवी मिळवण्याची गोष्ट नाही, तर एक सशक्त सामाजिक अस्त्र आहे हे मी दररोज अनुभवतो.

गेल्या ८ दिवसांपासून मी सलग प्रवासात आहे तेलंगणाच्या जंगल भागात, नल्लामल्ला काठावरच्या शाळांमध्ये, आणि कर्नाटक सीमेलगतच्या दुर्गम भागांमध्ये. एक गोष्ट प्रत्येक ठिकाणी लक्ष वेधून घेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे, त्यांच्या भिंतीवरील चित्रं, आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्यांचं अढळ स्थान. बाबासाहेबांची प्रेरणा माझ्या प्रत्येक कामामध्ये खोलवर रुजलेली आहे. शिक्षण क्षेत्रात काम करण्यामागची माझी सर्वात मोठी प्रेरणा बाबासाहेबच आहेत. त्यांनी सुरू केलेलं समाजासाठीचं आंदोलन, मी माझ्या कामातून पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि आज शिक्षण हेच माझं माध्यम आहे.

या प्रवासात मी खूप गोष्टी शिकतो आहे मुलांच्या डोळ्यांतून जग बघणं, त्यांच्या प्रश्नांतून समाजाची जखम ओळखणं, आणि त्यांच्या स्वप्नांतून एका नव्या समाजाची झलक पाहणं. अनेकदा वाटतं, आपण त्यांच्यासाठी काही देतोय, पण खरंतर हेच लहानगे मला दररोज नव्याने घडवत आहेत. मुलं शिकत आहेत, पण त्यांच्याबरोबर मीही शिकतोय. सहानुभूती, समज, आणि जबाबदारी. शिक्षण ही एक सोंग नाही, ती एक क्रांती आहे. आणि ही क्रांती वर्गखोल्यांमध्ये सुरू होते, पण तिचा आवाज समाजाच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचतो.
शाळा म्हणजे केवळ भिंतींचं नाव नाही, तर शक्यतांचं दार आहे. आणि जेव्हा त्या दारातून एक गरीब, वंचित मूल आत्मविश्वासाने बाहेर पडतं, तेव्हा खरं समाजपरिवर्तन घडतं. मी त्या बदलाचा साक्षीदार आहे. आणि हा प्रवास एक सामाजिक बांधिलकी, एक स्वप्न, आणि एक जबाबदारी पुढे नेणार आहे, जोपर्यंत शेवटच्या लेकरालाही शिकण्याची संधी मिळत नाही.

या संपूर्ण प्रवासातून एक गोष्ट मनात ठसते जर ही मुलं शिकली, तर त्यांचं भविष्य उज्वल असेल. अन्यथा, तेच चक्र मोलमजुरीचं, दुर्लक्षित आयुष्याचं परत सुरू होईल.
मी जे करतो आहे, ते फक्त नोकरी नाही. पोटापाण्यासाठी पगार मिळतो, पण या लहान मुलांना शिकवून त्यांचं आयुष्य एका सकारात्मक वळणावर नेण्याचं समाधान फार वेगळं आहे आणि तेच मला रोज पुन्हा पुन्हा ह्या प्रवासात उतरायला भाग पाडतं.

Join us in celebrating the Joint birth anniversary of Shri Chatrapati Shivaji Maharaj, Mahatma Jyotiba Phule, and Dr. Ba...
11/04/2025

Join us in celebrating the Joint birth anniversary of Shri Chatrapati Shivaji Maharaj, Mahatma Jyotiba Phule, and Dr. Babasaheb Ambedkar.
as part of our 10th Annual Celebration.

📅 April 12th to 15th, 2025
📍 Chhatrapati Sambhaji Nagar (Aurangabad), Maharashtra.

We are working since 2011 in Chhatrapati Sambhajinagar (Aurangabad) for a meaningful cause. We work closely with children living in orphanages, especially supporting their Education and overall well-being. For over 12 years, we have also helping HIV-positive children live a better life beyond what they receive in orphanage homes.

We support local NGOs through outreach and fundraising, have set up over 8 libraries, and donated more than 25,000 books. We’ve supported higher education for marginalized youth across Maharashtra and also worked with the transgender community. Through all our efforts especially during the birth anniversaries of great social reformers, we aim to give a true tribute to their vision, not just through speeches, but by carrying forward their mission of justice, equality, and education. This year, we continue that mission by supporting over 150 children from Child Care Institutions and HIV Positive Homes through:

- 📚 Setting up small libraries
- 🎒 Distributing educational materials
- 🎓 Educational guidance & mentoring
- 🏠 Supporting children (above 18) with aftercare education and basic needs

✨ You can be part of this change!
Support us in this mission by: 💸 Donating ₹200 / ₹500 / ₹1000- 9503284581
(Phone Pay- Google pay)
Or 🍱 Sponsoring a meal
🎁 Donating essential supplies

🙏 Thank you for supporting us and believing in our cause. Let’s make this year a true tribute to our reformers through action, love, and impact.
QaaZzẞÀÁAAÀQ
Warm regards,
AVHAN YOUTH FOUNDATION
Chhatrapati Sambhaji Nagar (Aurangabad), Maharashtra - 9503284581

"जल्लोष जयंतीचा महोत्सव विचारांचा"Organised by- AVHAN YOUTH FOUNDATIONश्री छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले आ...
09/04/2025

"जल्लोष जयंतीचा महोत्सव विचारांचा"

Organised by- AVHAN YOUTH FOUNDATION

श्री छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर* यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त
AVHAN YOUTH FOUNDATION च्या दहाव्या वार्षिक उपक्रमात सहभागी व्हा.

📅 १२ ते १५ एप्रिल २०२५
📍 छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), महाराष्ट्र.
आम्ही २०११ पासून छत्रपती संभाजीनगरमध्ये सामाजिक कार्य करत आहे. अनाथालयातील मुलांबरोबर काम करतोय. विशेषतः त्यांचे शिक्षण आणि संपूर्ण विकास यासाठी. आणि गेल्या १२ वर्षांपासून आम्ही HIV पॉझिटिव्ह मुलांसाठीही काम करत आहोत, जेणेकरून त्यांना अनाथालयापलीकडचे एक चांगले जीवन मिळू शकेल.

आम्ही स्थानिक स्वयंसेवी संस्थांना व निधी संकलन यामध्ये मदत करतो. आजपर्यंत आम्ही ८ लायब्ररी स्थापन केल्या आहेत व २५,००० पेक्षा अधिक पुस्तक दान केली आहेत. आम्ही मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण व ट्रान्सजेंडर समुदायाबरोबरही काम केले आहे.

महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आम्ही केवळ भाषणांपुरते मर्यादित न राहता, त्यांचा विचार आणि कार्य पुढे नेण्याचा खरा प्रयत्न करतोय. या वर्षी आम्ही १५० पेक्षा जास्त मुलांपर्यंत पोहोचत आहोत जे Child Care Institutions व HIV Positive Homes मध्ये राहतात, त्यांच्यासाठी:

- 📚 लहान लायब्रऱ्या उभारणे
- 🎒 शैक्षणिक साहित्य वाटप
- 🎓 उच्चशिक्षणासाठी मदत
- 🏠 १८ वर्षांवरील मुलां मुलीना मदत, जे सध्या आश्रमात राहत नाही. शिक्षण आणि मूलभूत गरजा प्रदान करणे

जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही मदत करू शकता.
💸 ₹200 / ₹500 / ₹1000rs.
Google Pay & Phone Pay
- 9503284581
(किंवा एकवेळचं जेवण प्रायोजित करा, आवश्यक वस्तूंची मदत)

🙏 तुमच्या सातत्यपूर्ण पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
चला, प्रेम, कृती आणि बदल* याच्या माध्यमातून या सर्व महापुरुषांना या वर्षी खरं अभिवादन करूया.

सप्रेम,
AVHAN YOUTH FOUNDATION
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), महाराष्ट्र
📞 9503284581

#जल्लोष_जयंतीचा_महोत्सव_विचारांचा

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादनअंधारात जन्मलेल्या अनेकांना डोळे मिटून आणि मनाची कव...
10/03/2025

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

अंधारात जन्मलेल्या अनेकांना डोळे मिटून आणि मनाची कवाडे बंद करून जगण्याची सवय होती. पण एका तेजस्वी माऊलीने जन्म घेतला आणि परंपरांच्या बुरुजांना सुरूंग लावला.

उंबरठ्याबाहेरची माती कपाळी लावून, मराठी स्त्रीने मुक्ततेच्या मार्गावर पहिली स्वच्छंद भरारी घेतली. अडाणीपणाचा अंधकार नाकारून, ज्ञानप्रकाशाला जीवनाचे ध्येय बनवणाऱ्या त्या सावित्रीमाई फुले!

!! विनम्र अभिवादन !!
💐💐💙

स्वतःला पाळी किती दिवसांनी येते हे ही न सांगता येणाऱ्या आदिवासी महिलांसोबत समाजबंधच्या आरोग्यसखी गडचिरोलीत काम करतात. हे...
17/02/2025

स्वतःला पाळी किती दिवसांनी येते हे ही न सांगता येणाऱ्या आदिवासी महिलांसोबत समाजबंधच्या आरोग्यसखी गडचिरोलीत काम करतात. हे महिलांना शिकवण्यासाठी आम्हाला २०२५ चे कॅलेंडर हवे आहेत. बँक, पतसंस्था, LIC, विविध मंडळं, संस्था दरवर्षी मोफत वाटपासाठी कॅलेंडर छापत असतात, आपल्या परिचयातील अशा लोकांकडून कॅलेंडर मिळवून देण्याची मदत करा. धन्यवाद!

Address

Aurangabad
431001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Avhan Youth Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Avhan Youth Foundation:

Share

Category