01/02/2024
"सदरक्षणाय खलनिग्रहणाय" हे वाक्य वास्तवात आणण्यासाठी झटणाऱ्या पोलिस कर्मचारी, अधिकारी यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करण्यासाठी दिव्य मराठी पोलिस सन्मान २०२४ हा अवॉर्ड लोहमाग॔ पोलीस छत्रपती संभाजीनगर घटकातील काही अधिकारी व अमंलदार यांना पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम साहेब यांच्या हस्ते देण्यात आला....
लोकशाहीचा चौथा स्तंभ वर्तमानपत्र हा पोलिसाच्या कामावर सतत लक्ष ठेवून असतो पोलिसाने केलेल्या चांगल्या कामाच्या बातम्या प्रसारित करणे तसेच केलेल्या चुकीचा देखील उघड करणे हे वर्तमानपत्राचे काम असते मागील वर्षभरात आम्ही पोलीस स्टेशन येथे केलेल्या चांगल्या कामाचा गुणगौरव भारतातील व जगातील नामांकित असलेल्या दैनिक भास्कर समूहाच्या दिव्य मराठी तर्फे छत्रपती संभाजी नगर शहर /छत्रपती संभाजी नगर ग्रामीण/ छत्रपती संभाजी नगर लोहमार्ग व छत्रपती संभाजी नगर एक्साईज डिपार्टमेंट या खात्यातील चांगले काम केलेल्या अधिकाऱ्यांचा व अमलदारांचा छत्रपती संभाजी नगर येथील नामांकित हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे काल गुणगौरव करून मा. उज्वल निकम यांच्या हस्ते मा. मनोज लोहिया सर पोलीस आयुक्त छत्रपती संभाजी नगर, मा. मोक्षदा पाटील मॅडम पोलीस अधीक्षक लोहमार्ग छत्रपती संभाजी नगर यांच्या व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार पोनि/शरद जोगदंड, पोनि/विजय घेरडे, सपोनि/अमोल देशमुख, सपोनि/प्रेमलता जगताप, सपोनि/वर्षा व्हगाडे, सपोनि/जयश्री कुलकर्णी, मपोहवा/मुंडे, मपोशी/ठक्कर, पोशी/पराते, पोशी/पाटील यांना देण्यात आले. सामाजिक क्षेत्रात वर्तमान पत्राकडून मिळालेला हा पुरस्कार पुढील कामासाठी ऊर्जादायी ठरेल.