सत्यजीत साळवे

सत्यजीत साळवे आजाद विचारो का आजाद व्यक्ती...

11/05/2026
या देशातील सर्वच लोकं बौद्ध होते... त्यांना जातीमध्ये मनुवाद्यानी विभाजित केलेले आहे... याचा अर्थ ते बौद्ध नाहीत असे नाह...
11/05/2026

या देशातील सर्वच लोकं बौद्ध होते... त्यांना जातीमध्ये मनुवाद्यानी विभाजित केलेले आहे... याचा अर्थ ते बौद्ध नाहीत असे नाही... ते कोणत्याही जातीचे किंवा धर्माचे असो ते सर्वप्रथम बौद्ध होते... त्यानंतर ते विभाजित होत गेले... पहिले ब्राम्हण धर्मात चातुर्वर्ण्य व्यवस्थेत, ब्राम्हणी धर्मातील शूद्रांना हिंदू (भौगोलिक सिंधू नदीच्या पलीकडील लोकं) कारण ब्राम्हण हे विदेशी लोकं भारतातील लोकांना हिंदू म्हणून ओळखत असतं... त्यानंतर हिंदूमध्ये जाती निर्माण करण्यात आल्या त्या व्यवसायाच्या आधारावर निर्माण करण्यात आल्या.... त्यातील काही जाती ज्या बौद्ध धम्माच्या शिवाय कुठल्याच धर्माला मनात नव्हत्या त्यांना अस्पृश्य बनविण्यात आल्या... त्यानंतर इस्लाम चे आगमन झाले तेव्हा याच शूद्रांनी इस्लाम मधील समता बघून मोठ्या प्रमाणात इस्लामा धर्म स्विकारला... तसेच मुघल राजांनी एकछत्री अंमल प्रस्तापित केल्यानंतर सुरक्षित राहण्यासाठी सुद्धा बऱ्याच प्रमाणात मुस्लिम धर्म स्विकारला गेला... काहींनी सत्तेसाठी सुद्धा इस्लाम स्वीकारल्याचा इतिहास आहे... त्यानंतर शिख आणि शूद्र स्वतः राज्य प्रस्थापित करण्यात यशस्वी झाले तेव्हा शूद्र ज्यांना मुस्लिम राजांनी हिंदू अशी ओळख दिली त्या हिंदू आणि मुस्लिम राजांनी मिळून या देशावर राज्य केले... त्यानंतर इंग्रजी राजवटीत बरेच भारतीय पुन्हा ख्रिश्चन झाले... त्यात बहुतांश लोकं अस्पृश्य समाजातील होते कारण ख्रिश्चन मिशनरी लोकांनी येथे सुरु केलेल्या शाळा, दवाखाने आणि आर्थिक सुविधा यामुळे सुद्धा बरेच लोकं ख्रिश्चन झालेत... आज पुन्हा काही लोकं घरवपासी च्या नावाने हिंदू धर्मात परत घेण्यासाठी अभियान चालवत आहेत... पण त्या भामट्यांना हा इतिहास माहित नाही का..? की या देशात घरवपासी करायची असेल तर ती बौद्ध धम्मात करावी लागेल... तोच या देशाचा मुळ धम्म आणि स्वतःचे मुळ घर आहे... या देशातील सर्व जाती या बौद्ध धम्माच्या लोकांचे वर्गीकरण करुन तयार करण्यात आलेल्या आहेत... म्हणून फक्त एकाच जातीचे लोकं बौद्ध आहेत बाकीचे नाहीत असा अपप्रचार करणे बौद्ध धम्माच्या ऱ्हासाचे मुळ कारण आहे... म्हणून जाती सध्या प्रशासकीय कामकाजासाठी त्यांना मुख्य धारेत आणण्यासाठी तयार करण्यात आलेली एक सूची आहे... म्हणून त्याची गणना शासकीय योजना राबविण्यासाठी होत असेल तर आवर्जून आपली जात नमूद करायला हरकत नाही... पण आपला धर्म लिहितांना हिंदू लिहिण्याऐवजी तो बौद्धच लिहावा... आणि तो या देशातील प्रत्येक नागरिकांनी लिहावा... मग तो कोणत्याही जातीचा असो...

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजाच्या लोकांना बौद्ध धम्माची दिक्षा दिली म्हणून ते बौद्ध आणि इतर जातीच्या लोकांना देत आली नाही किंवा त्यांना घेता आली नाही किंवा ते अज्ञानातून आजही आपला मुळ धम्म सोडून हिंदू, मुस्लिम, शिख किंवा ख्रिचन (ईसाई) लिहित असतील तरीही ते काही या देशाच्या बाहेरुन आलेले लोकं नाहीत... त्यांचे ब्राम्हणी धर्माने वर्गीकरण करुन करुन या देशातील मूळनिवासी लोकांचे अस्तित्व बुजून टाकलेले आहे... ते परत उत्खनन करुन आपल्या सर्वांना बाहेर काढायचे आहे... या देशात बुद्ध सोडून इतर कुणीच मातीत सापडणार नाही... म्हणून या देशातील प्रत्येक नागरिकांनी आपला धम्म बौद्ध लिहावा... आरक्षण हे जातीला देण्यात आलेले असल्याने ते सामाजिक मागास लोकांना दिलेले आहे... आणि ब्राम्हणी व्यवस्थेने या देशातील अनुसूचित जातीच्या ५९ जाती यांना अस्पृश्य ठरवून अजिवेकेचे कोणतेच साधन उपलब्ध करुन दिले नाही... अनुसूचित जमाती मधील ४७ जातींना शुद्ध ब्राह्मणांनी कोणतेही अधिकार दिले नाही ते संविधानात मिळाले... पण पूर्वाश्रमीचा बौद्ध ज्याला शूद्र बनविण्यात आले होते त्या सर्वांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी इतर मागासवर्गीय म्हणून त्यांना हक्क आणि अधिकार मिळावेत म्हणून कलम ३४० नुसार तजवीज करून ठेवलेले आहे... ते सर्व ओबीसी कधीकाळी बौद्ध होते पण बौद्ध लोकांच्या कत्तली केल्याने त्यांनी सावध पवित्रा घेत ब्राम्हणी धर्मात शूद्र म्हणून शरणागती पत्करली आणि आपला जीव वाचविला... तरीही बौद्ध धम्माचे तत्व त्यांनी सोडले नाही... आजचा वारकरी हे त्याचे जिवंत उदाहरण आहे... ज्या दिवशी ओबीसी जागृत होईल त्या दिवशी या देशाला पुन्हा बौद्धमय करण्यापासून कुणीच रोकू शकणार नाही... ओबीसी जेव्हा पुन्हा घर वापसी करतील त्या दिवशी पुन्हा हा देश विश्वगुरु बनेल... सोन्याचा धूर बौद्धमय भारतात निघत होता... बाकीच्यांची ही भूमी नाही म्हणून त्यांनी या देशाला फक्त लुटण्याचे काम केलेले आहे... म्हणून SC, ST आणि OBC च्या प्रत्येक व्यक्तीने आपला मुळ धम्म बौद्धच लिहिलाच पाहिजे तसेच वैश्य आपला धर्म जरी जैन लिहित असतील तरीही ते हिंदू जीवन पद्धतीने जीवन जगत आहेत... आणि उर्वरित जे स्वतःला उच्च वर्णीय किंवा क्षत्रिय समजतात त्यांना स्पष्ट सांगू इच्छितो की ब्राम्हण परशुरामाने सलग २१ वेळा पृथ्वी निक्षत्रिय केलेली असल्याने सध्या कुणाची या जगात क्षत्रिय नाही... फक्त ब्राम्हण आणि त्याने उभी केलेली व्यवस्था अबाधित रहावी यासाठी वेळोवेळी त्यांनी शूद्रातील काही जातीला क्षत्रिय असल्याचा दर्जा दिलेला आहे... ते मुळात क्षत्रिय नाहीत... म्हणून एकंदरीत ब्राम्हण सोडले तर या देशात सर्वांच्या सर्व लोकं ही बौद्ध आहेत... बाकी काहीच नाही...

या जनगणनेत आपण आपली जात जी कधी आपला व्यवसाय होती ती तर लिहावीच पण आपला मूळ धम्म बौद्ध धम्माची धर्माच्या रकान्यात नोंद करावी... आणि आपल्या मुळ घरात घर वापसी करावी असे सर्व भारतीयांना आवाहन करतो...

आपला बांधव
#सत्यजित_आजाद

27/04/2026

#बौध्दमय_भारत

12/03/2026

#उद्योजक_व्हा

Address

Main Road Sanjay Nagar Mukundwadi
Aurangabad
431001

Alerts

Be the first to know and let us send you an email when सत्यजीत साळवे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category