वंजारी सेवा संघ परिवार ठाणे विभाग

  • Home
  • India
  • Aurangabad
  • वंजारी सेवा संघ परिवार ठाणे विभाग

वंजारी सेवा संघ परिवार ठाणे विभाग Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from वंजारी सेवा संघ परिवार ठाणे विभाग, Social service, बी-१/१-४, मयुर पार्क, हरसुल, औरंगाबाद(संभाजीनगर), Aurangabad.

“सूर्यस्य उत्तरायण-प्रवेशे सर्वत्र मंगलम्!शुभे मकरसंक्रान्तौ देवताः कृपां वर्षयन्तु।तिल-गुडस्य मधुरता यथा जीवनं भवतु मधु...
14/01/2026

“सूर्यस्य उत्तरायण-प्रवेशे सर्वत्र मंगलम्!
शुभे मकरसंक्रान्तौ देवताः कृपां वर्षयन्तु।
तिल-गुडस्य मधुरता यथा जीवनं भवतु मधुरम्!
सर्वेभ्यः मकरसंक्रान्ति-शुभाशयाः!”

*वैराग्यमुर्ती संत वामनभाऊ आणि ऐश्वर्यसंपन्न संत भगवानबाबा यांच्या संयुक्त पुण्यतिथी निमित्त तीन दिवसीय*            *‼️भ...
10/01/2026

*वैराग्यमुर्ती संत वामनभाऊ आणि ऐश्वर्यसंपन्न संत भगवानबाबा यांच्या संयुक्त पुण्यतिथी निमित्त तीन दिवसीय*
*‼️भव्य किर्तन सोहळा‼️*

*!! आजचे किर्तनकार !!*
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा किर्तनकार
*भागवताचार्य ह.भ.प.श्री.जगदीश महाराज सोनवणे (अध्यक्ष-रत्नेश्वर वारकरी शिक्षण संस्था टोकवाडी,परळी वै.जि.बीड).*
- गायणाचार्य:-
-ह.भ.प.गोरख महाराज गतीर (इगतपुरी, नाशिक).
-ह.भ.प.दशरथ महाराज केणे(कोंधेरी, टिटवाळा)
- मृदंगचार्य:-
-ह.भ.प.इंजि.विनोदा महाराज नागरगोजे (आळंदी, पुणे)
-ह.भ.प.आकाशा महाराज

*।। कार्यक्रम स्थळ ।।*
KDMC खुले मैदान,लोकनेते गोपिनाथराव मुंडे अग्निशामन दल केंद्राच्या पाठीमागे,क्लब हाऊस च्या बाजुला, रिजन्सी सर्वम,गणेश मंदिर रोड,मांडा, टिटवाळा(पूर्व), ता.कल्याण,जि.ठाणे.
🚩🚩🚩💐🪷🕉️🪷💐🚩🚩🚩
*।। 🙏🏻निमंत्रक🙏🏻।।*
राष्ट्रसंत भगवानबाबा सेवा मंडळ, टिटवाळा, ता.कल्याण, जि.ठाणे

*वैराग्यमुर्ती संत वामनभाऊ आणि ऐश्वर्यसंपन्न संत भगवानबाबा यांच्या संयुक्त पुण्यतिथी निमित्त मागीलवर्षी प्रमाणे यावर्षी ...
09/01/2026

*वैराग्यमुर्ती संत वामनभाऊ आणि ऐश्वर्यसंपन्न संत भगवानबाबा यांच्या संयुक्त पुण्यतिथी निमित्त मागीलवर्षी प्रमाणे यावर्षी तीन दिवसीय*
‼️भव्य किर्तन सोहळा‼️

*!! आजचे किर्तनकार !!*
*ह.भ.प.आईसाहेब राधाताई सानप (महंत)*
*श्री क्षेत्र मीराबाई संस्थान,ता.पाटोदा,जि.बीड*

*।। कार्यक्रम स्थळ ।।*
KDMC खुले मैदान,लोकनेते गोपिनाथराव मुंडे अग्निशामन दल केंद्राच्या पाठीमागे,क्लब हाऊस च्या बाजुला, रिजन्सी सर्वम,गणेश मंदिर रोड,मांडा, टिटवाळा(पूर्व),ता.कल्याण,जि.ठाणे.
🚩🚩🚩💐🪷🕉️🪷💐🚩🚩🚩
*।। 🙏🏻निमंत्रक🙏🏻।।*
राष्ट्रसंत भगवानबाबा सेवा मंडळ, टिटवाळा, ता.कल्याण, जि.ठाणे

सप्रेम नमस्कार 🙏🚩 रामकृष्ण हरी माऊली 🚩"जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्""जयतु जयतु भारतम्" आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे ...
03/01/2026

सप्रेम नमस्कार 🙏🚩
रामकृष्ण हरी माऊली 🚩

"जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्"
"जयतु जयतु भारतम्"

आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे कि,मागीलवर्षीप्रमाणे याही वर्षी आपली वारकरी संत परंपरा आणि धर्म जागरण या उद्देशाने
वैराग्यमुर्ती संत वामनभाऊ आणि थोर समाजसुधारक, ऐश्वर्यसंपन्न संत भगवानबाबा यांच्या संयुक्त पुण्यतिथी निमित्त तीन दिवसीय "भव्य किर्तन सोहळा" श्री क्षेत्र टिटवाळा नगरीत येणार्‍या शुक्रवार दि.९ ते रविवार दि.११ जानेवारी ,२०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
मागील वर्षी आपल्या सर्वांच्या आशिर्वादामुळे, सहकार्याने, सहयोगाने, मदतीने तीन दिवसीय किर्तन सोहळा ऐतिहासिक आणि भव्य दिव्य स्वरूपात संपन्न झाला होता.
यावेळी सुद्धा आम्हाला आपल्या आशीर्वादाची, उपस्थितीची, सहकार्य व सहयोगाची अपेक्षा आहे. आपण सहपरिवार या धार्मिक कार्यात तीनही दिवस सहभागी व्हावे ही आपणास नम्र विनंती आहे.🙏
🚩🚩🚩🚩🪷🪷🚩🚩🚩🚩
आपले नम्र 🙏
राष्ट्रसंत भगवानबाबा सेवा मंडळ, मांडा -टिटवाळा, ता.कल्याण, जि.ठाणे

👏🏻 क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक 👏🏻————————————————————संपूर्ण नाव – वसंतराव नारायणराव नाईकजन्म दि. – १३ डिसेंबर १९१...
13/12/2025

👏🏻 क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक 👏🏻
————————————————————
संपूर्ण नाव – वसंतराव नारायणराव नाईक
जन्म दि. – १३ डिसेंबर १९१२
मृत्यु दि.—१४ डिसेंबर १९६८
जन्म स्थान – मनमाड
आईचे नाव – उमाबाई नारायणराव नाईक
भावंडे – विश्वासराव,पंडितराव,रामकृष्ण आणि बहिण सुशीला (वसंतराव भावंडात सर्वात मोठे)
शिक्षण – वेहेळगाव,मनमाड,नाशिक,मुंबई
(एलिफंट कॉलेज)

# वसंतरावांचे कार्य #
१)१९२७ –सायमन कमिशन ला विरोध (मुंबई)
२)१९३० – मीठ सत्याग्रहात सहभाग (६ महिने सक्तमजुरी)
३)१९३२ – ‘सरकारी टाकसाळ ‘सत्याग्रह (२महिने तुरुंगवास )
४).१९३७—मुंबई असेंम्बली ची निवडणुक
जिंकली व सर्वात तरुण अामदार
५)१९४६- मुंबई असेंब्लीची निवडणूक जिंकली (दुसऱ्यांदा)
६)१९५२ -मुंबई असेंब्लीची निवडणूक जिंकली (तिसऱ्यांदा)
७)१९५२-अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष (फैजपूर जि.जळगाव )
८)१९५७-मनमाड नगरपालिकेचे पहिले अध्यक्ष
९)१९६२-महाराष्ट्र विधानसभेत प्रचंड मताने निवडून गेले.
१०)१९६२-वसंतराव महाराष्ट्र राज्य एस.टी.महामंडळाचे अध्यक्ष झाले.
निधन-१४ डिसेंबर १९६८ (भूसावळ येथे निधन)
अंत्यविधी – यशवंतराव पटांगण,गोदातट,नाशिक.
आज क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक यांची जयंती (१३ डिसेंबर) आणि पुण्यतिथी(१४ डिसेंबर) निमित्त क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक साहेब यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम.....!
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री.अनिल देविदास फड
प्रदेशाध्यक्ष,वंजारी सेवा संघ(असो.) महा.राज्य

अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती, कल्याण(रजि. क्र. महा/233/99/ठाणे)बहुदल नायक संघर्ष पुरुष, वंजारी दैवत ओबीसींचा बुलंद ...
11/12/2025

अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती, कल्याण
(रजि. क्र. महा/233/99/ठाणे)

बहुदल नायक संघर्ष पुरुष, वंजारी दैवत ओबीसींचा बुलंद आवाज, माजी केंद्रीय मंत्री,माजी उपमुख्यमंत्री
*लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे साहेब*
यांच्या 76 व्या जयंती निमित्त
‼️अभिवादन कार्यक्रम‼️

प्रमुख पाहुणे :

श्री.अनिल फड
कार्यवाह, डीएनटी फाउंडेशन दिल्ली

श्री. विक्रम बोडके
अध्यक्ष,जगदंबा ट्रस्ट आणि
जगदंबा नागरी सहकारी पतसंस्था उल्हासनगर

*👉दि. 12 डिसेंबर 2025 रोजी सायं. 7.00 वा.*
*👉ठिकाण :- वंजारी भवन, हिंदुस्थान को.ऑ. बॅंकेजवळ,
पुष्करधाम सोसायटी,खडकपाडा, कल्याण (प.) 421301

आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे!

🙏🙏आपले नम्र 🙏🙏

श्री. शंकरराव आव्हाड — अध्यक्ष
श्री. ज्ञानेवर धात्रक — कार्याध्यक्ष
श्री. अर्जुन डोमाडे — सरचिटणीस
श्री. रामनाथ दौंड— कोषाध्यक्ष
श्री. आत्माराम फड (सर) — जयंती समिती अध्यक्ष

04/12/2025

*🛑महत्वपूर्ण व्यापक नियोजन बैठक🛑*

सर्व समाज बांधवाना सप्रेम नमस्कार आणि जय भगवान🚩🙏

वैराग्यमुर्ती संत वामनभाऊ आणि ऐश्वर्यसंपन्न संत भगवानबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त टिटवाळा शहरात येणार्‍या ०९ ते ११ जानेवारी ,२०२६ रोजी मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी *"भव्य कीर्तन सोहळ्या"* च्या आयोजन बाबतची महत्वपूर्ण व्यापक नियोजन बैठक रविवार दिनांक ०७/१२/२०२५ रोजी सकाळी ९ आयोजित करण्यात आली आहे.

याबद्दल प्राथमिक बैठक ऑगस्ट, २०२५ आणि २३/११/२०२५ रोजी घेण्यात आली होती.स्थळ, महाराज व भजनी मंडळी आणि वर्गणी याबाबतची प्राथमिक चार हा झाली असून आता अंतिम नियोजन करणे गरजेचे आहे.
मागील वर्षी आपला कार्यक्रम हा संत भाऊ बाबा यांच्या आशिर्वादामुळे याभागातील ऐतिहासिक असा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या मेहनतीमुळे, योगदानामुळे, सहकार्याने आणि मार्गदर्शने संपन्न झाला आणि या पंचक्रोशीत समाजचे नाव उज्वल झाले आहे.त्यामुळे निश्चितच यावर्षी सुद्धा सर्वजण खूप उत्सुक आहेत.
आपल्या कार्यक्रम साठी आता फक्त एक महिना शिल्लक राहिला आहेत आणि नियोजन फार मोठे आहे.
महाप्रसाद,निमंत्रण पत्रिका,पावती पुस्तक,वर्गणी इत्यादी नियोजन आणि इतर विषयावर चर्चा करण्यात येणार आहे.
कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी हि नम्र विनंती आणि जास्तीत जास्त संख्येने समाजबंधवानी रविवार दिनांक ०७ डिसेंबर च्याबैठकीला उपस्थित राहावे आणि मार्गदर्शन करावे.

*🌷⏰दिनांक व वेळ⏰🌷*
*रविवार दि.७ डिसेंबर,२०२५.*
*सकाळी ९ वा.*

*🌷🏠 स्थळ 🏠🌷*
*रेजन्सी सर्वम गार्डन परिसरातील मधिल मध्यवर्ती गार्डन, उड्डाण पुलाच्या बाजूला असलेले ठिकाण (जिथे आपण नेहमी बैठक घेतो),मांडा, टिटवाळा (पूर्व)*

🙏🏻🙏🏻🌷💐🤝🏻🤝🏻💐🌷🙏🏻🙏🏻
*।। 🙏🏻निमंत्रक🙏🏻।।*
राष्ट्रसंत भगवानबाबा सेवा मंडळ, टिटवाळा, ता.कल्याण, जि.ठाणे

*🙏🌷!! सस्नेह निमंत्रण 🌷🙏!!*स.न.वि.वि.,आपणास कळविण्यात येते कि,वंजारी सेवा संघ(असो.)कल्याण जिल्हा यांच्या वतिने *दिवंगत क...
03/12/2025

*🙏🌷!! सस्नेह निमंत्रण 🌷🙏!!*

स.न.वि.वि.,
आपणास कळविण्यात येते कि,वंजारी सेवा संघ(असो.)कल्याण जिल्हा यांच्या वतिने *दिवंगत केंद्रिय मंत्री,बहुजनऱ्हदयम्राट लोकनेते स्व.गोपिनाथरावजी मुंडे साहेब* यांच्या जयंतिनिमित्त *रविवार दि.१४ डिसेंबर,२०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वा. पर्यंत* कार्यक्रम आयोजित केला आहे.
तरि आपण कार्यक्रमाला उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती.

*🔹कार्यक्रमाची रुपरेषा🔹*
👉🏻सकाळी ९ ते १० :- प्रतिमा पुजन
👉🏻सकाळी १० ते १२:-
*भागवताचार्य ह.भ.प. श्री जगदीश महाराज सोनवणे (अध्यक्ष-रत्नेश्वर वारकरी शिक्षण संस्था टोकवाडी,परळी वै.जि.बीड) यांचे किर्तन.*

👉🏻दुपारी १२ ते १:-प्रमुख मान्यवर व परिसरातील वविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार.

👉🏻दुपारी १ ते ३:- महाप्रसाद

*पवित्र तुमची स्मृती,*
*अनंत तुमची माया*
*नित्य असू द्या आमच्यावरती*
*अखंड तुमची छाया...*


*🌷⏰दिनांक व वेळ⏰🌷*
*रविवार दि.१४ डिसेंबर,२०२५.*
*सकाळी ९ ते दुपारी ३ वा.*

*🌷🏠 स्थळ 🏠🌷*
*श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर(पर्णकुटी),स्वानंद आध्यात्म ज्ञानपीठ,चिकणीपाडा,कल्याण (पुर्व), कल्याण,जि.ठाणे*

🙏🏻🙏🏻🌷💐🤝🏻🤝🏻💐🌷🙏🏻🙏🏻

*🙏🏻निमंत्रक🙏🏻*
श्री.विष्णू शिवराम सांगळे
- जिल्हाध्यक्ष, भाजप (भ. वि. आघाडी), कल्याण जिल्हा
- विभाग अध्यक्ष, वंजारी सेवा संघ (असो.), ठाणे-पालघर विभाग.
श्री. विठ्ठल बडे
सरचिटणीस,वंजारी सेवा संघ (असो.), ठाणे-पालघर विभाग.
श्री.कृष्णा सोमनाथ आव्हाड
जिल्हाध्यक्ष,कल्याण जिल्हा
सौ. शोभाताई आव्हाड
जिल्हाध्यक्षा, वंजारी सेवा sangh(असो.)महिला आघाडी,कल्याण जिल्हा
श्री.संजय दराडे
अध्यक्ष,कल्याण पूर्व
श्री.विलास दराडे
जिल्हा सरचिटणीस,वंजारी सेवा संघ (असो.) कल्याण जिल्हा
श्री.शांताराम सोनवणे
जिल्हा उपाध्यक्ष,वंजारी सेवा संघ(असो.) कल्याण जिल्हा
श्री. मोहन आव्हाड सर
अध्यक्ष, कल्याण पश्चिम
श्री. वसंत पानसरे
अध्यक्ष, कल्याण ग्रामीण

*मार्गदर्शक :-*
ह.भ.प. चंद्रभान महाराज सांगळे
ह.भ.प.जगन्नाथ महाराज नेहरकर
ह.भ.प.साहेबराव महाराज सानप
ह.भ.प.शिवाजी महाराज धुमाळ
ह.भ.प. राजाराम महाराज सानप
ह.भ.प. कृष्णा महाराज भाबड

*सहकार्य:-*
वंजारी सेवा संघ(असो.)परिवार कल्याण जिल्हा (कल्याण पुर्व/पश्चिम/ग्रामीण/डोंबिवली/टिटवाळा),समस्त रेल्वे कर्मचारी ग्रुप(मध्य व पश्चिम लाईन), जय मल्हार भजनी मंडळ कल्याण पूर्व,जय मल्हार प्रतिष्ठान,संत भगवानबाबा विचारमंच कल्याण (पूर्व), संत भगवानबाबा सेवा मंडळ आडिवली,संत भगवान बाबा सेवा मंडळ टिटवाळा,कल्याण ग्रामीण,भीमाशंकर भजनी मंडळ,कल्याण शहर वारकरी संप्रदाय प्रबोधन ट्रस्ट,जय मल्हार महिला भजनी मंडळ कल्याण पूर्व आणि कल्याण पूर्व शहरातील सर्व भजनी मंडळे यांचे सहकार्य राहील.
Pankaja Gopinath Munde
Pritam Gopinath Munde
Pritam Gopinath Munde
Dr Pritam Gopinath Munde
Gopinath Munde - गोपीनाथ मुंडे

जय बजरंग कुस्ती आखाडा, नांदिवली, कल्याण पूर्व येथील मल्ल पै. यश ढाकणे ची राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण कामगिरी      कल्याण आड...
20/11/2025

जय बजरंग कुस्ती आखाडा, नांदिवली, कल्याण पूर्व येथील मल्ल पै. यश ढाकणे ची राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण कामगिरी
कल्याण आडीवली येथील रहिवासी श्री. श्याम ढाकणे यांचा मुलगा पै. यश ढाकणे याने नुकत्याच देहराडून, उत्तराखंड येथे पार पडलेल्या राष्ट्रीय ग्रेपलिंग कुस्ती स्पर्धेत 66 किलो वजनी गटात सुवर्ण पदकाची कमाई केली असून पै. यश याची जागतिक स्पर्धेसाठी भारत देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झालेली आहे. त्याने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे विविध सामाजिक माध्यमातून कौतुक केले जात आहे.
पै. यश चे वडील श्री. श्याम ढाकणे हे मूळचे मौजे धुळवड, ता. सिन्नर, जि. नाशिक येथील डोंगराळ वस्तीतून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ठाणे शहर पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून नोकरी करीत असून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. पै. यश याने कुस्तीचे धडे वस्ताद पै. प्रज्वलदीप ढोणे यांचे मार्गदर्शनाखाली जय बजरंग कुस्ती आखाडा, नांदिवली, कल्याण पूर्व येथून गिरविण्यास सन २०२१-२२ साली सुरवात केली. मुलाची जिद्द, मेहनत बघून वस्ताद प्रज्वलदीप ढोणे, किरण सोनवणे, रामदास उगले आणि वडील श्याम ढाकणे यांनी त्यास कुस्तीचे पुढील शिक्षणासाठी 06 महिने कोच जसबीर सिंग यांचे कडे हिस्सार, हरियाणा येथे पाठविले. तेथून पै. यश यास गुरू विरेंद्र कोच नरेला, दिल्ली येथे सुमारे 03 वर्ष कुस्तीचा सराव केला. सध्या तो सेना केसरी पै. गुंडाजी पाटील, कोल्हापूर यांचे कडे कुस्तीचा सराव करीत आहे. पै. यशच्या यशात आज पर्यंत सर्व वस्ताद, हितचिंतक, सहकारी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले त्याबद्दल वडील श्याम ढाकणे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. आज पर्यंतच्या प्रवासात वस्ताद पै. प्रज्वलदीप ढोणे, पै. गणेश पाटील, पै. किरण सोनवणे, पै. वासुदेव साळुंके, गुरू जसबीर सिंग, गुरू विरेंद्र कोच, पै. Adv. विशाल बलकवडे, पै. अतिष तोडकर, पै. वैष्णवी पाटील,सेना केसरी पै. वस्ताद गुंडाजी पाटील, मामा - रामदास उगले, शिक्षक श्री. बेनके सर, श्री. सोमनाथ काळे, श्री. बी. आर. आव्हाड यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. पै. यश चे भारतासाठी ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक मिळविण्याचे स्वप्न आहे, त्यासाठी वडील श्री. श्याम ढाकणे देखील मुलाचे पाठीशी खंबीरपणे उभे असून प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे.

17/10/2025
*सांगड सामाजिक संस्था टिटवाळा,जि. ठाणे*        *नोंदणी क्र. महा/१३२१/२०१९/ठाणे*        *।। दिवाळी दान महोत्सव २०२५ ।।*नम...
09/10/2025

*सांगड सामाजिक संस्था टिटवाळा,जि. ठाणे*
*नोंदणी क्र. महा/१३२१/२०१९/ठाणे*

*।। दिवाळी दान महोत्सव २०२५ ।।*

नमस्कार🙏
या दिवाळीला चला आपण सर्व मिळून महाराष्ट्रातील अनाथ, उसतोड कामगारांची मुले, आदिवासी मुले, दुर्धरआजारग्रस्त, अपंग तथा वंचित बालकांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करूयात.
दरवर्षी प्रमाणे यंदाची दिवाळीही खर्या अर्थाने वंचितांसाठी साजरी करण्याचे समाधान मिळविण्यासाठी आदिवासी,वंचितांचे आधार बनण्याचा प्रयत्न करुयात..
सालाबादप्रमाणे याही वर्षी आपण दिवाळी खासकरून अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेल्या मराठवाड्यातील शतकऱ्यांची मुले,आत्महत्या ग्रस्त शेतकरी बांधवांची अनाथ मुले, तसेच ऊसतोड कामगारांची मुले ज्या संस्थेत राहतात त्या सामाजिक संस्थांना....
*१) शांतीवन*,
*२) बालग्राम*,
*३) पसायदान*
तसेच तमाशा कलावंतांची मुले सांभाळणारी संस्था म्हणुन जी प्रसिद्ध आहेत अशी.
*४) सेवाश्रम*
यांसोबत साजरी करणार आहोत. तसेच त्यांना झालेल्या पुरग्रस्त परिस्थितीमधुन सावरण्यास हातभार लावणार आहोत.

पणतीने पणती प्रज्वलीत व्हावी,
आजुबाजुंचा अंधकार विरत जावा!
प्रकाशाचे किरण आयुष्याची पहाट,
रचनात्मक कामांच्या पुजेने उजळुन जावी!!

आपण आपली मदत १०० व १०० च्या पटीत कितीही करु शकता.

*👉मदतीसाठी खाते:-*
सांगड सामाजिक संस्था
बॅक खाते क्र. 921010001898164
ॲक्सिस बॅंक टिटवाळा शाखा
IFSC code- UTIB0003998
UPI ID- mab.037322039980374@axisban

23/07/2025

🙏🏻🌷🪷 सस्नेह निमंत्रण 🪷🌷🙏🏻

स.न.वि.वि.
आपणास कळविन्यात येते कि,राष्ट्रीय सचिव भाजपा तथा सहप्रभारी मध्यप्रदेश*लोकनेत्या ना.पंकजाताई गोपीनाथराव मुंडे(मंत्री,पर्यावरण व वातावरणीय बदल,पशुसवंर्धन महाराष्ट्र शासन)* यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक सेवा उपक्रम अभियान अंतर्गत *रविवार दि.२७ जुलै,२०२५ रोजी सकाळी १०:०० वा.* *पारस बालभवन,म्हसकळ येथे खाऊ वाटप आणि सका. ११ वा.ग्रामीण रुग्नालय,गोवेली येथे फळे वाटप व वृक्षारोपन* कार्यक्रम आयोजित केला आहे.
तरि आपण कार्यक्रमाला उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती.

*⏲दिनांक व वेळ⏲*
*रविवार,दि.२७ जुलै,२०२५*
*सकाळी १० ते ११ वा.*

*🏠ठिकाण🏠*
*पारस बालभवन,म्हसकळ तथा ग्रामीण रुग्नालय,गोवेली ता.कल्याण,जि.ठाणे*

🙏🏻🙏🏻🌷🌷👏🏻👏🏻🌷🌷🙏🏻🙏🏻

*🙏🏻🌷 निमंत्रक 🌷🙏🏻*
वंजारी सेवा संघ(असो)परिवार,मांडा-टिटवाळा
भाजपा(भटके विमुक्त आघाडी)मोहने-टिटवाळ मंडळ.
राष्ट्रसंत भगवानबाबा सामाजिक समरसता प्रतिष्ठाण,टिटवाळा आणि जिजाई प्रतिष्ठाण महाराष्ट्र,टिटवाळा.

Address

बी-१/१-४, मयुर पार्क, हरसुल, औरंगाबाद(संभाजीनगर)
Aurangabad
४३१००८

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when वंजारी सेवा संघ परिवार ठाणे विभाग posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category