रिपब्लिकन विद्यार्थी सेना,महाराष्ट्र.

  • Home
  • India
  • Aurangabad
  • रिपब्लिकन विद्यार्थी सेना,महाराष्ट्र.

रिपब्लिकन विद्यार्थी सेना,महाराष्ट्र. Student wing of Republican Sena

आता सूर्यफुलांसारखे सूर्योन्मुख झालेच पाहिजे...व्हा, रे.. आता शहाणे शोधू नका' बहाणे.. आपलीच' लोक 'हरली आपल्यातल्या तहा' ...
15/02/2026

आता सूर्यफुलांसारखे सूर्योन्मुख झालेच पाहिजे...

व्हा, रे.. आता शहाणे शोधू नका' बहाणे.. आपलीच' लोक 'हरली आपल्यातल्या तहा' ने...!

पद्मश्री नामदेव ढसाळ
जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!




रिपब्लिकन विद्यार्थी सेना,महाराष्ट्र.

सर्व माध्यम प्रतिनिधींचे मनःपूर्वक आभार!डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागातील दुर्मिळ पक्...
14/02/2026

सर्व माध्यम प्रतिनिधींचे मनःपूर्वक आभार!

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागातील दुर्मिळ पक्षाचे अवयव वस्तुसंग्रहालयातून चोरी झाले आहेत.
संग्रहालयात प्रामुख्याने घुबड या वन्यजीव कायद्या अंतर्गत संरक्षित पक्षाच्या अवशेषांमधील नखे, पिसे व हाडे असे अवयव काढून घेण्यात आल्याची गंभीर बाब रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली असून प्रामुख्याने घुबड या पक्षाची नखे, पिसे हे अवयव गायब असून ही घटना केवळ चोरी किंवा निष्काळजीपणाचा प्रकार नसून, वन्यजीव तस्करी, काळा बाजार, अंधश्रद्धा-आधारित जादू टोणा यांसारख्या घृणास्पद आणि गुन्हेगारी प्रवृत्तीशी संबंधित असण्याची शक्यता वर्तवली आहे.

सचिन अशोक निकम
रिपब्लिकन विद्यार्थी सेना,महाराष्ट्र.

#तस्करी #अंधश्रद्धा #काळाबाजार
#जादू #जादूटोणा

व्हॅलेन्टाईन डे ला ‘मॉरल पोलिसिंग’ करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणीछ. संभाजीनगर | दि.१३ फेब्रुवारीव्हॅलेन्टाईन डे (१४ फेब...
13/02/2026

व्हॅलेन्टाईन डे ला ‘मॉरल पोलिसिंग’ करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

छ. संभाजीनगर | दि.१३ फेब्रुवारी

व्हॅलेन्टाईन डे (१४ फेब्रुवारी) च्या दिवशी शहरातील सार्वजनिक ठिकाणी तरुण-तरुणींना त्रास देणाऱ्या, धमकावणाऱ्या तसेच धुडगूस घालणाऱ्या टोळ्यांवर कठोर कारवाई करून कायदा-सुव्यवस्था राखावी, अशी मागणी पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दरवर्षी व्हॅलेन्टाईन डे च्या निमित्ताने उद्यान, महाविद्यालय परिसर, रस्ते, चौक, कॅफे परिसर अशा ठिकाणी तरुण-तरुणी शांतपणे वेळ घालवत असतात. मात्र काही संघटित टोळ्या/गुंड प्रवृत्तीचे लोक या दिवशी जबरदस्ती, शिवीगाळ, धमकी, मारहाण, व्हिडिओ काढणे, महिलांची छेडछाड, मानसिक त्रास देणे असे प्रकार करून धुडगूस घालतात. यामुळे महिलांच्या सुरक्षिततेवर थेट आघात होतो आणि कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला जातो, असेही निवेदनात म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर शहरातील संवेदनशील ठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करावा, त्रास देणाऱ्या टोळ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत, तसेच गटागटाने तोंडाला फडके बांधून दांडे घेऊन फिरणाऱ्या टोळ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे केलेल्या व्यक्तींना नोटीस बजावावी, महिलांची छेडछाड, धमकी, मारहाण, जबरदस्तीने व्हिडिओ काढणे यावर कठोर कलमानुसार कारवाई करावी, तसेच ‘मॉरल पोलिसिंग’ करणाऱ्या गटांवरही प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी भूमिका निवेदनात मांडण्यात आली आहे.
यावेळी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे सचिन निकम, कुणाल भालेराव, प्रा.प्रबोधन बनसोडे आदींची उपस्थिती होती.

सचिन अशोक निकम
रिपब्लिकन विद्यार्थी सेना,महाराष्ट्र.

आंदोलन जारी रहेगा..✊हिटलरशाही मुर्दाबाद 👊डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मुजोर कुलगुरू डॉ.विजय फुलारी यांना आ...
13/02/2026

आंदोलन जारी रहेगा..✊
हिटलरशाही मुर्दाबाद 👊

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मुजोर कुलगुरू डॉ.विजय फुलारी यांना आपल्या पदाचा माज चढला असून मागील 2 वर्षांपासून सातत्याने त्यांनी न्याय हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या, आवाज उठविणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांवर, कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून सूडबुद्धीने गुन्हे दाखल केले आहेत. यात फुलारी यांचे हितसंबंध असलेले मुंबई, छ. संभाजीनगर येथील काही वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे त्यात संगनमत आहे.
20 सप्टेंबर 2024 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थ्यांना बळजबरीने वस्तीगृहातून रात्री बाहेर काढून दिल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी आंदोलन केले, या आंदोलनाची आक्रमकता पाहून विद्यार्थ्यांना वस्तीगृहात तात्काळ प्रवेश देऊ, डबल पीजी करणाऱ्यांना वसतिगृह देऊ असे खोटे वचन देऊन वेळ मारून नेत दुसऱ्यादिवशी अत्यंत धुर्तपणे, आकसबुद्धीने शिवीगाळ केली, वाहनाचा झेंडा तोडला असा बाऊ करत तत्कालीन एका उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याच्या मदतीने गुन्हे नोंदवून वसतिगृह मागणाऱ्या विद्यार्थ्याना गुन्हेगार ठरविले, आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना षडयंत्र रचून जेलमध्ये डांबण्यात आले. याचा असुरी आनंद घेतला अन यातून चळवळ संपविली असा त्यांना साक्षात्कार झाला आहे आणि याचाच माज म्हणून मी कसा यशस्वी झालो याची शेखी मिरवत आहे हा स्वतःची पाठ थोपटून घेत आहे पण हा माज जास्त दिवस करू देणार नाही असा आमचा इशारा आहे.

#मुजोर कुलगुरूचा धिक्कार असो!
कुलगुरु हमसे डरता है, पुलिस को आगे करता हैं !

#कुलगुरुहोशमेआओ #मुजोरकुलगुरू
#हिटलरशाही #जयभीम

सचिन अशोक निकम
रिपब्लिकन विद्यार्थी सेना,महाराष्ट्र.

 #कुंभमेळ्यासाठी विद्यार्थ्यांना राबवून घ्यासावित्रीमाई फुले पुणे विद्यापीठाचा अजब निर्णय तात्काळ रद्द करा.रिपब्लिकन विद...
05/02/2026

#कुंभमेळ्यासाठी विद्यार्थ्यांना राबवून घ्या
सावित्रीमाई फुले पुणे विद्यापीठाचा अजब निर्णय तात्काळ रद्द करा.

रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने
प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे यांचा आंदोलनाचा इशारा


#कुंभमेळा

05/02/2026

#कुंभमेळ्यासाठी विद्यार्थ्यांना राबवून घ्या

सावित्रीमाई फुले पुणे विद्यापीठाचा अजब निर्णय

रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने
प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे यांचा आंदोलनाचा इशारा!

Anandraj Ambedkar
Vivek Bansode
Ashish Gade


रिपब्लिकन विद्यार्थी सेना व विविध आंबेडकरी विद्यार्थी पक्ष संघटनांच्या वतीने भेदभावमुक्त शिक्षणाच्या मागणीसाठी डॉ.बाबासा...
04/02/2026

रिपब्लिकन विद्यार्थी सेना व विविध आंबेडकरी विद्यार्थी पक्ष संघटनांच्या वतीने भेदभावमुक्त शिक्षणाच्या मागणीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा, छ. संभाजीनगर येथे करण्यात आलेल्या आंदोलनाचे विविध वृत्तपत्रात प्रसिद्ध वृत्त.

सर्व माध्यम प्रतिनिधींचे मनःपूर्वक आभार!

भेदभावमुक्त शिक्षा हमारा अधिकार है।भेदभावमुक्त कॅम्पस हमारा अधिकार है।WE SUPPORT UGC BILL #हल्लाबोल                     ...
02/02/2026

भेदभावमुक्त शिक्षा हमारा अधिकार है।
भेदभावमुक्त कॅम्पस हमारा अधिकार है।

WE SUPPORT UGC BILL

#हल्लाबोल


संत शिरोमणी रविदास महाराजांना अभिवादनभेदभावमुक्त शिक्षणासाठी जोरदार आंदोलनआज डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथ...
02/02/2026

संत शिरोमणी रविदास महाराजांना अभिवादन

भेदभावमुक्त शिक्षणासाठी जोरदार आंदोलन

आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे युजीसी इक्विटी बिलाच्या स्थगितीच्या विरोधात, भेदभावमुक्त शिक्षणासाठी मागणीसाठी आंबेडकरी अनुयायांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाच्या सुरवातीलाच संत शिरोमणी रविदास महाराजांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.
आंदोलनात रिपब्लिकन सेना, रिपब्लिकन विद्यार्थी सेना,महाराष्ट्र. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (बीआरएसपी),महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष, सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशन, सम्यक विद्यार्थी आंदोलन, SFI, भारतीय विद्यार्थी मोर्चा, आईस्का, बहुजन विद्यार्थी आघाडी, स्वाभिमानी मुप्टा, कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, भीमआर्मी, , भारतीय क्रांती दल, वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया आदि संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.

02/02/2026

भेदभावमुक्त शिक्षा हमारा अधिकार है।

अम्बेडकरी संगठनों का डा. बाबासाहब अंबेडकर मराठवाड़ा विश्वविद्यालय में आंदोलन।

Address

Milind Collage, Nagsenvana Parisar, Canttonment
Aurangabad
431001

Alerts

Be the first to know and let us send you an email when रिपब्लिकन विद्यार्थी सेना,महाराष्ट्र. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share