Dio Chhatrapati Sambhajinagar

Dio Chhatrapati Sambhajinagar Official Facebook Account of District Information Office, Directorate of Information & Public Relations Government of Maharashtra, Aurangabad

01/06/2026

विधान परिषद निवडणूक आचारसंहिता
अंमलबजावणीसाठी प्रतिबंधात्मक आदेश

छत्रपती संभाजीनगर, दि.१(जिमाका)- औरंगाबाद-जालना स्थानिक प्राधिकारी निवडणूक २०२६ चा कार्यक्रम जाहीर झालेला असून निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

ध्वनीक्षेपक वापरावर निर्बंध

निवडणूक आचारसंहिता कालावधीत पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. सकाळी ६ ते रात्री १० वा. नंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर वा कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार, इतर व्यक्ती यांनी निश्चित ठिकाणी ध्वनीक्षेपकाचा वापर करावा, त्यासाठी परवानगी घ्यावी व त्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना द्यावी,असे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी निर्गमित केले आहेत. हे आदेश दि.२५ जून पर्यंत अंमलात राहतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

पोस्टर्स, बॅनर्स लावण्यावर निर्बंध

निवडणूक आचारसंहिता कालावधीत सार्वजनिक इमारती, सार्वजनिक रस्ता इ. ठिकाणी कोणत्याही राजकीय पक्ष, उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी यांनी राजकीय बॅनर्स, पोस्टर्स, कटआऊट्स, पेन्टिंग्ज, होर्डिंग इ. अपघात होईल अशा पद्धतीने लावण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.याबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आदेश निर्गमित केले आहेत.

वाहनांवर घोषवाक्य लिहिणे, झेंडे लावण्यावर निर्बंध

निवडणूक आचारसंहिता कालावधीत सक्षम प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगीशिवाय ऑटो रिक्षा, टेम्पो, सायकल रिक्षा, सायकल व इतर वाहनांवर राजकीय पक्षाचे बोधचिन्ह, झेंडे वा घोषवाक्य लिहिण्यास इ. निर्बंध घालण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी निर्गमित केले आहेत. हे आदेश दि.२५ जून पर्यंत अंमलात राहतील असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
०००००

01/06/2026

विधान परिषद निवडणूकः कायदा सुव्यवस्था अबाधित
राखण्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे आदेश

छत्रपती संभाजीनगर, दि.१(जिमाका)- औरंगाबाद-जालना स्थानिक प्राधिकारी निवडणूक २०२६ चा कार्यक्रम जाहीर झालेला असून निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहितेचे अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी जारी केले आहेत. या आदेशात त्यांनी पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांनी करावयाच्या कारवाईबाबत निर्देश दिले आहेत.
जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आदेशात दिलेले निर्देश याप्रमाणे- निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात, सहायक निवडणूक अधिकारी कार्यालयात, ईव्हीएम स्ट्रॉंग रुम, मतदान केंद्र, मतमोजणी केंद्र येथे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून २४X७ पोलीस बंदोबस्त उपलब्ध करुन देणे. अरुंद रस्ते, गर्दीच्या ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवणे, मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी निवडणूक अधिकारी, सहायक निवडणूक यांच्या मागणीनुसार पोलीस बंदोबस्त उपलब्ध करुन देणे, गत दोन सार्वत्रिक निवडणूकांमध्ये निवडणूक विषयक गुन्ह्यांमध्ये समावेश असलेल्या व्यक्तिंची यादी तयार करणे, निवडणूक विषयक गुन्ह्यांचा तपास गतिशील करणे, अवैध शस्त्र तस्करी, असामाजिक तत्वांना आळा घालण्यासाठी आंतरराज्य व राज्यांतर्गत वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करणे, भारती नागरिक सुरक्षा अधिनियम २०२३ चे कलम १२६, १२७, १२८ अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करणे, शस्त्र दारुगोळा यांच्या वाहतुकीबाबत दक्षतापूर्वक कडक तपासणी व खात्री करणे, मतदानाच्या तीन दिवस अगोदर व मतमोजणी होईपर्यंत कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार अथवा शस्त्र, दारुगोळा यांचाई वाहतुक होणार नाही याची खात्री करणे, जिल्हादंडाधिकाऱ्यांचे ना हरकत प्रमाणपत्र असल्याशिवाय आंतरराज्य शस्त्र व दारुगोळा वाहतुक होणार नाही याची खात्री करणे, मतदानाच्या दिवशी मतदारांवर कोणत्याही प्रकारचा दबाव, अडथळा येणार नाही यासाठी उपाययोजना राबविणे, निवडणूक घोषीत झाल्यापासून ते संपेपर्यंत मा. मुख्य निवडणूक अधिकारी यांना कायदा सुव्यवस्था विषयक अहवाल दररोज पाठविणे, निवडणूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या व्यक्तिंविरुद्ध प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, मतदार यादी विषयक खोटे घोषणापत्र सादर करणे, निवडणूक कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करणे इ. उपाययोजना करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
00000

राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली असून सध्याच्या स्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान १० जूनपर्यंत  ...
01/06/2026

राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली असून सध्याच्या स्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान १० जूनपर्यंत #मान्सून च्या आगमनाची शक्यता नाही. कोकणासह विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात दुपारनंतर ढग आणि काही प्रमाणात वादळी पावसाचा अंदाज.

राज्यातील हवामानात बदल होत असून बहुतांश भागांमध्ये १० जूनपर्यंत  #मान्सून च्या आगमनाची शक्यता कमी आहे. कोकण, विदर्भ, मरा...
01/06/2026

राज्यातील हवामानात बदल होत असून बहुतांश भागांमध्ये १० जूनपर्यंत #मान्सून च्या आगमनाची शक्यता कमी आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात दुपारनंतर ढगाळ वातावरण व काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे.

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई टाळावी आणि विजेच्या कडकडाटाच्या वेळी आवश्यक ती काळजी घ्यावी, सुरक्षित राहा, सतर्क राहा!
#पाऊस
#वादळीपाऊस
#हवामानअंदाज




31/05/2026

*| महासंवाद | DGIPR NEWS | रविवार, ३१ मे २०२६ |-२*

*अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा समाजाने अंगीकारण्याची गरज – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*
_श्रीक्षेत्र चौंडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा ३०१ वा जयंती महोत्सव_
https://mahasamvad.in/202655/

*किमान १० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही*
_१ जूनपासून वादळी पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये_
https://mahasamvad.in/202654/

➖➖➖➖➖
MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.

*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन*अहिल्यानगर, दि. ३१:  पुण्यश्लोक अहिल्यादेव...
31/05/2026

*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन*

अहिल्यानगर, दि. ३१: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त चौंडी (ता.जामखेड) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकास भेट देऊन अभिवादन केले. यावेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही अभिवादन केले.

याप्रसंगी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी मुख्यमंत्र्यांसह उपस्थित मान्यवरांनी अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक येथे जाऊन दर्शन घेतले.
0000

30/05/2026
*श्रीक्षेत्र चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त भव्य जयंती महोत्सव*पुण्यश्लोक राजमाता...
29/05/2026

*श्रीक्षेत्र चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त भव्य जयंती महोत्सव*

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथे दि. २९, ३० व ३१ मे २०२६ दरम्यान भव्य जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या ऐतिहासिक महोत्सवात भव्य दीपोत्सव, कवी संमेलन, ड्रोन शो, महाअभिषेक, महाप्रसाद तसेच मुख्य जयंती समारोह व अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले असून देशभरातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

याप्रसंगी राजस्थानचे राज्यपाल मा. श्री. हरिभाऊ बागडे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्राताई पवार, पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री मा. श्रीमती पंकजाताई मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री मा. ना. श्री. जयकुमार गोरे, कृषी मंत्री मा. ना. श्री. दत्तात्रय भरणे, इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री मा. ना. श्री. अतुल सावे, अहिल्यानगरचे पालकमंत्री मा. श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह मंत्रीमंडळातील मान्यवर सदस्य तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

आज शुक्रवार दि.२९ मे रोजी सायंकाळी ७.०० वाजता आमदार मा. श्री. गोपीचंद पडळकर यांच्या संकल्पनेतून मातोश्री श्रीमती भामाबाई शंकरराव शिंदे यांच्या शुभहस्ते मंदिरावरील विद्युत रोषणाई व भव्य दीप महोत्सवाचे उदघाट्न होणार आहे.

शनिवार दि. ३० मे रोजी भव्य कवी संमेलनाचे आयोजन केले आहे. या कवी संमेलनात युगकवी डॉ. कुमार विश्वास, अभिनेत्री गिरिजा ओक, कवयित्री डॉ. भुवन मोहिनी, साक्षी तिवारी, शिखा अवधेश, श्रद्धा शौर्य, सान्या राय, नेहा गोडघाटे आपल्या काव्य सादरीकरणाने उत्सवाची शोभा वाढवणार आहेत.

यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनपटावर आधारित भव्य ड्रोन शो आणि मध्यरात्री आतषबाजी होणार आहे.

रविवार दि. ३१ मे रोजी राजस्थानचे राज्यपाल मा. श्री. हरिभाऊ बागडे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमवेत अहिल्येश्वर मंदिरात महाअभिषेक संपन्न होणार असून सकाळी ९ वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सकाळी ११ वाजता मान्यवर

29/05/2026

राष्ट्रीय खतविक्री आराखडा; खत खरेदीचे मोबाईल ॲपः
पथदर्शी प्रकल्पात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश

छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका)- केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खत विक्री आराखडा (National fertilizer sale framework) प्रकल्पांतर्गत IFMS व Agristack प्रणालीचे संयुक्तीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे क्यू आर कोड द्वारे खत खरेदी करता येणार आहे. या खत वितरण प्रणालीचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत असून त्यासाठी राज्यात छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर या दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे,असे कृषी संचालक पुणे यांनी कळविले आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, केंद्र शासनाने Fertilzer sale application system ( FSAS) हे मोबाईल ॲप तयार केले आहे. या ॲपद्वारे QR code द्वारे शेतकऱ्यांना खतांचे बुकींग करता येणार आहे. शेतकऱ्यांनी QR code द्वारे खत बुक केल्या नंतर QR code तीन दिवस वैध राहणार असून शेतकरी त्यांच्या सोयीनुसार त्यांनी निवडलेल्या खत विक्रेत्याकडे जाऊन खत खरेदी करू शकतात. यामुळे खताचे online booking केल्याने रांगेत उभे राहावे लागणार नाही. आवश्यक खताचे booking केल्यामुळे इतर अनावश्यक खते घेण्याची सक्ती दुकानदाराकडून होणार नाही. त्यामुळे खत विक्री मध्ये सुलभता व पारदर्शकता येईल.
सद्यस्थितीत दुकानांमध्ये खत उपलब्ध आहे किंवा नाही हे समजत नसल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास होत असल्याचे दिसून येते,वरील प्रणालीमुळे या गोष्टी टाळता येणार आहेत.
या वितरण प्रणालीची केंद्र शासनाच्या टीम ने पुणे जिल्ह्यातील अष्टापुर ता हवेली येथे यशस्वीपणे चाचणी घेतली आहे. राज्यातील कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याची केंद्र शासनाने निवड केली असून पथदर्शी प्रकल्प म्हणून खरीप हंगामात Fertilizer sale application system या प्रणालीद्वारे खत विक्रीची सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
०००००

29/05/2026

ड्रोन उड्डाणास प्रतिबंध

छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका)- भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ प्रमाणे ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो-लाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरा मोटर्स, हॅण्ड लायडर्स हॉट एअर बलून इ. उड्डाण क्रियांना पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात दि.३० मे ते दि.२८ जुलै दरम्यान प्रतिबंध करण्यात येत आहे,असे आदेश पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी निर्गमित केले आहे. या देशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलन्म २२३ नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
०००००

Address

Aurangabad
431003

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dio Chhatrapati Sambhajinagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Dio Chhatrapati Sambhajinagar:

Share