G.Sreekanth, IAS

G.Sreekanth, IAS श्री. जी. श्रीकांत ( आयएएस), महानगर पालिका आयुक्त,‌ छत्रपती संभाजीनगर

द गोल्फ फाउंडेशन तर्फे छत्रपती संभाजीनगर शहरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत गोल्फ टॅलेंट हंट कॅम्प, 20 नोव्हेंबर सकाळी...
15/11/2025

द गोल्फ फाउंडेशन तर्फे छत्रपती संभाजीनगर शहरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत गोल्फ टॅलेंट हंट कॅम्प, 20 नोव्हेंबर सकाळी दहा वाजता, एमजीएम गोल्फ क्लब पडेगाव येथे, वय वर्ष 8 ते 16 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षक ,उपकरणे,प्रवास आणि युनिफॉर्म सह सर्व सुविधा विनामूल्य.
नाव नोंदणीसाठी संपर्क 9833013881

बालदिनानिमित्त मनपा विद्यार्थ्यांची विमानाने ISRO सहलमा. आयुक्तांनी स्वतः मुंबईपर्यंत विद्यार्थ्यांसोबत केला प्रवासमाहित...
14/11/2025

बालदिनानिमित्त मनपा विद्यार्थ्यांची विमानाने ISRO सहल
मा. आयुक्तांनी स्वतः मुंबईपर्यंत विद्यार्थ्यांसोबत केला प्रवास
माहिती व जनसंपर्क विभाग
दि. 14 नोव्हेंबर
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मा. जी. श्रीकांत यांच्या अभिनव संकल्पनेतून मनपा शाळांमध्ये आयोजित “स्मार्ट स्टुडंट परीक्षा” घेण्यात आली होती. या परीक्षेतून निवडण्यात आलेल्या टॉप 10 विद्यार्थ्यांना प्रतिष्ठित ISRO – विक्रम साराभाई स्पेस सेंटर, तिरुवनंतपुरम (केरळ) येथे शैक्षणिक सहलीची मौल्यवान संधी देण्यात आली आहे.
मूळ नियोजनानुसार विद्यार्थ्यांची ISRO भेट दिनांक 17 नोव्हेंबर रोजी होती. मात्र बालदिनाचे औचित्य साधून, आयुक्त मा. जी. श्रीकांत यांनी विद्यार्थ्यांना विमानाद्वारे थेट केरळला नेण्याचे विशेष निर्देश दिले. त्यांच्या सूचनेनुसार आज मनपा शाळांतील विद्यार्थी प्रथमच विमान प्रवासाचा आनंद घेत केरळ येथे पोहोचले.
यातील विशेष ठळक बाब म्हणजे स्वतः मा. आयुक्त जी. श्रीकांत यांनी विद्यार्थ्यांसोबत मुंबईपर्यंत विमानाने प्रवास केला. आयुक्तांसोबत प्रवासाची संधी मिळाल्याने विद्यार्थी अतिशय आनंदित व उत्साहित झाले. अनेक विद्यार्थी प्रथमच विमानात बसत असल्याने ही सहल त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव ठरली.
विद्यार्थी 17 नोव्हेंबर रोजी विक्रम साराभाई स्पेस सेंटरला भेट देऊन रॉकेट प्रक्षेपण पाहणार आहेत. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना ISRO केंद्र प्रत्यक्ष पाहण्याची अशी संधी महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच लाभत आहे.
या शैक्षणिक सहलीसोबत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची व देखरेखीची काळजी घेण्यासाठी अंकुश पांढरे (उपआयुक्त व शिक्षण विभाग प्रमुख), ज्ञानदेव सांगळे (कार्यक्रम अधिकारी), किरण तबडे, मंगेश जाधव, उमा पाटील आणि सविता बांबर्डे (शिक्षक) हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित आहेत.

सण प्रेमाचा, सण मायेचा,सण भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा..! 💫भाऊबीज निमित्त सर्व बंधू-भगिनींनाहार्दिक व मंगलमय शुभेच्छा!...
23/10/2025

सण प्रेमाचा, सण मायेचा,
सण भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा..! 💫

भाऊबीज निमित्त सर्व बंधू-भगिनींना
हार्दिक व मंगलमय शुभेच्छा! 🪔✨

– जी. श्रीकांत
आयुक्त व प्रशासक,
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका

21/10/2025

🌸✨ Heartfelt Greetings on the occasion of Laxmi Pujan ✨🌸

May Goddess Mahalakshmi bless your home
with light, wealth, happiness, and prosperity.
Wishing you a life full of abundance and joy!

🙏 Warm wishes on Laxmi Pujan! 🙏

— G. Sreekanth
(Commissioner & Administrator)
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation

#लक्ष्मीपूजन #महालक्ष्मीपूजन #दिवाळी #सुखसमृद्धी #शुभेच्छा #मंगलमय #दीपोत्सव #छत्रपतीसंभाजीनगर #महालक्ष्मीमातेचीआशीर्वाद # #आनंदआणिआरोग्य

🌸✨ लक्ष्मीपूजन निमित्त हार्दिक शुभेच्छा ✨🌸महालक्ष्मीचे करूनी पूजन,लावा दीप अंगणी धनधान्य आणि सुख-समृद्धी,लाभो तुम्हा जीव...
21/10/2025

🌸✨ लक्ष्मीपूजन निमित्त हार्दिक शुभेच्छा ✨🌸

महालक्ष्मीचे करूनी पूजन,
लावा दीप अंगणी धनधान्य आणि सुख-समृद्धी,
लाभो तुम्हा जीवनी आनंद आणि संपन्नता!

🙏 लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏

— जी. श्रीकांत
(आयुक्त तथा प्रशासक)
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका

✨ लक्ष लक्ष दिवसांनी उजळू दे नवी दिशा, घेऊनी येवो नवी उमेद नवी आशा! ✨💰 धनत्रयोदशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा! 💰 #ध...
18/10/2025

✨ लक्ष लक्ष दिवसांनी उजळू दे नवी दिशा, घेऊनी येवो नवी उमेद नवी आशा! ✨
💰 धनत्रयोदशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा! 💰
#धनत्रयोदशी #शुभेच्छा #संपन्नता

16/10/2025

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या "कमल तलावाचे" पुनरुज्जीवन, नुकतेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण आणि कचऱ्याने वेढलेल्या कमल तलावाला आता नवीन रूप प्राप्त झालंय, शहराच्या पर्यटनात वाढ व्हावी या उद्देशाने हे काम करण्यात आले आहे. यासाठी अथक परिश्रम घेतलेल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी कर्मचारी, इकोसत्व आणि शहरातील सर्व नागरिकांचे मनस्वी आभार

#कमलतलाव #छत्रपतीसंभाजीनगर

09/10/2025

जंगलाचा राजा आता छत्रपती संभाजीनगरात

14 वर्षांनंतर सिद्धार्थ उद्यानात सिंहगर्जना, सिंह आणण्यात प्रशासकांचा सिंहाचा वाटा

सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालयात सिंह, अस्वल आणि कोल्हे प्रेक्षकांसाठी खुले

छत्रपती संभाजीनगर, दि. ३० सप्टेंबर :
सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालयात सिंह, अस्वल आणि कोल्ह्यांचे आगमन झाले असून, दि. १ ऑक्टोबरपासून नागरिकांना व पर्यटकांना हे प्राणी पाहता येणार आहेत.

कर्नाटकातील शिवमोगा प्राणीसंग्रहालयातून आलेल्या सिंहांची जोडी अर्जुन (८ वर्षे) आणि सुचित्रा (१० वर्षे) तसेच अस्वलांची जोडी गजेंद्र (४ वर्षे) व शांती (५ वर्षे) यांची आज महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री. जी. श्रीकांत यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी प्राण्यांच्या आरोग्य व अनुकूलतेची माहिती घेतली.

प्राणी सुखरूप, निरोगी व तंदुरुस्त अवस्थेत आहेत. स्थानिक हवामानाशी जुळवून घेण्यासाठी त्यांना तात्पुरत्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते. आता नागरिकांना त्यांच्या प्रत्यक्ष दर्शनाची संधी मिळणार आहे.

प्रशासक यांचा सिंहाचा वाटा
एकूण 14 वर्षांनंतर सिद्धार्थ उद्यानात सिंहगर्जना ऐकावा मिळणार आहे. याच्यात आयुक्त तथा प्रशासक सिंहाचा वाटा आहे. सिंहाची जोडी प्राणी संग्रहालयात असावी या पुरोगामी विचार समोर ठेऊन त्यांनी अथक प्रयत्न केले. या प्रयत्न आणि पुरोगामी दृष्टिकोणामुळे आता प्राणी संग्रहालयात सिंहगर्जना ऐकायला मिळत आहे.

केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या मंजुरीनुसार दिनांक २७ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरात २ सिंह, २ अस्वल व २ कोल्हे आणण्यात आले. त्याच्या मोबदल्यात छत्रपती संभाजीनगर प्राणी संग्रहालयातून १ पांढरा नर वाघ व २ पिवळ्या वाघीण शिवमोगा प्राणीसंग्रहालयाकडे पाठविण्यात आले.

या नवीन प्राण्यांच्या आगमनामुळे सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालयाचे आकर्षण अधिक वाढले असून, शहरातील नागरिक व पर्यटकांसाठी हे एक नवे आकर्षण ठरणार आहे.

# #14वर्षांचीप्रतीक्षा #14वर्षांनीसिंहगर्जना

The power of pen has changed in the last 23 yearsआज प्रशासकीय सेवेत येऊन २३ वर्ष पूर्ण झाले आहेत, या प्रवासात मार्गदर्शन...
09/10/2025

The power of pen has changed in the last 23 years

आज प्रशासकीय सेवेत येऊन २३ वर्ष पूर्ण झाले आहेत, या प्रवासात मार्गदर्शन करणारे वरिष्ठ, साथ देणारा सर्व मित्र परिवार आणि आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
आपली साथ अशीच कायम राहू द्या.

विजयादशमी, दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
02/10/2025

विजयादशमी, दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

30/09/2025

30 सप्टेंबर 2024 रोजी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने, काचंनवाडी जवळ सक्षम पेट्रोलियमची सुरुवात करण्यात आली. शहरातील दिव्यांग बांधवांच्या हाताला रोजगार मिळावा, म्हणून हा उपक्रम हाती घेतला होता. आज या पेट्रोलपंपाला एक वर्ष पूर्ण होतंय, तीन शिफ्टमध्ये ११ दिव्यांग कर्मचारी सध्या इथे कार्येत आहेत. दररोज ५ हजार लिटर पेट्रोल,तीन हजार लिटर वरून अधिक डिझेलची विक्री या पंपावर होते. HPCLच्या वतीने लवकरच इथे सीएनजी देखील सुरू करण्यात येणार आहे, सक्षम पेट्रोलियम हा प्रयोग भविष्यात देखील अनेक दिव्यांग बांधवांसाठी रोजगाराचे साधन बनेल हा विश्वास सर्वांना आहे. या उपक्रमात महत्त्वाची साथ देणाऱ्या सर्व अधिकारी,कर्मचारी आणि दिव्यांग बांधवांचे मनःपूर्वक आभार

मी आयुक्त होणार या उपक्रमांतर्गत शनिवारी कांचनवाडी मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी, जलश्री या आमच्या निवासस्थानी भेट दिली. ...
15/09/2025

मी आयुक्त होणार या उपक्रमांतर्गत शनिवारी कांचनवाडी मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी, जलश्री या आमच्या निवासस्थानी भेट दिली. विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारत असताना, त्यांनी त्यांच्यातले कलागुण देखील सादर केले. माझ्या किरण नावाच्या मित्राने शाहिराला लाजवेल असा पोवाडा गायला तर दिव्या नावाच्या विद्यार्थी मैत्रिणीने सुंदर असा डान्स सादर केला. जेव्हा दिव्या आणि किरण यांच्याशी संवाद साधला, तेव्हा त्यांनी सांगितलं की आमच्या शाळेत वर्गखोल्या कमी आहेत. पण तिथं इमारत बांधण्यासाठी जागा नसल्यानेच, आपण लवकरच कांचनवाडीच्या शाळेसाठी नवीन जागा शोधून तिथंच इमारत आणि गोल्फचे मैदान बनवू असं उत्तर त्यांना दिलं. मनपा शाळेत क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, बॅडमिंटन, कुस्ती, हॉकी यांसारख्या खेळांसह गोल्फ देखील मुलांना माहिती झालं पाहिजे म्हणून त्यांच्यासोबत गोल्फसुद्धा खेळलो, गोल्फ स्टिक कशी पकडावी पासून ते गोल कसा मारला पाहिजे हे देखील त्यांना शिकवता आलं. कांचनवाडीच्या नव्या मनपा शाळेत गोल्फसाठी मैदान असणार आहे. मनपा शाळेची मुलं अभ्यासासोबत कुठल्याच खेळातही मागे राहू नये, यासाठी हा प्रयत्न असेल.

Address

Chhatrapati Sambhajinagar Muncipal Corporation, Buddi Lane, Naralibag
Aurangabad
431001

Alerts

Be the first to know and let us send you an email when G.Sreekanth, IAS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to G.Sreekanth, IAS:

Share