VillageBook,Thanegaon,Armori,Gadchiroli

VillageBook,Thanegaon,Armori,Gadchiroli ग्रामपंचायत कार्यालय ठाणेगाव
पं.स.आरमोरी, जि.प.गडचिरोली

आज दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोज शुक्रवार भारताचे ७९ वे स्वातंत्र्य दिन निमित्त ग्रामपंचायत कार्यालय ठाणेगाव येथे श्रीमती.वर्...
15/08/2025

आज दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोज शुक्रवार भारताचे ७९ वे स्वातंत्र्य दिन निमित्त ग्रामपंचायत कार्यालय ठाणेगाव येथे श्रीमती.वर्षा देविदास मडावी (सरपंच ग्रा.पं.ठाणेगाव) यांनी ध्वजारोहण केले. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रा.पं.कर्मचारी, जि.प.प्राथमिक शाळा ठाणेगाव जुने शिक्षक वृंद व विद्यार्थी, तं.मु.स. पदाधिकारी, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामपंचायत कार्यालय ठाणेगाव कडून समस्त ग्रामवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
15/08/2025

ग्रामपंचायत कार्यालय ठाणेगाव कडून समस्त ग्रामवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

हर घर तिरंगा अभियान अंतर्गत आज दिनांक:१४/०८/२०२५ रोज गुरूवार ला ग्रामपंचायत कार्यालय ठाणेगाव येथे श्री.पुंडलिक नानाजी जु...
14/08/2025

हर घर तिरंगा अभियान अंतर्गत आज दिनांक:१४/०८/२०२५ रोज गुरूवार ला ग्रामपंचायत कार्यालय ठाणेगाव येथे श्री.पुंडलिक नानाजी जुआरे (ज्येष्ठ नागरिक ठाणेगाव) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रा.पं.कर्मचारी, जि.प.प्राथमिक शाळा ठाणेगाव जुने शिक्षक वृंद व विद्यार्थी, तं.मु.स.अध्यक्ष, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

हर घर तिरंगा अभियान अंतर्गत आज दिनांक:१३/०८/२०२५ रोज बुधवार ला ग्रामपंचायत कार्यालय ठाणेगाव येथे श्री.ताराचंद नारायण कुन...
13/08/2025

हर घर तिरंगा अभियान अंतर्गत आज दिनांक:१३/०८/२०२५ रोज बुधवार ला ग्रामपंचायत कार्यालय ठाणेगाव येथे श्री.ताराचंद नारायण कुनघाडकर (माजी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष ठाणेगाव) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रा.पं.कर्मचारी, जि.प.प्राथमिक शाळा ठाणेगाव जुने शिक्षक वृंद व विद्यार्थी, ग्राम रोजगार सेवक, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

संयुक्त राष्ट्रांनी १९७२ मध्ये स्टॉकहोम येथे झालेल्या मानव-पर्यावरण परिषदेच्या पहिल्या दिवशी (५ जून) हा दिवस “जागतिक पर्...
05/06/2025

संयुक्त राष्ट्रांनी १९७२ मध्ये स्टॉकहोम येथे झालेल्या मानव-पर्यावरण परिषदेच्या पहिल्या दिवशी (५ जून) हा दिवस “जागतिक पर्यावरण दिन” म्हणून घोषित केला, ज्याचा मुख्य उद्देश पर्यावरणीय विषयांवर जागतिक जनजागृती निर्माण करणे आहे. या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम “प्लास्टिक प्रदूषणाचा अंत करा” अशी आहे.

आपण दरवर्षी हा दिवस साजरा करतो, पण केवळ या एका दिवसाने प्लास्टिक प्रदूषणाचा प्रश्न संपणार नाही. प्लास्टिक प्रदूषण हा आपल्या पर्यावरणासाठी, जैवविविधतेसाठी आणि मानवी आरोग्यासाठी मोठा धोका ठरत आहे. त्यामुळे आपल्या जीवनशैलीत बदल घडवून आणणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि त्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

प्लास्टिक प्रदूषणाचा अंत करण्यासाठी आपण एकत्र येऊन खाली दिलेल्या पर्यायांचा आपल्या दैनंदिन जीवनात वापर करूया:
१. एकल वापराच्या प्लास्टिक वस्तूंचा वापर कमी करूया.
२. पुनर्वापर आणि पुनर्विकसनाला प्राधान्य देऊया.
३. पर्यावरणपूरक पिशव्या आणि वस्तू वापरूया.
४. आपल्याच परिसरात प्लास्टिकमुक्त उपक्रम राबवूया.

आपल्या वसुंधरेचे रक्षण करण्यासाठी एकत्र येऊया आणि प्लास्टिक प्रदूषणाचा अंत करूया.

11/05/2023
ग्रामपंचायत कार्यालय ठाणेगाव येथे नोंदणीकृत इमारत बांधकाम कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजितमहाराष्ट्र राज्य इ...
04/10/2022

ग्रामपंचायत कार्यालय ठाणेगाव येथे नोंदणीकृत इमारत बांधकाम कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित
महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ (कामगार विभाग) व एच.एन.एल. लाईफ केअर लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने नोंदणीकृत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबातील वय १० वर्षावरील व्यक्तींना मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये ब्लड प्रेशर, थायराईड, शुगर, मलेरिया, लिव्हर, किडणी, डोळे, कान अश्या एकूण ५० आवश्यक आरोग्य चाचण्या मोफत करण्यात आले. या शिबिराचा लाभ गावातील ३२ नागरिकांनी घेतला. आरोग्य तपासणी करण्याकरिता आरोग्य कर्मचारी कल्याणी दरवडे, अक्षय इंगळे, वंदना कोडापे, पल्लवी कोडापे व प्रफुल मेश्राम उपस्थित होते.

आज दिनांक 24/04/2022 रोजी ग्रामपंचायत ठाणेगांव येथे पंचायत राज दिन विशेष ग्रामसभा घेण्यात आली.
24/04/2022

आज दिनांक 24/04/2022 रोजी ग्रामपंचायत ठाणेगांव येथे पंचायत राज दिन विशेष ग्रामसभा घेण्यात आली.

ग्रामपंचायत कार्यालय ठाणेगांव अंतर्गत मौजा ठाणेगांव येथे जल जीवन मिशन प्रकल्प संचालक मा.कुतीरकर साहेब, उपमुख्य कार्यकारी...
07/04/2022

ग्रामपंचायत कार्यालय ठाणेगांव अंतर्गत मौजा ठाणेगांव येथे जल जीवन मिशन प्रकल्प संचालक मा.कुतीरकर साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य जिल्हा परिषद टीम आणि ग्रामपचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी साहेब, ग्रापंचायत कर्मचारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत गावातील पाहणी करतांना उपस्थित होते.

Address

Thanegaon
Armori
441208

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when VillageBook,Thanegaon,Armori,Gadchiroli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to VillageBook,Thanegaon,Armori,Gadchiroli:

Share