VillageBook,Injewari,Armori,Gadchiroli

VillageBook,Injewari,Armori,Gadchiroli ok

30/06/2020

*पंधराव्या वित्त आयोगामधून राज्याला १ हजार ४५६ कोटी रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त*

*गावांमध्ये चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर*

*- ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ*

पंधराव्या वित्त आयोगामधून सन २०२०-२१ या कालावधीसाठी केंद्र शासनाकडून राज्याला एकूण ५ हजार ८२७ कोटी रुपये इतका निधी मंजूर आहे. या निधीपैकी १ हजार ४५६ कोटी ७५ लाख रुपये इतका निधी पहिला हप्ता बेसिक ग्रँट (अनटाईड) म्हणून प्राप्त झाला आहे. या निधीचे वितरण ८० टक्के ग्रामपंचायत, १० टक्के पंचायत समिती आणि १० टक्के जिल्हा परिषद या प्रमाणात तिन्ही स्तरावर करण्यात आले आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी दिली.

*गावांच्या विकासासाठी थेट ८० टक्के निधी*

चौदाव्या वित्त आयोगाचा कालावधी मागील वर्षी समाप्त झाला. आता चालू आर्थिक वर्षापासून पुढील ५ वर्षाच्या कालावधीसाठी पंधराव्या वित्त आयोगामधून ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध विकास कामांसाठी निधी मिळणार आहे. या निधीपैकी ८० टक्के निधी हा थेट गावांच्या विकासासाठी ग्रामपंचायतींना वितरीत केला जातो. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांना प्रत्येकी १० टक्के निधी दिला जातो. गावांना मोठा निधी मिळत असल्याने यामुळे गावांमधील विविध पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळते, असे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले. पंधराव्या वित्त आयोगातून मिळणाऱ्या निधीमधून राज्यातील सर्व गावांमध्ये चांगल्या प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.

पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२५ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी केंद्र शासनाकडून ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी राज्याला बेसिक ग्रँट (अनटाईड) व टाईड ग्रँट (Tied Grant) अशा दोन प्रकारच्या ग्रॅन्टच्या स्वरूपात ५० - ५० टक्के या प्रमाणात निधी प्राप्त होणार आहे. पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार बेसिक ग्रँट (अनटाईड) ही ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनी कर्मचारी पगार किंवा आस्थापना विषयक बाबी वगळून इतर स्थानिक गरजेनुसार (Location Specific felt needs ) आवश्यक बाबींवर वापरावयाची आहे, अशी माहिती मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिली.

07/03/2019
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना
05/03/2019

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना

*आपण सरकारी नोकरीला नाहीत पण आपणास पेन्शन हवी आहे ?**चिंता करण्याचे काम नाही आता वयाच्या ६० वर्षांनंतर मिळवा दरमहा ३००० ...
02/03/2019

*आपण सरकारी नोकरीला नाहीत पण आपणास पेन्शन हवी आहे ?*
*चिंता करण्याचे काम नाही आता वयाच्या ६० वर्षांनंतर मिळवा दरमहा ३००० रु पेंशन*
आपले पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी सर्व असंघटित कामगार, मजुर वर्ग, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, बांधकाम मजुर, शेतमजुर नव्हेच तर सर्वच स्तरातल्या मजुर वर्गासाठी ज्यांचे मासिक उत्पन्न रु १५००० पेक्षा कमी आहे त्या सर्वांसाठी *प्रधानमंत्री श्रम योगी योजना* चालु केली आहे.

त्याची प्राथमिक माहिती
👉 *हे एक पेन्शन खाते असणार आहे*
👉 *याच्या मध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक खाते धारकाला वेगळा पेन्शन नंबर दिला जाईल*
👉 *भारत सरकार व LIC India यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना अंमलात आणली आहे*
👉 *या योजने मध्ये सहभागी होणेकरिता आधार कार्ड व राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक आवश्यक*
👉 *योजनेत सहभागी होणेचे वय १८ ते ४०*
👉 *ज्यांचे मासिक उप्तन्न १५००० रु पेक्षा कमी आहे व ज्यांचे NPS किंवा EPFO खाते नाही असे सर्व या योजनेचा लाभ घेऊ शकतात*
👉 *याच्या मध्ये वयोमानानुसार हफ्ता राहील ज्याचे वय कमी त्याला कमी व जास्त वयाला जास्त हफ्ता*
👉 *कमीत कमी हफ्ता वय वर्ष १८ साठी फक्त रु ५० व जास्तीत जास्त हफ्ता हा वय वर्ष ४० साठी फक्त रु २०० दरमहा*
👉 *आपण जितका हफ्ता भरणार आहेत आपल्या खात्यात तेवढाच हफ्ता भारत सरकार प्रत्येक महिन्याला आपल्या खात्यावर भरणार आहे*
👉 *वयाच्या ६० वर्षानंतर मासिक मानधन रु ३००० चालू होईल*
👉 *कोणत्याही कारणाने जर त्या नागरिकाचा मृत्यू होतोय तर त्यांचा वारस ही योजना पुढे चालू ठेऊ शकतो*
👉 *काही ठराविक वर्षे गेल्यानंतर आपणास ह्या योजनेमध्ये हफ्ते भरणे शक्य होत नसल्यास तर आपण आपले पेंशन खाते बंद करू शकतो*
👉 *पेंशन खाते बंद केले नंतर आपणास आपण जेवढी काही रक्कम आपल्या पेंशन खात्यात भरली असेल ती व्याजा सहित परत मिळेल या मध्ये भारत सरकार यांचा हिस्सा मिळणार नाही*

*तरी आजच प्रधानमंत्री श्रमयोगी योजनेत आपले पेंशन खाते सुरू करा व आपले भविष्य सुरक्षित करा*

*या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या जवळच्या सि एस सि सेंटर ला आधार कार्ड व राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक सह भेट द्या*

*जनहितार्थ प्रसारित*

26 janewari 2019
26/01/2019

26 janewari 2019

💐प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐26 जानेवारी 2019
26/01/2019

💐प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
26 जानेवारी 2019

26/01/2019

ग्रामपंचायत इंजेवारी ता आरमोरी जि गडचिरोली गाव इंजेवारी व पेठ तुकुम येथील सर्व ध्वजारोहण कार्यक्रम पार पाडण्यात आले

26/01/2019

ग्रामपंचायत इंजेवारी तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली येथील ध्वजारोहणाचे कार्यक्रम 26/01/2019 ला मा. श्री. अतुल आ. आकरे उपसरपंच ग्राम पंचायत इंजेवारी यांच्या हस्ते पार पाडण्यात आले.
26/01/2019 च्या ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित ग्रामपंचायत इंजेवारी येथील ग्रा.प.सदस्य, जिल्हा परिषद शाळा इंजेवारी शिक्षक वृंद तथा पदाधिकारी, इंजेवारी व पेठ तुकुम येथील सर्व नागरिक उपस्थित होते

मा. पंतप्रधान महोदय यांच्या उपस्थितीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरे देण्याचा कार्यक्रम दि. 19.10.201...
17/10/2018

मा. पंतप्रधान महोदय यांच्या उपस्थितीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरे देण्याचा कार्यक्रम दि. 19.10.2018 रोजी सकाळी 10.30 वाजता शिर्डी येथे पार पडणार आहे. सदर कार्यक्रम डीडी सह्याद्री वाहिनीवर लाईव्ह दाखविला जाणार आहे. मा. पंतप्रधान महोदय 29 जिल्ह्यांतील लाभार्थ्यांसोबत व्हिडीयो कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत. www.pmindiawebcast.nic.in ह्या लिंक चा वापर करून आपण स्वतः विडिओ बघु शकता.

Webcast Services of National Informatics Centre, NIC, Department of Information Technology, Govt. of India

14/10/2018

hiii

आज दिनांक 2/10/2018 ला ग्रामपंचायत इंजेवारी ता आरमोरी जि गडचिरोली येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी क...
02/10/2018

आज दिनांक 2/10/2018 ला ग्रामपंचायत इंजेवारी ता आरमोरी जि गडचिरोली येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. इंजेवारी गावामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आली व गावामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली.
स्वच्छतेला उपस्थित मा.श्री. अतुल आकरे उपसरपंच ग्रा.पं.,मा.श्री. कुमेश धुपजारे सदस्य, मा.श्री. बन्सोड ग्रामसेवक ग्रा. पं. इंजेवारी, मा. आरोग्य कर्मचारी , शिक्षक वृंद जि प उच्च प्राथ. शाळा इंजेवारी, बचत गटाच्या महिला, इंजेवारी व पेठ तुकुम येथील सर्व नागरिक सहभागी होते.

Address

Armori

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when VillageBook,Injewari,Armori,Gadchiroli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share