VillageBook,Lahan,Ardhapur, Nanded

VillageBook,Lahan,Ardhapur, Nanded Smart Village

ग्रामविकास अधिकारी श्रीमान संभाजी बुरगुलवार भाऊसाहेबांना लहान ग्रामपंचायतीचा पदभार हस्तांतरित करण्यात आला.
05/12/2022

ग्रामविकास अधिकारी श्रीमान संभाजी बुरगुलवार भाऊसाहेबांना लहान ग्रामपंचायतीचा पदभार हस्तांतरित करण्यात आला.

30/11/2022
मुक्तिसंग्राम दिनी शाश्वत स्वच्छतेची शपथ स्वच्छता हि सेवा उपक्रमाचा शुभारंभ कर्तुत्ववान गुणीजण ग्राम गौरव पुरस्काराने सन...
18/09/2022

मुक्तिसंग्राम दिनी शाश्वत स्वच्छतेची शपथ
स्वच्छता हि सेवा उपक्रमाचा शुभारंभ
कर्तुत्ववान गुणीजण ग्राम गौरव पुरस्काराने सन्मानित
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त लहान येथील श्री क्षेत्र बसवेश्वर संस्थान सभागृहात स्वच्छता हि सेवा उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सरपंच अमोल इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमास कृषी अधिकारी मुरली राजे, विस्तार अधिकारी विश्वनाथ मुंडकर, ग्रामविकास अधिकारी शिव कुमार देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी जिल्हा परिषद प्रशालेच्या उपक्रमशील शिक्षिका एस एम घटकार, स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य विठ्ठल कुंदेवार, मंगेश कुऱ्हाडे, गोविंदराव कल्याणकर, आशा वर्कर्स संगीता लोणे, प्रिती आंबेकर, उमेद महिला प्रभाग संघ, अंगणवाडी क्रमांक 3 व 4 आदींना मानपत्र, सन्मान चिन्ह, शाल व पुष्प गुच्छ देवून मान्यवरांच्या हस्ते ग्राम गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विस्तार अधिकारी गोखले यांनी आरोग्य व स्वच्छतेविषयी मार्गदर्शन करताना आरोग्यमान उंचावण्यासाठी परिसर स्वच्छता ठेवून सातत्य टिकविण्याबाबत आवाहन केले. उपसरपंच शेख महेबूब यांनी स्वच्छतेची सामूहिक शपथ घेवून कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत सदस्य सदाशिव इंगळे, आनंद लोणे, अशोक देशमुख, तंटामुक्ती अध्यक्ष गोविंदराव हारकरी, विजय सावंत, दलित वाहेवळ, साहेबराव सुर्यवंशी आदींनी सहभाग नोंदवला.

महा आवास अभियान सन 2021-22 अंतर्गत तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार लहान ग्रामपंचायतीस गटविकास अधिकारी श्रीमती मीन...
18/09/2022

महा आवास अभियान सन 2021-22 अंतर्गत तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार लहान ग्रामपंचायतीस गटविकास अधिकारी श्रीमती मीना रावताळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी सरपंच Amol B Ingle Patil, ग्रामविकास अधिकारी शिव कुमार व ग्रामस्थ

🏘️ रमाई आवास योजनेंतर्गत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा प्रथम पुरस्कार लहान ग्रामपंचायतीस जाहीर झाला आहे. तसेच सर्वोत्कृष्ट...
17/09/2022

🏘️ रमाई आवास योजनेंतर्गत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा प्रथम पुरस्कार लहान ग्रामपंचायतीस जाहीर झाला आहे. तसेच सर्वोत्कृष्ट घरकुल पुरस्काराचे प्रथम पारितोषिक गावातील श्रीमान नागेश गणेश वाहेवळ यांना जाहीर झाले आहे. त्याबद्दल ग्रामपंचायतीचे सर्व सन्माननीय सदस्यांचे व सक्रिय सहभाग नोंदविलेल्या सर्व सहकारी बांधवांचे हार्दिक अभिनंदन..! दि.17 सप्टे 2022 रोजी सकाळी 8.00 ते 9.00 च्या दरम्यान पंचायत समिती अर्धापूर येथे उपरोक्त सन्मान दिले जाणार आहेत. 🪴🪴

मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी
15/09/2022

मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी

ग्राम गौरव पुरस्कार वितरण समारंभ
15/09/2022

ग्राम गौरव पुरस्कार वितरण समारंभ

स्वच्छता हि सेवा
15/09/2022

स्वच्छता हि सेवा

🌷✒️एक तास वाचनाचा. वर्ग सहावा 📚📚📚 ऊपक्रम.. दर शनिवार अभ्यासक्रमाव्यतिरिक्त पुस्तके.
10/09/2022

🌷✒️एक तास वाचनाचा. वर्ग सहावा 📚📚📚
ऊपक्रम.. दर शनिवार अभ्यासक्रमाव्यतिरिक्त पुस्तके.

06/09/2022

शिक्षक दिनी गुरुजनांचा सन्मान    जिल्हा परिषद प्रशालेचे उपक्रमशील शिक्षक बी एस जूरावाड व श्रीमती एस एम घटकार आदी कर्तुत्...
05/09/2022

शिक्षक दिनी गुरुजनांचा सन्मान
जिल्हा परिषद प्रशालेचे उपक्रमशील शिक्षक बी एस जूरावाड व श्रीमती एस एम घटकार आदी कर्तुत्ववान गुरुजींना यावर्षीचा ग्रामगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. सरपंच अमोल पाटील इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विशेष बैठकीस सदर निवड करण्यात आली. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. निवडीबद्दल उपसरपंच शेख महेबूब, ग्रामविकास अधिकारी शिवकुमार देशमुख, शालेय व्यवस्थापन समिती, तंटामुक्त समिती, सोसायटीचे संचालक मंडळ, पोलीस पाटील यांसह ग्राम प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

Address

At Post Lahan
Ardhapur
431704

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm

Telephone

+919552434142

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when VillageBook,Lahan,Ardhapur, Nanded posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share