Amravati Collector

Amravati Collector Official page of the office of Amravati Collector & District Magistrate, Maharashtra govt. ii) Land acquisition. iv) Local Self Govt.

The Amravati district in Maharashtra India is the cutting edge of administration. The District administration is headed by the District Collector drawn from IAS and he is responsible among others for the general control and direction. The Amravati district is split up into 7 sub divisions and 14 Talukas for the purpose of Administrative convenience. And to have a better supervision of the many Ta

luks,there has been a grouping of the taluks,each group of taluks under a Division which is headed by an official called 'Tehsildar'. The District Collector through the ZIila Parishads,Blocks(Panchayat Samithis)/Taluks and Gram Panchayat administer development programmes and supervises them. The Followings are the functions that are held in Collector Office, AMRAVATI. i)Maintenance of Land records,collection of Land revenue and allied matters. iii) Control over extraction of Minor Minerals and collection of royalty for minor minerals. v) Resettlement of Project Affected Persons during Disaster management and during riots/external aggression. vi) Law and Order,
vii) Elections
viii) Entertainment
ix) Civil Supplies
x) Land reforms

✅ पुरेसा साठा: BPCL, HPCL, IOCL, RELIANCE आणि NAYARA कडे पुरेसा पेट्रोल व डिझेल साठा उपलब्ध आहे.• 🛑 साठेबाजी टाळा: गरजेप...
03/06/2026

✅ पुरेसा साठा: BPCL, HPCL, IOCL, RELIANCE आणि NAYARA कडे पुरेसा पेट्रोल व डिझेल साठा उपलब्ध आहे.

• 🛑 साठेबाजी टाळा: गरजेपुरतेच इंधन खरेदी करा, अनावश्यक साठा करू नका.

• 📢 अधिकृत माहिती: केवळ प्रशासनाने दिलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा.

जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध असून, सर्व स्तरांवर इंधन वितरण व्यवस्था अत्यंत सुरळीतपणे सुरू आहे. नागरिकांनी ...
02/06/2026

जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध असून, सर्व स्तरांवर इंधन वितरण व्यवस्था अत्यंत सुरळीतपणे सुरू आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती तर्फे करण्यात आले आहे.
आयओसीएल (IOCL), बीपीसीएल (BPCL), एचपीसीएल (HPCL), नायरा (Nayara) आणि रिलायन्स (Reliance) या मुख्य तेल कंपन्यांकडून इंधनाचा पुरवठा विनाअडथळा सुरू आहे. अनावश्यक साठेबाजी टाळून नागरिकांनी केवळ आवश्यकतेनुसारच खरेदी करावी.

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अभिनव संकल्पनेतून राज्यात प्रथमच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शंभर टक्के पारदर्शक बदल्या ...
31/05/2026

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अभिनव संकल्पनेतून राज्यात प्रथमच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शंभर टक्के पारदर्शक बदल्या

अमरावती , दि. ३० : जिल्हा प्रशासनात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बदल्या यावर्षी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या नेतृत्वात करण्यात आल्या असून यावर्षी जिल्हा प्रशासनाने राज्यात प्रथमच समुपदेशाने बदलीचे धोरण काटेकोरपणे अंमलबजावणी करीत केले आहे. जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी स्वतः बदलीसाठी पात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.

शंभर टक्के बदल्या समुपदेशाने करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाची भावना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या बचतीच्या आव्हानाला प्रतिसाद देत समुपदेशनाने बदलीचा प्रयोग जिल्ह्यात यशस्वी ठरलेला आहे. जिल्हाधिकारी, अमरावती यांच्या आस्थापनेवरील प्रशासकीय बदलीस पात्र सहायक महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सहायक व वाहनचालक या संवर्गांच्या प्रशासकीय बदल्या-२०२६ दि. २९ मे २०२६ रोजी समुपदेशनाद्वारे पार पडलेल्या आहेत.

दरवर्षी समुपदेशनाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे प्रशासकीय बदलीस पात्र कर्मचारी उपस्थित राहून समुपदेशनाद्वारे बदली प्रक्रियेत सहभागी होतात. परंतु यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील नागरिकांना केलेल्या आवाहनानुसार घरून काम करण्याची मुभा, अनावश्यक सोने खरेदी टाळणे, पेट्रोल व डिझेलचा वापर कमी करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करणे, खाद्यतेलाचा वापर कमी करणे, रासायनिक खतांवरील अवलंबिता कमी करून नैसर्गिक शेती करणे, स्वदेशी उत्पादनांचा वापर वाढविणे व परदेश दौरे टाळणे इ. बाबींचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने उपाय योजना प्रस्तावित केल्या आहेत.

त्यानुसार केंद्र व राज्य शासनाने सूचित केलेल्या उपाययोजनांचे अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती यांच्या अधिनस्त जिल्ह्यातील सहायक महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, महसुल सहायक, ग्राम महसुल अधिकारी, वाहन चालक इत्यादी संवर्गातील बदलीपात्र कर्मचाऱ्यांना पेट्रोल, डिझेलचा अपव्यय टाळण्यासाठी तसेच प्रवास टाळण्यासाठी त्यांच्या कार्यालयातून जिल्हाधिकारी कार्यालयात न बोलविता दि. २९ मे रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे समुपदेशन बदली प्रक्रिया आयोजित करण्यात आली. यामध्ये सहायक महसूल अधिकारी संवर्गात बदलीस पात्र ४१ कर्मचाऱ्यांपैकी ४१ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली, मंडळ अधिकारी संवर्गात ५ पात्र कर्मचाऱ्यांपैकी ५ कर्मचाऱ्यांची बदली झाली, ग्राम महसूल अधिकारी संवर्गात ८२ पात्र कर्मचाऱ्यांपैकी ८२ कर्मचाऱ्यांची बदली झाली, महसूल सहायक संवर्गात ३९ पात्र कर्मचाऱ्यांपैकी ३९ कर्मचाऱ्यांची बदली झाली आणि वाहन चालक संवर्गात ३ पात्र कर्मचाऱ्यांपैकी ३ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आलेली आहे.

या बदली प्रक्रियेत सर्व संबंधित कर्मचारी यांनी त्यांच्या कार्यालयातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतलेला आहे. वरीलप्रमाणे पार पडलेल्या बदली प्रक्रियेबाबत सर्व कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. धारणी, वरूड, अंजनगांव सुर्जी, धामणगांव रेल्वे इत्यादी दूरच्या कार्यालयातून बदली प्रक्रियेसाठी अमरावती मुख्यालयात न येता त्यांच्या स्वतःच्या कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रक्रियेत सहभागी होता आल्यामुळे अत्यंत पारदर्शक व विक्रमी वेळेत बदली प्रक्रिया पार पडल्यामुळे कर्मचारी संघटनांनी आनंद व्यक्त केलेला आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी अभिनव संकल्पना राबविल्यामुळे त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. या बदली प्रक्रियेमुळे कर्मचाऱ्यांच्या वेळेचा व पैशाचा अपव्यय न झाल्यामुळे सदर बदली प्रक्रिया यापुढेही अशाचप्रकारे राबवावी, असे कर्मचाऱ्यांनी मत व्यक्त केले आहे. आशियाई संकटाच्या आव्हानात्मक परिस्थितीत जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी प्रशासकीय बदल्या सुयोग्य, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने पार पाडल्या आहेत आणि हा उपक्रम निश्चितच प्रशंसनीय आहे.

लोकराजी, राजयोगिनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! 🙏✨आपल्या कुशल प्रशासनाने, प्रजाहितदक्...
30/05/2026

लोकराजी, राजयोगिनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! 🙏✨
आपल्या कुशल प्रशासनाने, प्रजाहितदक्ष निर्णयांनी आणि धार्मिक व सामाजिक कार्याने इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नाव कोरणार्‍या, स्त्रीशक्तीचे आणि लोककल्याणाचे महान प्रतीक, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम!

29/05/2026

शहरात प्रस्तावित “फिशरीज हब” अत्याधुनिक मासळी बाजारपेठ प्रकल्पाच्या उभारणीसंदर्भात महानगरपालिकेत महत्त्वपूर्ण पाहणी दौरा व आढावा कार्यक्रम पार पडला. मा.विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या पाहणी दरम्यान प्रकल्पाच्या विविध तांत्रिक, प्रशासकीय व विकासात्मक बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या पाहणी प्रसंगी जिल्हाधिकारी श्री.आशिष येरेकर, महानगरपालिका आयुक्त श्रीमती वर्षा लड्डा आणि मत्स्यव्यवसाय प्रादेशिक उपआयुक्त श्री.सुनिल जांभुळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या पाहणी दरम्यान मत्स्यव्यवसाय विभाग व महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत प्रकल्पासंदर्भातील सद्यस्थितीचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्तांनी प्रकल्पातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभाग प्रमुखांना दिले. विशेषतः पाण्याच्या टाकीचे बांधकाम व अन्य आवश्यक विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याबाबत त्यांनी कडक सूचना केल्या. तसेच प्रकल्पाच्या उर्वरित विकासकामांबाबत आणि तांत्रिक बाबींवर आवश्यक तपासणी करून तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. पूर्णत्वास आलेला हा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावरही या पाहणी दरम्यान विशेष भर देण्यात आला.
या प्रकल्पासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत पाणीपुरवठ्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार असून, त्यासंदर्भातील बहुतांश कामे पूर्ण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच जिल्हा परिषदेमार्फत बारमाही तलावांमध्ये उत्पादित होणारे मासे या प्रकल्पाशी जोडण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली, ज्यामुळे स्थानिक मत्स्य उत्पादकांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल.
प्रकल्पाचे प्रभावी संचालन, आरएफटी/ईओआय प्रक्रिया व भविष्यातील कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी एक तांत्रिक समिती स्थापन करण्याचा निर्णयही या पाहणी दरम्यान घेण्यात आला. ही समिती आगामी १५ जून २०२६ पर्यंत आपला सविस्तर अहवाल सादर करणार असून, त्यानंतर पुढील अंतिम कार्यवाही करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध असून, सर्व स्तरांवर इंधन वितरण व्यवस्था अत्यंत सुरळीतपणे सुरू आहे. नागरिकांनी ...
29/05/2026

जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध असून, सर्व स्तरांवर इंधन वितरण व्यवस्था अत्यंत सुरळीतपणे सुरू आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती तर्फे करण्यात आले आहे.

आयओसीएल (IOCL), बीपीसीएल (BPCL) आणि एचपीसीएल (HPCL) या मुख्य तेल कंपन्यांकडून इंधनाचा पुरवठा विनाअडथळा सुरू आहे. अनावश्यक साठेबाजी टाळून नागरिकांनी केवळ आवश्यकतेनुसारच खरेदी करावी.

Address

Collector Office, Camp Road
Amravati
444601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amravati Collector posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Amravati Collector:

Share