13/02/2026
*अमरावती जिल्हा एन.एस.यु.आय.च्या मेंबरशिप ड्राइव्हची सुरवात*
जॉइन एन.एस.यु.आय. टुडे लीड इंडिया टुमारो या अभियाना अंतर्गत अमरावती जिल्हा मध्ये एन एस यु आय च्या डिजिटल सभासद नोंदणी चा प्रारंभ आज काँग्रेस भवन इथे करण्यात आला. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविन्यात अग्रेसर असलेल्या एन.एस.यु.आय. मध्ये सामिल होण्याची अनेक नवयुवक , विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची इच्छा असते हिच बाब लक्ष्यात घेता प्रदेशाध्यक्ष सागर सालुंखे , प्रदेश प्रभारी अक्षय यादव क्रांतिवीर यांच्या मार्गदर्शनात तसेच प्रदेश उपाध्यक्ष संकेत कुलट व जिल्हाध्यक्ष सर्वेश खांडे यांच्या नेतृत्वात सदर डिजिटल मेंबरशिप ड्राईव्ह पूर्ण अमरावती जिल्ह्यात सुरू करण्यात आलेला आहे सदर कार्यक्रमाला प्रामुख्याने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सहसचिव निलेश पटेल, प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष सुनील भाऊ देशमुख ,भा.ई. नगराळे , हरिभाऊ मोहोळ अशोक बोबडे , अमरावती काँग्रेस कमेटी अध्यक्ष बबलू शेखावत ,मिलिंद भाऊ चिमोटे प्रामुख्याने उपस्तिथ होते. सदर मोहिमे द्वारे सदस्य होण्याकरिता एन.एस.यु.आय. तर्फे फेसबुक , इंस्टाग्राम , व्हाट्सएप वर क्यु. आर. कोड . प्रसिद्ध करण्यात आला असून तो स्कैन करून आपण एन.एस.यु.आय. चे सक्रिय सदस्य होऊ शकता या करिता विद्यार्थ्यांना एन.एस.यु.आय. अमरावती च्या सोशल मीडिया ला भेट द्यावी लागेल किंवा 911-555-5005 या व्हाटसअप क्रमांकावर संपर्क साधावा लागेल. तसेच एन.एस.यु.आय. चे पदाधिकारी संपूर्ण महाविद्यालयात जाउन या मोहिमेचा प्रचार करणार आहेत . तरी विद्यार्थी हितासाठी लड़णाऱ्या एन.एस.यु.आय. मध्ये सहभागी होण्याचे आवाहन खा. बलवंत भाऊ वानखड़े , माजी पालकमंत्री यशोमती ताई ठाकुर , बबलू भाऊ देशमुख , वीरेंद्र भाऊ जगताप , विलासभाऊ इंगोले ,भैया पवार यांच्या तर्फे करण्यात आले आहे.