08/01/2025
आज महाराष्ट्र शासन यांच्या परिपत्रकानुसार वाचन संस्कृतीच्या विकासाने तरुणांचा व्यक्तिमत्वचे भरणपोषण होण्यास तसेच सामाजिक प्रबोधन होण्यास मदत होते. परंतु अलीकडच्या काळात देशाचे तरुण वाचन संस्कृतीपासून दुरावत चाललेल्या आढळुन येतो. त्यामुळे तरुण पिढीला प्रत्यक्ष ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने श्री शिवाजी शारिरीक शिक्षण महाविद्यालयात ग्रंथालयमध्ये विद्यार्थीसाठी दिनांक १ जानेवारी ते १५ जानेवारी पासून "वाचन संकल्प महाराष्ट्रचां" या संकलपणेतून ग्रंथालय विभाग व्दारे वाचन पंधरवडा या कार्यक्रम अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित केले गेले आहे त्या निमित्य श्री शिवाजी शारिरीक शिक्षण महाविद्यालय ग्रंथालाय तर्फे “सामुहिक वाचन” चे आयोजन आज करण्यात आले होते.