12/12/2025
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभेचे प्रदेश सरचिटणीस पदी प्रा.डॉ.सुशील गावंडे यांची नियुक्ती
महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री मा. ना. दत्तामामा भरणे यांच्या हस्ते जाहीर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभेच्या प्रदेश सरचिटणीस पदी प्रा. डॉ. सुशील गावंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री मा. ना. दत्तामामा भरणे यांच्या हस्ते किसान सभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲड. वसंतराव मनकर यांनी ही निवड जाहीर केली.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोषराव महात्मे, जिल्हा कोषाध्यक्ष प्रवीणजी भुजाडे, दर्यापूर तालुकाध्यक्ष ग्रामीण निलेश मोपारी, जिल्हा सरचिटणीस कुलदीप काळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस ग्रामीण अध्यक्ष नितीन गावंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या नियुक्तीबद्दल विदर्भ प्रदेशाध्यक्ष जगदीशराव जुनघरी, आमदार संजयजी खोडके, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखाताई ठाकरे, आमदार सुलभाताई खोडके, माजी आमदार देवेंद्रजी भुयार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोषराव महात्मे, शहर जिल्हाध्यक्ष प्रशांतराव डवरे, जिल्हा कोषाध्यक्ष प्रवीणजी भुजाडे, विदर्भ प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस निखिल ठाकरे, यश खोडके,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष गुड्डू पठाण, बाळासाहेब राऊत, शेखर पाटील हुतके, अनंतराव राऊत ,युवक जिल्हाध्यक्ष अंकुश घारड,
सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष ॲड जगदीशराव विल्हेकर , विद्यार्थी जिल्हाध्यक्ष आदी पदाधिकाऱ्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
प्रा. डॉ. सुशील गावंडे हे दर्यापूर अंजनगाव विधानसभा क्षेत्रातील सक्रिय, अभ्यासू व दूरदर्शी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट) दर्यापूर अंजनगाव विधानसभा अध्यक्ष तसेच दि. दर्यापूर तालुका सहकारी शेतकी खरेदी-विक्री संस्था येथे विद्यमान संचालक आहेत.
शिक्षण क्षेत्रात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान असून मराठी, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, एम.एस.डब्ल्यू., एम.फिल व पीएच.डी. अशी उच्च शैक्षणिक पात्रता त्यांनी संपादन केली आहे. “Displacement and Rehabilitation” या विषयावर केलेले संशोधन सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या त्यांच्या दृष्टीकोनाची साक्ष देते.
या पूर्वी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष, विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष, कला-क्रीडा विभाग प्रदेश सरचिटणीस तसेच विविध सामाजिक संघटनांमध्ये त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत. कोविड काळात जिल्ह्यात तब्बल २७ रक्तदान शिबिरांचे आयोजन करून त्यांनी उल्लेखनीय सामाजिक कार्य केले आहे.
भविष्यात प्रदेशातील शेतकरी हित, खारपान पट्टा प्रश्न, शाश्वत शेती, सिंचन व्यवस्थापन, दुग्धव्यवस्थापन, शिक्षण क्षेत्रातील सुधारणा व ग्रामीण रोजगारनिर्मिती या महत्त्वाच्या मुद्द्यांवर काम करण्याचा त्यांचा दृढ संकल्प आहे.
प्रा. डॉ. सुशील गावंडे यांच्या नियुक्तीमुळे किसान सभेच्या संघटनात्मक बळकटीला नवीन दिशा व गतिमान नेतृत्व लाभेल, असा विश्वास पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे.
Ajit Pawar Sunil Tatkare
Dattatray Bharane Ncp_Maharashtra_Updates NCP Youth Amravati Sushil Gawande Sushil Gawande Amravati Collector