14/12/2025
आमचे मत छाया ताईंना.. आमचे मत कमळाला...!
भारतीय जनता पक्ष आणि रि.पा.इं. (आठवले गट) युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील (अनुक्रमांक १) आणि भारतीय जनता पक्ष आणि रि.पा.इं. (आठवले गट) युतीच्या नगरसेवक पदाच्या अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक २६-अ मधून सौ. छाया ईश्वर निकम ( अनुक्रमांक २) व प्रभाग क्रमांक २६-ब मधून श्रीमती. ज्योती कालिदास डोंगरे (हुमणे) (अनुक्रमांक २) यांना प्रभागातील नागरिकांनी पाठिंबा दर्शवला आहे.
प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी निस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या आपल्या उमेदवार नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नाला संवेदनशीलतेने हाताळतात. स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते-विकास, प्रकाशयोजना, महिलांसाठी सुरक्षित वातावरण, मुलांसाठी खेळाची मैदाने आणि वरिष्ठ नागरिकांसाठी सुविधांची कमतरता दूर करण्याचा त्यांचा दृढ संकल्प आहे. प्रभागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी त्या नेहमीच अग्रस्थानी असतात.
शनिवार, दिनांक २० डिसेंबरला आपल्या उमेदवारांना कमळाच्या चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा. आपले एक मत अंबरनाथला व प्रभाग २६ ला सुरक्षित, विकसित आणि सक्षम बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
#भाजप2025