07/02/2026
नागरी संरक्षण संघटना तसेच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्यामार्फत ठाणे येथील विद्या प्रसारक मंडळाचे बा. ना. बांदोडकर महाविद्यालय व राष्ट्रीय सेवायोजन यांच्या विद्यार्थ्यांसाठी "आपत्ती व्यवस्थापन आणि नागरी संरक्षण मध्ये विद्यार्थी व नागरिकांचा सहभाग " ह्या विषयावर तीन दिवसीय जनजागृती व आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक शिबीर दिनांक 05 फेब्रुवारी 2026 ते 07 फेब्रुवारी 2026 या कालावधीत घेण्यात आले.
माननीय श्री विजय जाधव, उपनियंत्रक नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तसेच श्री यासीन तडवी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ठाणे महापालिका आणि मीनल वानखेडे उप प्राचार्या बा. ना बांदोडकर महाविद्यालय यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर शिबिराचे उद्घाटन झाले. नागरी संरक्षण व ठाणे आपत्ती प्रतिसाद दल यांच्या मार्फत बांदोडकर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवायोजन चे विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसीय आपत्ती व्यवस्थापन विषयी जनजागृती तसेच आपत्ती व्यवस्थापन कार्यात वापरण्याचे साहित्य यांची माहिती आणि प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.
या तीन दिवसीय शिबिरात ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा ठाणे आपत्ती प्रतिसाद दल चे व्यवस्थापक श्री यासीन तडवी , नागरी संरक्षण संघटनेचे सहाय्यक उपनियंत्रक श्री आननसिंग गढरी , श्री बिमल नथवाणी उपमुख्य क्षेत्ररक्षक क्षेत्र - 1 , श्री कमलेश श्रीवास्तव उपमुख्य क्षेत्ररक्षक क्षेत्र- 3, श्री कॅरमबिर सिंग भुर्जि उपमुख्यक्षेत्ररक्षक क्षेत्र - 4 , श्री हनुमान चौधरी विभागीय क्षेत्ररक्षक मानपाडा डोंबिवली, श्री रोहित सिंग राठोड स्वयंसेवक नागरी संरक्षण दल यांनी सहभाग घेतला. या शिबिरात श्री बिमल नथवाणी व श्री हनुमान चौधरी यांनी या तीन दिवसांत आपत्ती, आपत्ती व्यवस्थापन, प्रथमोपचार आणि आग ह्या विषयांवर मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे आपत्कालीन उचल पद्धती, कृत्रिम श्वसन पद्धती आणि आग विझवण्यासाठी वापराच्या पद्धती यांची प्रात्यक्षिके करून दाखवले ह्या कार्यात त्यांना रोहित सिंग राठोड यांनी सहकार्य केले.
शनिवार दिनांक 07 फेब्रुवारी रोजी ह्या तीन दिवसीय शिबिराच्या समारोपप्रसंगी माननीय आमदार तथा मुख्य क्षेत्ररक्षक नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे. श्री संजय जी केळकर यांनी आवर्जून भेट देवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच महाविद्यालयाचे देखील विद्यार्थ्यांना ह्या शिबिराचे माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन बाबतित सजग होण्यासाठी शिबिराचे आयोजन केल्याबद्दल कौतुक केले. जास्तीत जास्त तरुण वर्गाने नागरी संरक्षण संघटनेचे माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेण्याची काळाची गरज असल्याचे त्यांनी ह्यावेळी नमूद केले. तसेच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा TDRF चे प्रमुख श्री यासीन तडवी यांनी देखील मार्गदर्शन करताना म्हटले की एकीकडे दिवसेंदिवस वाढते शहरीकरण आणि भरमसाठ होणारी लोकसंख्या वाढ आणि त्यामानाने प्रशासकीय व आपत्ती निवारण साठी असलेले तुटपुंजे मनुष्यबळ पाहता जास्तीत जास्त विद्यार्थी व नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेणे व आपत्ती सजगता वाढवणे अतिशय गरजेचे आहे. याप्रसंगी महाविद्यालयाच्या उप प्राचार्या मीनल वानखेडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे ह्या शिबिरात सहभागी झाल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच ह्या शिबिरात प्रशिक्षण देण्यासाठी आलेल्या नागरी संरक्षण आणि TDRF टीम चे आभार मानून यापुढे देखील विद्यार्थ्यांसाठी असेच शिबिराचे आयोजन करण्याचे तसेच प्रगत प्रशिक्षण वर्ग देखील नागरी संरक्षण संघटनेचे मार्फत आयोजन करण्यास महाविद्यालय सहकार्य करेल असे सांगितले.
या तीन दिवसीय शिबिरात महाविद्यालयाचे 120 विद्यार्थ्यांसह प्राध्यापक वर्गातून
उमालक्ष्मी पाटणे, सायली दप्तरदार , ऋषिकेश लबदे हे देखील सहभागी झाले होते.