ग्रामऊर्जा फ़ाउंडेशन GramUrja Foundation

  • Home
  • India
  • Ambajogai
  • ग्रामऊर्जा फ़ाउंडेशन GramUrja Foundation

ग्रामऊर्जा फ़ाउंडेशन GramUrja Foundation We are a team of rural development professionals who are working on educational, livelihood, and governance initiatives.

We believe in the immense power possessed by the masses. Institutions need to play empowerment and enabling roles for channelizing it

आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा आहे! आज आम्हाला आभिमान वाटतोय, आमच्या तीन मुलींची निवड Greaves या नामांकित कंपनी म...
16/05/2026

आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा आहे!

आज आम्हाला आभिमान वाटतोय, आमच्या तीन मुलींची निवड Greaves या नामांकित कंपनी मध्ये झाली आहे.

ग्रामऊर्जा फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मागील तीन वर्षांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. ज्या मुलींचे शिक्षण थांबणार होते, ज्यांच्या आयुष्यात लवकर लग्नाचे संकट होते, अशा मुलींना शिक्षण, मार्गदर्शन आणि संधी देण्याचे काम आम्ही करत आहोत.

आज त्या मुली आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत, ही आमच्यासाठी खऱ्या अर्थाने आनंदाची आणि समाधानाची बाब आहे.

उसतोड कामगारांच्या घरातील मुलगी आज ३० हजार रुपये महिन्याचा पगार मिळवत आहे…
तीच आता इतर हजारो मुलींसाठी एक प्रेरणा बनली आहे. ✨

शिक्षण फक्त आयुष्य बदलत नाही, तर संपूर्ण कुटुंब आणि समाज बदलण्याची ताकद त्यात असते.

या सर्व मुलींचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! 💐

नमस्कार!अनेक पालक, हितचिंतक यांच्या आग्रहाखातर आम्ही आपल्या अंबाजोगाई शहरात आपल्या मुलांसाठी समर कॅम्प आयोजित करतोय.पहिल...
13/05/2026

नमस्कार!
अनेक पालक, हितचिंतक यांच्या आग्रहाखातर आम्ही आपल्या अंबाजोगाई शहरात आपल्या मुलांसाठी समर कॅम्प आयोजित करतोय.
पहिले वर्ष असल्याने मर्यादित प्रवेश आपण देतोय.

🌞🎨 समर कॅम्प 2026
मुलांच्या आनंदी आणि सर्जनशील सुट्ट्यांसाठी खास उपक्रम!

📅 दिनांक : 28 व 29 मे 2026

📌 पालकांसाठी महत्त्वाच्या सूचना

✨ फक्त 40 विद्यार्थ्यांसाठी मर्यादित प्रवेश
✨ समर कॅम्प फक्त आंबेजोगाई तालुक्यातील मुलांसाठी
✨ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी मुलांना स्वतः सोडणे व घेऊन जाणे आवश्यक
✨ वेळ : सकाळी 09:00 ते सायंकाळी 4:00
✨ कृपया वेळेचे पालन करावे

🌈 मुलांच्या कला, खेळ, सर्जनशीलता आणि नवीन शिकण्याचा सुंदर अनुभव!

🙏 आपल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
कृषि विज्ञान केंद्र अंबाजोगाई Manavlok Ambajogai Ashok Hatagale Dadasaheb Pandit Gaikwad Pooja Sapte Sanjeevani Gulbhile Er Datta Shingade
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSenBw9VRUxgUqotvSuQHA0VvPe9Li6v2kYDZeY2e6cJ6arGIg/viewform?usp=publish-editor

26/04/2026

"संघर्षातून उभी राहणारी नवी पहाट."

#शिक्षणासाठी_एकपाऊल ruraldevelopment

26/04/2026

जिल्हा परिषद शाळा आवरगाव बॉटल वाटप कार्यक्रम.

zpschool plasticfree school

26/04/2026

राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा!

ग्रामऊर्जा फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेतील बच्चे कंपनीसोबत विज्ञान दिन साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी विविध नावीन्यपूर्ण प्रयोग सादर केले आणि विशेष बाब म्हणजे प्रत्येक प्रयोगामागील संकल्पना त्यांना सखोलपणे समजलेली होती.

हा दिवस केवळ प्रयोगांपुरता मर्यादित न राहता विज्ञानाच्या संकल्पना अधिक स्पष्ट करणारा ठरला.
प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद आणि मुलांचा उत्स्फूर्त सहभाग हेच आमचं खरं यश!

zpschool शिक्षणासाठी_एकपाऊल

26/04/2026

ग्रामीण भागात शासनाच्या योजनांची जनजागृती आणि गरजु पर्यंत शासकीय योजना पोहचवण्यासाठी ग्राम ऊर्जा ची टीम सज्ज होतं आहे.

शासकीय योजना प्रशिक्षण कार्यक्रम

RuralDevelopment BEED

26/04/2026

चला पुस्तकांशी मैत्री करूया..!

ग्रामऊर्जा फाउंडेशन च्या माध्यमातुन मुलांची पुस्तकांशी मैत्री वाढवण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविले जातात.

पुस्तकमैत्री zpschool BEED

26/04/2026

“विचारांची देवाणघेवाण, अनुभवांचा आढावा आणि भविष्याची दिशा — ग्राम ऊर्जा डायरेक्टर मीटिंग 2026.”

ChangeMakers GrassrootImpact SocialImpact PlanningToAction VillageDevelopment

Address

Vidyut Nagar, Beed Road, Morewadi
Ambajogai
431517

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm
Sunday 9am - 8pm

Telephone

+919911887565

Alerts

Be the first to know and let us send you an email when ग्रामऊर्जा फ़ाउंडेशन GramUrja Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to ग्रामऊर्जा फ़ाउंडेशन GramUrja Foundation:

Share