Shahid bhagat singh colony deopur dhule

Shahid bhagat singh colony deopur dhule Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shahid bhagat singh colony deopur dhule, Public & Government Service, shahid bhagat singh colony deopur, Akola.

19/02/2017

छत्रपती शिवाजी महाराज :
बहमनी कालखंडाचे विघटन झाल्यावर ज्या सरदारांच्या खांद्यावर विविध शाही सुखेनैव राज्य करीत होत्या, त्यात भोसले व जाधव या घराण्यांचा समावेश होता. मालोजी राजांपासून आपणास भोसले घराण्याचा इतिहास ज्ञात आहे. मालोजीराजे निजामशाहीतील प्रमुख मनसबदारांपैकी एक होते. त्यांना शहाजी व शरीफजी ही मुले होती. शहाजी राजांचे लग्न तत्कालीन कालखंडातील मातब्बर सरदार लखुजी जाधवराव यांची कन्या जिजाबाई यांच्याशी झाले. भातवडीच्या लढाईत पराक्रम गाजविल्यामुळे शहाजीराजांचे नाव सर्वदूर झाले. शहाजीराजे व मातु:श्री जिजाबाई यांस संभाजीराजे व स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज अशी दोन पुत्ररत्ने झाली. संभाजीराजे लढाईत मारले गेले. निजामशाही, आदिलशाही, मुघल यांच्या संपर्कात आल्यावर शहाजीराजांना स्वतंत्र राज्य स्थापनेचे महत्त्व समजले होते. आजूबाजूची परिस्थिती, काळाचे दडपण, काही अन्य मर्यादा यांमुळे शहाजीराजांना स्वराज्य स्थापना करता आले नाही. त्यांचे स्वप्न पुत्र शिवाजींनी पूर्ण केले.

दिनांक १९ फेब्रुवारी, १६३० रोजी जुन्नरजवळील शिवनेरी किल्ल्यावर शिवाजींचा जन्म झाला. आदिलशहाने शहाजीराजांना पुणे व सुपे प्रांताची जहागिरी दिली होती. शहाजीराजे बंगळुरात राहत असल्याने जहागिरीची व्यवस्था पाहण्यासाठी मातोश्री जिजाऊसाहेब, दादोजी कोंडदेव, शिवाजीराजे पुण्याला आले. शहाजी राजांनी शिवाजींच्या शिक्षणाची, लष्करी प्रशिक्षणाची व प्रशासनाच्या अभ्यासाची उत्तम व्यवस्था केली होती. शिवाजीराजांनी जहागिरीची पुनर्व्यवस्था केली. शेतीला प्राधान्य दिले. नि:पक्षपाती न्यायव्यवस्था उभारली. मातोश्री जिजाऊसाहेबांनी आपल्या मुलाच्या मनात दुर्दम्य महत्त्वाकांक्षा निर्माण केली. पुण्याच्या पश्चिमेला असणार्‍या बारा खोर्‍यांचा म्हणजे पर्यायाने बारा मावळांचा त्यांनी बंदोबस्त केला. जहागिर ताब्यात असली तरी जहागिरीतील किल्ले विजापूरकरांच्या ताब्यात होते. त्यामुळे शिवाजी राजांनी जहागिरीतील किल्ल्यांची डागडुजी केली. वयाच्या १५ व्या वर्षीच शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. ‘साम-दाम-दंड-भेद’ यांचा वापर करून कोंढाणा व पुरंदर किल्ले ताब्यात घेतले. १६४७ नंतर राजांनी मुरुंबदेव उर्फ राजगड घेतला. शिवाजी महाराजांच्या हालचालींनी शंकित झालेल्या आदिलशहाने शहाजीराजांना कैद केले. शिवाजीराजांनी संभाव्य संकटाला तोंड देण्याची तयारी केली. आदिलशाहाने फत्तेखान या सरदाराला स्वराज्यावर चाल करून पाठविले. मराठ्यांनी फत्तेखानाचा पुरंदरच्या परिसरात समोरासमोरच्या लढाईत पराभव केला. बंगळूर, कंदर्पी, कोंढाणा या किल्ल्यांच्या बदल्यात आदिलशाहाने शहाजीराजांची सुटका केली. या घटनाक्रमांनंतर जहागिरीची व्यवस्था राखण्याकडे शिवजीराजांनी लक्ष दिले. रांझे गावच्या बावाजी भिकाजी गुजर याने बदअंमल केला म्हणून राजांनी त्याचे हातपाय तोडण्याची शिक्षा दिली. १६४६ च्या सुमारासच राजांची मुद्रा पत्रांवर उमटू लागली.

प्रतिपश्र्चंद्ररेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता। शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते। (अर्थ - शहाजीचा पुत्र जो शिवाजी, त्याची ही मुद्रा आहे. (शुद्ध पक्षातील) प्रतिपदेच्या चंद्रलेखेप्रमाणे (दिवसेंदिवस) वाढत जाणारी व विश्र्वातील सर्वांना मान्य होणारी ही मुद्रा, सर्वांच्या कल्याणासाठी शोभत आहे.)

आदिलशाही दरबारातील अशांत, अस्थिर वातावरणाचा फायदा घेऊन शिवाजींनी जावळीचे खोरे चंद्रराव मोर्‍याच्या ताब्यातून जिंकून घेतले व कोकणावरील प्रभुत्वाचा मार्ग खुला केला. प्रतापगड बांधवून घेतला. सुपे जिंकले, रोहिडा किल्ला जिंकला. त्यानंतर कल्याणचा खजिना लुटला. रायरीच्या डोंगरावर रायगड बांधवून घेतला. १६५७ च्या सुमारास शिवाजींनी कल्याण-भिवंडी जिंकले व तेथे जहाज बांधणीचे काम सुरू करून मराठ्यांच्या आरमाराचा श्रीगणेशा केला. उत्तर व दक्षिण कोकणावर प्रभुत्व मिळविण्याच्या दृष्टीने शिवाजींच्या हालचाली चालू असतानाच आदिलशाहाने अफझलखानाची नेमणूक शिवाजींविरुद्ध केली. अफझलखान हा त्या काळातील एक पाताळयंत्री, शक्तिमान, युद्धनिपुण सरदार होता. अफझलखानाने शिवाजींविरुद्ध आक‘मण करताना पंढरपूर, तुळजापूर या धार्मिक क्षेत्रांची हानी केली. शिवाजीराजे त्याला बधले नाहीत. युक्तीने त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलावून राजांनी दिनांक १० नोव्हेंबर, १६५९ रोजी त्याला ठार मारले. खानाच्या मृत्यूचा विलक्षण धक्का आदिलशहाला बसला, तर शिवाजीराजांचे नाव भारतभर पसरले. अदिलशहाचा दुसरा सरदार सिद्दी जौहर याने राजांस पन्हाळ्यात कोंडीत पकडले. राजांनी विशाळगडावर युक्तीने पलायन केले. राजांस विशाळगडावर सुखरूप पोहोचण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंडीत स्वत:च्या प्राणांचे बलिदान दिले.

शिवाजीराजे व मुघल -
शिवाजीराजे व मुघल संघर्षातील महत्त्वाची घटना म्हणजे शाहिस्तेखान प्रकरण. औरंगजेबाने आपला मामा शाहिस्तेखान यास शिवाजींविरुद्ध पाठविले. खानाने पुणे येथील लाल महालात मुक्काम केला. राजांनी जिवाची बाजी लावून, लाल महालात निवडक सैन्यानिशी प्रवेश करून खानावर हल्ला चढविला. त्याची बोटे कापली व अक्षरश: अंतर्धान पावले. शाहिस्तेखान - स्वारीत स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राजांनी औरंगजेबाची आर्थिक राजधानी असलेले सुरत शहर लुटले. तेथील परकीय व्यापार्‍यांना लुटले. एतद्देशियांचे धन लुटणार्‍या व्यापार्‍यांस जरब बसविली. याचा प्रतिशोध घेण्यासाठी औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग या अजेय सेनापतीस पाठविले. मिर्झा राजे व दिलेरखानाने मराठ्यांचा पराभव करून शिवाजींस शरण येण्यास भाग पाडले. मिर्झाने २३ किल्ले व ४ लाख उत्पन्नाचा प्रदेश घेऊन राजांस आगरा येथे औरंगजेबाच्या भेटीस पाठविले. आगरा येथे पोहोचल्यावर औरंगजेबाने राजांस नजरकैदेत टाकून ठार मारण्याचा बेत आखला. परंतु शिवाजीराजे पुत्र संभाजींसह सुटका करून घेण्यात यशस्वी ठरले. ही सुटका जागतिक इतिहासातील एक आश्चर्यजनक घटना मानली जाते. औरंगजेबाला विलक्षण धक्का बसला. स्वराज्यात परतताच राजांनी मुघलांना तहात दिलेले किल्ले परत जिंकून घेण्याचा सपाटा लावला. कोंढाणा किल्ला जिंकताना तानाजी मालुसरे यांस वीरमरण आले, परंतु किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. १६७० मध्ये राजांनी पुन्हा एकदा सुरतेवर स्वारी करून अमाप द्रव्य स्वराज्यात आणले.

यानंतर मध्ययुगाच्या इतिहासातील आणखी एक अभूतपूर्व घटना घडली. ती म्हणजे दिनांक ६ जून, १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. या सोहळ्यास काशीचे पंडित गागाभट्ट उपस्थित होते. यामुळे राजे छत्रपती झाले. या निमित्ताने त्यांनी अष्टप्रधान मंडळाची घोषणा केली. तांब्याचा पैसा ‘शिवराई’ आणि सोन्याचा ‘शिवराई होन’ अशी खास नाणी सुरू केली. ‘मराठा पातशहा एवढा छत्रपती झाला, ही गोष्ट काही सामान्य जाली नाही.’ या प्रसंगी रघुनाथपंडित आणि धुंडिराज लक्ष्मण व्यास यांनी राज्यव्यवहार कोश सिद्ध केला. भाषेतील फार्सी शब्दांच्या ऐवजी त्यांना पर्यायी शब्द देण्याची किंवा स्वभाषीय वळण देण्याची छत्रपती शिवाजी राजांची योजना मध्ययुगात नक्कीच अनुकरणीय होती. पंचांग सुधारणेसाठी कृष्णज्योतिषीकडून ‘करणकौस्तुभ’ हा नवा करणग्रंथ सिद्ध केला. राज्यारोहणाच्या घटकेपासून नवा ‘राजशक’ सुरू करण्यात आला.राज्याभिषेकाचा सोहळा पाहून तृप्त झालेल्या मातोश्री जिजाऊसाहेबांचे निधन राज्याभिषेकानंतर झाले. यानंतर महाराजांनी दक्षिण दिग्विजयाची स्वारी ‘दक्षिणची पादशाही आम्हा दक्षिणीयांचे हाती राहे’ यासाठी हाती घेतली. भागानगरला जाऊन कुत्बशहाची भेट घेतली व आपला राज्यविस्तार दक्षिणेत केला. दिनांक ३ एप्रिल, १६८० रोजी वयाच्या ५० व्या वर्षी महाराज स्वर्गवासी झाले.

आज आपला वाढदिवस"वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक आपलं यश,आपलं ज्ञान आणि आपलीकिर्ती वृद्धिंगत होत जावो..आणि सुख समृद्धीची बहार...
08/12/2016

आज आपला वाढदिवस"
वाढणा-या प्रत्येक दिवसा
गणिक आपलं यश,
आपलं ज्ञान आणि आपली
किर्ती वृद्धिंगत होत जावो..
आणि सुख समृद्धीची बहार
आपल्या आयुष्यात नित्य
येत राहो..
“आई तुळजा भवानी”
आपणास उदंड आयुष्य देवो,
ह्याच वाढ दिवसाच्या
अगणित शुभेच्छा !!
!! जय महाराष्ट्र !!

11/10/2016

विजयादशमी

आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून पाळला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र पाळले जाते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरा करण्यात येतो.

दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा
दसरा हा शब्द दश म्हणजे दहा यावरून आला असावा. त्याचा अर्थ दहावा दिवस असा आहे. नवरात्रात घटाच्या आजूबाजूला पेरलेले...

`दसरा' साजरा करण्यामागील शास्त्र व इतिहास


अ. कृषीविषयक लोकोत्सव

`दसरा' हा प्रारंभी एक कृषीविषयक लोकोत्सव होता. पावसाळयात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावेळी शेतकरी हा उत्सव साजरा करत. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या स्थंडिलावर नऊ धान्यांची पेरणी करतात व दसर्‍याच्या दिवशी त्या धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वहातात. कित्येक ठिकाणी शेतातल्या भाताच्या लोंब्या तोडून आणून त्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधतात. ही प्रथादेखील या सणाचे कृषीविषयक स्वरूपच व्यक्‍त करते. पुढे याच सणाला धार्मिक स्वरूप दिले गेले आणि इतिहासकाळात तो एक राजकीय स्वरूपाचा सण ठरला.

आ. विजयादशमी

रामाचा पूर्वज रघु या अयोध्याधिशाने विश्‍वजीत यज्ञ केला. सर्व संपत्तीचे दान केले. नंतर तो एका पर्णकुटीत राहिला. कौत्स तिथे आला. त्याला १४ कोटी सुवर्णमुद्रा हव्या असतात. रघु कुबेरावर आक्रमणाला सिद्ध होतो. कुबेर आपटा व शमी वृक्षांवर सुवर्णाचा वर्षाव करतो. कौत्स फक्‍त १४ कोटी सुवर्णमुद्रा घेतो. बाकीचे सुवर्ण प्रजाजन नेतात. - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित)

इ. श्रीराम व हनुमान तत्त्वे आणि क्षात्रवृत्ती जागृत करणारा दसरा

दसर्‍याच्या दिवशी ब्रह्मांडात श्रीरामतत्त्वाच्या तारक, तर हनुमानतत्त्वाच्या मारक लहरींचे एकत्रिकीकरण झालेले असते. दसरा या तिथीला जिवाचा क्षात्रभाव जागृत होतो. या क्षात्रभावातूनच जिवावर क्षात्रवृत्तीचा संस्कार होत असतो. . दसर्‍याला श्रीराम व हनुमान यांचे स्मरण केल्याने जिवात दास्यभक्‍ती निर्माण होऊन श्रीरामाचे आशीर्वादरूपी तत्त्व मिळण्यास मदत होते. दसर्‍याच्या दिवशी ब्रह्मांडात लाल (शक्‍तीरूपी) व तांबूस (दास्यभावातून निर्माण झालेल्या आशीर्वादरूपी लहरी) रंगांच्या स्प्रिंगसारख्या लहरी कार्यरत अवस्थेत असतात. या लहरींमुळे जिवाची आत्मशक्‍ती जागृत होण्यास मदत होऊन जिवाच्या नेतृत्वगुणामध्ये वाढ होते.

दस-याच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला भगवान रामचंद्राने रावणावर मात करण्यासाठी ह्याच
दिवशी प्रस्थान केले ह्याच दिवशी रघुराजाला घाबरुन कुबेराने शमी वृक्षावर सोन्याच्या मोहरांचा पाऊस पाडला
वनवास संपल्यावर पांडवांनी या वृक्षाच्या ढोलीत ठेवून दिलेली शस्त्रास्त्रे पुन्हा धारण केली यामुळे शूर लोक या
दिवशी आपल्या शस्त्रास्त्रांची पूजा करतात तर व्यावसायिक लोक आपापल्या कामाची हत्यारे यंत्रसामुग्री यांची पूजा करतात या
दिवशी संध्याकाळी गावाबाहेर सीमोल्लंघनास जातात तेथे शमीच्या व आपट्याच्या झाडांची पूजा
करुन सूवर्णमोहरांचे प्रतिक म्हणून शमीची पाने एकमेकांस दिली जातात.

श्रीरामाने याच दिवशी लंकाधिपती रावणाबरोबर युद्ध करण्यासाठी दक्षिणेस कूच केले. त्याला यशही मिळाले. त्याच्या विजयाबद्दल आनंदोत्सव म्हणूनही हा सण साजरा केला जातो. राजपूत सरदारही याच मुहूर्तावर लढाईवर निघत असत. मराठ्यांच्या स्वार्‍याही याच दिवसांपासून सुरू होत. पेशवे आपल्या आश्रित संस्थानिकास दसर्‍याच्या दिवशी दरबार भरवून मानाचा पोशाख देत. ब्रिटिश अधिकार्‍यांनीही काही काळ ही प्रथा सुरू ठेवली होती.

दसरा शेतकर्‍यांच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. कारण नवरात्रात नऊ दिवसात उगवलेली रोपे शेवटच्या दिवशी दसर्‍यास वाहतात. तसेच शेतकरीही शेतात तयार झालेल्या भाताच्या लोंब्या आणून त्याची पूजा करतात. प्रवेशद्वारावरही टांगतात. याशिवाय घरातील विविध भांड्यांना धान्याची कणसे बांधण्याची प्रथा कोकणात आहे. बंगालमध्येही अशाच प्रकारचा एक विधी होतो. तेथे स्त्रिया गवताची पेंढी धान्याच्या कोठारास बांधतात. त्याला बावन्न पोटी असे म्हणतात. म्हणजे हे धान्य बावन्न पट होऊ दे.

त्याचप्रमाणे भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे धान्याला व ते पिकवणार्‍या शेतकर्‍याला मोठा मान आहे. धान्य उदंड प्रमाणात यावे यासाठी ईश्वराला साकडे घालण्यात येत असे. या धान्याच्या रक्षणासाठी पूर्वीच्या काळी राजा व प्रजा झटत असे. कारण धान्य असले तर जगता येईल. अन्यथा नाही. हे त्यांना माहित होते. म्हणून धान्याला सोन्याची उपमा दिली जात असे. वर्षाकाल संपताच राजा प्रजाजनांबरोबर गावाच्या सीमेपर्यंत जाऊन नविन धान्य घरात आणत असे.

राष्ट्रपिता महात्मा गांधीजी च्या 147 व्या जयंती निमीत्त शहीद भगतसिंग मित्र मंडळ धुळे तर्फे सर्व भारतीय जनतेला हार्दिक शु...
02/10/2016

राष्ट्रपिता महात्मा गांधीजी च्या 147 व्या जयंती निमीत्त शहीद भगतसिंग मित्र मंडळ धुळे तर्फे सर्व भारतीय जनतेला हार्दिक शुभेच्या

दरवर्षीय प्रमाणे लोक् सहाभागच्या मदतिने शहीद भगतसिंग मित्र मडळाचा गणपती राजा निमित्त आयोजित भंडारच्या परिसरातील सर्व गणे...
10/09/2016

दरवर्षीय प्रमाणे लोक् सहाभागच्या मदतिने शहीद भगतसिंग मित्र मडळाचा गणपती राजा निमित्त आयोजित भंडारच्या परिसरातील सर्व गणेश भक्तानि लाभ घ्यावा....
|| भगतसिंग मित्र मंडळ धुळे ||

04/09/2016

श्री गणेशाला वक्रतुंड का म्हणतात ?

सर्वसाधारणत: वक्रतुंड म्हणजे वाकड्या तोंडाचा, सोंडेचा असा अर्थ समजला जातो; पण ते चूक आहे. ‘वक्रान् तुण्डयति इति वक्रतुण्ड: ।’ म्हणजे वक्रमार्गाने(वाईट मार्गाने)चालणारे व बोलणारे अशांना शिक्षा करून जो सरळ मार्गावर आणतो तो वक्रतुण्ड.’

आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नना बहर येऊ दे तुमच्या इच्छा तुमच्या आकांशा उंच उंच भरारी हेऊ दे ...
20/08/2016

आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नना बहर येऊ दे तुमच्या इच्छा तुमच्या आकांशा उंच उंच भरारी हेऊ दे मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभु दे वाढदिवसाच्या हार्दिक सुभेच्या..

रियो ओलिंपिक 2016 भारतीय महिला पहेलवान शाक्षी मलिक ने कांस्य पदक मिडवून भारताचा तिरंगा फड़कवाला बद्दल हार्दिक अभिनदंन .....
18/08/2016

रियो ओलिंपिक 2016 भारतीय महिला पहेलवान शाक्षी मलिक ने कांस्य पदक मिडवून भारताचा तिरंगा फड़कवाला बद्दल हार्दिक अभिनदंन ....
|| शहिद भगतसिंग मित्र मंडळ धुळे ||

07/08/2016

दिवा मातीचा आहे कि सोन्याचा आहे हे महत्वाचे नसून,
तो अंधारात किती प्रकाश देतो हे महत्वाचे आहे,
त्याच प्रमाणे मित्र श्रीमंत आहे कि गरीब आहे हे महत्वाचे नसून,
तो तुमच्या संकटात किती खंबीर पणे तुमच्या पाठीशी
उभा राहतो हे महत्वाचे आहे…

|| भगतसिंग मित्र मंडळ धुळे ||

Address

Shahid Bhagat Singh Colony Deopur
Akola
444001

Telephone

8551073267

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shahid bhagat singh colony deopur dhule posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share