Shrikant Dahe Official

Shrikant Dahe Official � जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा �

मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी लष्करी क्षेपणास्त्र आणि अणुशक्ती क्षेत्रात भारताला शक्तिशाली बनवलं. त्यांचा ...
27/07/2023

मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी लष्करी क्षेपणास्त्र आणि अणुशक्ती क्षेत्रात भारताला शक्तिशाली बनवलं. त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे, भारतीय विकासाच्या प्रयत्नांमध्ये मोलाचे योगदान देणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ, देशाचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

🚀

शक्तिशाली व्यक्तीमत्वांचा विचार मनात येताच सर्वप्रथम आपल्या डोळ्यांसमोर येतं चंद्रशेखर आझाद याचं व्यक्तिमत्व. चंद्रशेखर ...
23/07/2023

शक्तिशाली व्यक्तीमत्वांचा विचार मनात येताच सर्वप्रथम आपल्या डोळ्यांसमोर येतं चंद्रशेखर आझाद याचं व्यक्तिमत्व. चंद्रशेखर आझाद एक महान युवा क्रांतिकारी, ज्यांनी भारताच्या रक्षणाकरता व भारताला स्वतंत्र करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. आझाद आपल्या देशाचे वीर सुपुत्र होते, आपल्या पराक्रमाची आणि शौर्याची गाथा त्यांनी स्वतः लिहिली आहे. अशा महान क्रांतिकारकाला जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!!🌼🌸🌹

#चंद्रशेखर_आझाद
#क्रांतिकारक #स्वातंत्र्यसैनिक

आपल्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे आषाढी एकादशी! सर्व विठ्ठलभक्तांना आणि वारकरी बांधवांना...
29/06/2023

आपल्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे आषाढी एकादशी! सर्व विठ्ठलभक्तांना आणि वारकरी बांधवांना आषाढी एकादशीच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा...!!🌹🌼🌸

#वारकरी #आषाढीएकादशी #विठ्ठलरखुमाई
#पंढरपूर #पंढरीचीवारी

महाराष्ट्राला ज्या तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला, त्यापैकी एक म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज! लोकशाह...
26/06/2023

महाराष्ट्राला ज्या तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला, त्यापैकी एक म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज! लोकशाहीवादी व समाजसुधारक राज्यकर्ते अशी ओळख असलेल्या शाहू महाराजांनी आपल्या राजवटीत अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली. सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी प्रयत्न केले. दलित, अस्पृश्य व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळेच त्यांची जयंती 'सामाजिक न्याय दिन' म्हणून साजरी केली जाते. या थोर महापुरुषाला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व सर्वांना सामाजिक न्याय दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!!🙏🏻🌼🌸🚩
#छत्रपतीराजर्षीशाहूमहाराज
#सामाजिकन्यायदिन
#लोकराजा

आपल्या लोककल्याणकारी राज्यकारभाराच्या माध्यमातून, समानता, सामाजिक एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी आणि गोरगरिबांना न्याय म...
31/05/2023

आपल्या लोककल्याणकारी राज्यकारभाराच्या माध्यमातून, समानता, सामाजिक एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी आणि गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी जाणीवपूर्वक धोरणे राबविणाऱ्या थोर समाजसुधारक, कर्तृत्ववान राज्यकर्त्या आणि पराक्रमी योद्धा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!!🌼🌸🌹

#अहिल्यादेवी_होळकर

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ।।साहित्य, कला, इतिहास, निसर्ग, तत्त्वज्ञान अशा विविध बाबतीत संपन्न असलेला ...
01/05/2023

जय जय महाराष्ट्र माझा,
गर्जा महाराष्ट्र माझा ।।

साहित्य, कला, इतिहास, निसर्ग, तत्त्वज्ञान अशा विविध बाबतीत संपन्न असलेला आपला हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांपासून ते फुले-शाहु-आंबेडकर यांच्यासारख्या अनेक थोर विभूतींनी घडवला. या महाराष्ट्रभूमीचा मनापासून अभिमान वाटतो. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!🚩🚩🌼🌸🌹

#महाराष्ट्रदिन #कामगारदिन

साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय्य तृतीयेचा हा सण आपल्या आयुष्यात अक्षय्य सुख-समृद्धी, धनसंपदा व आनंद घेऊन येवो...
22/04/2023

साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय्य तृतीयेचा हा सण आपल्या आयुष्यात अक्षय्य सुख-समृद्धी, धनसंपदा व आनंद घेऊन येवो! सर्वांना अक्षय्य तृतीयेच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा...!!🌼🌹🌸🙏🏻
#अक्षय्यतृतीया

भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!! #महामानव_डॉ_...
14/04/2023

भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!!

#महामानव_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर

मर्यादापुरुषोत्तम प्रभु श्रीराम नवमी च्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा...!!जय श्रीराम ❤🌹🚩 #श्रीरामनवमी
30/03/2023

मर्यादापुरुषोत्तम प्रभु श्रीराम नवमी च्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा...!!
जय श्रीराम ❤🌹🚩
#श्रीरामनवमी

निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू |अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ||हिंदवी स्वराज्य संस्थापक, प्रजाहितदक्ष,बहुज...
19/02/2023

निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू |
अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ||

हिंदवी स्वराज्य संस्थापक, प्रजाहितदक्ष,बहुजनप्रतीपालक,लोककल्याणकारी राजे हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा...🚩🚩

तमाम शिवप्रेमींनी शिवजयंतीच्या भगव्या शुभेच्छा...!!

#शिवजयंती

महाशिवरात्रीच्या सर्व शिवभक्तांना मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा...!!🌹🙏🏻 #महाशिवरात्री
18/02/2023

महाशिवरात्रीच्या सर्व शिवभक्तांना मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा...!!🌹🙏🏻

#महाशिवरात्री

Address

Akola

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shrikant Dahe Official posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category