Umedbook Ahilyanagar

Umedbook Ahilyanagar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Umedbook Ahilyanagar, Government Organization, Ahmednagar.

A dedicated and sensitive organisation which creates an empowering environment for poor and vulnerable households of rural Maharashtra through sustainable livelihoods, leading to a life of prosperity, dignity and security.

05/09/2026
अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व तालुका व्यवस्थापकांचा पाथर्डी तालुक्यातील आगसखाड येथील ‘एक्सेल ॲग्रो’ शेळीपालन फार्मला अभ्या...
05/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व तालुका व्यवस्थापकांचा पाथर्डी तालुक्यातील आगसखाड येथील ‘एक्सेल ॲग्रो’ शेळीपालन फार्मला अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला. या भेटीदरम्यान आधुनिक शेळीपालन, व्यवस्थापन, उत्पादन व व्यवसायाच्या विविध पैलूंवर सविस्तर मार्गदर्शन मिळाले.

अत्यंत नियोजनबद्ध व आदर्श पद्धतीने उभारलेला हा फार्म ग्रामीण भागातील महिला शेतकऱ्यांसाठी शेळीपालन व्यवसायाची नवी दिशा आणि प्रेरणादायी मॉडेल ठरणार आहे. या अभ्यास दौऱ्यातून मिळालेले ज्ञान महिला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यास निश्चितच मोठी मदत होणार आहे.

ही प्रेरणादायी क्षेत्रभेट उपलब्ध करून दिल्याबद्दल एक्सेल ॲग्रो व्यवस्थापनाचे मनःपूर्वक आभार!

रेशीम शेतीतून रुई गावाची आर्थिक क्रांती!अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुका अभियान व्यवस्थापकांची रुई येथे प्रेरणादायी अभ्यास ...
05/09/2026

रेशीम शेतीतून रुई गावाची आर्थिक क्रांती!

अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुका अभियान व्यवस्थापकांची रुई येथे प्रेरणादायी अभ्यास भेट

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुई गावाने रेशीम शेतीच्या माध्यमातून शाश्वत विकासाचा आदर्श निर्माण केला आहे. शेतकऱ्यांचे संघटन, सामूहिक प्रयत्न आणि आधुनिक शेतीची सांगड घालत अनेक कुटुंबांना रेशीम शेतीतून कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देण्यात आला आहे.

गावचे सरपंच श्री. कालिदास नवले यांच्या नेतृत्वातून साकारलेली ही यशोगाथा अहिल्यानगर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरली.

ही उत्कृष्ट कार्यपद्धती प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. आनंद भंडारी सर यांचे मनःपूर्वक आभार.

पाणी फाऊंडेशन–उमेद अभियानाच्या कामकाजाचा आढावाअहिल्यानगर : पाणी फाऊंडेशन व उमेद अभियानाच्या माध्यमातून सुरू असलेल्या महि...
05/09/2026

पाणी फाऊंडेशन–उमेद अभियानाच्या कामकाजाचा आढावा

अहिल्यानगर : पाणी फाऊंडेशन व उमेद अभियानाच्या माध्यमातून सुरू असलेल्या महिला शेतकरी गटांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुका अभियान व्यवस्थापक व मेंटॉर यांची आढावा बैठक घेण्यात आली.

यावेळी मा. श्री. धनवंत माळी, राज्य समन्वयक, उमेद अभियान यांनी जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा घेत अहिल्यानगर जिल्ह्याच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले व संपूर्ण टीमचे कौतुक केले.

बैठकीस जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री. सोमनाथ जगताप, जिल्हा व्यवस्थापक श्री. तौसीफ सौदागर, श्री. बाबासाहेब सरोदे, श्री. अतुल चाटे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुका अभियान व्यवस्थापक, मेंटॉर व कर्मचारी उपस्थित होते.

21/08/2026
उडदावणे गावात महिलांच्या उपजीविकेला उमेदची नवी दिशाअकोले तालुक्यातील उडदावणे गावाला उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन...
07/07/2026

उडदावणे गावात महिलांच्या उपजीविकेला उमेदची नवी दिशा

अकोले तालुक्यातील उडदावणे गावाला उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने भेट देऊन महिला बचत गटांच्या उपजीविका व्यवसायांचा आढावा घेण्यात आला. यावेळी महिलांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या तसेच ग्रामसंघाच्या माध्यमातून विविध व्यवसायांसाठी कर्ज मंजुरीची कार्यवाही करण्यात आली.

उडदावणे गावाची 'मधाचे गाव' म्हणून निवड करण्यात आली असून जिल्हा उद्योग केंद्र (DIC) मार्फत २५ लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच याप्रमाणे एकूण १२५ मधपेट्यांचे वाटप करण्यात आले आहे. DIC मार्फत गावातील २५ पुरुष व १० महिलांना मध उत्पादन तसेच मधापासून काजळ, लिप बाम आणि मेणापासून साबण तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

महिलांशी झालेल्या चर्चेदरम्यान मध प्रक्रिया उद्योगापेक्षा लोणची, पापड, रानमेवा प्रक्रिया व विक्री, करवंद लोणचे निर्मिती, होम-स्टे, कॅम्पिंग, चहा-नाश्ता केंद्र, Honey Tea स्टॉल, शेळीपालन, कुक्कुटपालन आणि किराणा दुकान यांसारख्या व्यवसायांबाबत अधिक उत्सुकता असल्याचे समोर आले.

यापैकी शेळीपालन, कुक्कुटपालन व किराणा दुकानासाठी ग्रामसंघाच्या माध्यमातून कर्ज मंजूर करण्यात आले आहे. तसेच गावात पशुपालक संघाची स्थापना करण्यात आली असून ग्रामसंघाचे कार्यालय अधिक सक्षम व सुसज्ज करण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या.

यावेळी उमेद अभियानाचे सोमनाथ जगताप यांनी महिलांना उपलब्ध शासकीय योजनांचा लाभ घेऊन स्थानिक संसाधनांवर आधारित उद्योग उभारण्याचे आवाहन केले. अकोले तालुक्यातील कुंदन कोरडे व सोमनाथ गुंजाळ यांनीही उपस्थित राहून महिलांना विविध उपजीविका व्यवसाय, ग्रामसंघाच्या माध्यमातून उपलब्ध होणारे अर्थसाहाय्य तसेच उद्योग विकासाबाबत मार्गदर्शन केले.

स्थानिक संसाधनांवर आधारित उपजीविका व्यवसायांना चालना देऊन महिलांचे उत्पन्न वाढविणे व त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे हा उमेद अभियानाचा उद्देश असून, उडदावणे गावात त्यादृष्टीने सकारात्मक सुरुवात झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.

उमेद अभियानांतर्गत Buyer–Seller Meeting उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्नदि. ३० जून २०२६ | अहिल्यानगरउमेद – महाराष्ट्र राज्...
07/07/2026

उमेद अभियानांतर्गत Buyer–Seller Meeting उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न

दि. ३० जून २०२६ | अहिल्यानगर

उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या दर्जेदार उत्पादनांना शाश्वत व व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने Buyer–Seller Meeting चे यशस्वी आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमास मा. जिल्हाधिकारी पंकज आशिया तसेच मा. प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, मंजुषा ठवकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उमेद अभियानाच्या वतीने सोमनाथ जगताप यांच्यासह जिल्ह्यातील विविध सुपरमार्ट, मॉल, किरकोळ विक्रेते, घाऊक व्यापारी आणि प्रमुख उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीदरम्यान महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थ, हस्तकला, घरगुती उपयोगाच्या वस्तू आणि इतर गुणवत्तापूर्ण उत्पादनांचे सादरीकरण करण्यात आले. उपस्थित खरेदीदारांनी उत्पादनांची गुणवत्ता, पॅकेजिंग, सातत्यपूर्ण पुरवठा व्यवस्था आणि दीर्घकालीन व्यावसायिक सहकार्य याबाबत सकारात्मक चर्चा केली.

या बैठकीमुळे महिला बचत गटांना थेट बाजारपेठ, नियमित खरेदीदार आणि दीर्घकालीन व्यावसायिक संधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक व्यापाऱ्यांनी महिला बचत गटांकडून थेट खरेदी करण्याची तसेच त्यांच्या उत्पादनांना आपल्या विक्री केंद्रांमध्ये स्थान देण्याची तयारी दर्शविली.

विशेष म्हणजे, या उपक्रमामध्ये जिल्ह्यातील एकल महिलांनी देखील आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन केले. त्यांच्या उत्पादनांनाही संभाव्य खरेदीदार मिळाल्याने त्यांना स्वावलंबनाच्या दिशेने नवी संधी उपलब्ध झाली आहे. हा उपक्रम एकल महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

मा. जिल्हाधिकारी यांनी महिला बचत गटांनी उत्पादनांच्या गुणवत्तेसह आकर्षक पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि सातत्यपूर्ण पुरवठ्यावर भर द्यावा, असे मार्गदर्शन केले. तर मा. प्रकल्प संचालक यांनी उमेद अभियानाच्या माध्यमातून महिला उद्योजिकांना अधिकाधिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली.

Buyer–Seller Meeting च्या माध्यमातून महिला बचत गटांच्या उत्पादनांना जिल्हा तसेच राज्यस्तरीय बाजारपेठ मिळवून देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले असून, महिला उद्योजिकांच्या आर्थिक सक्षमीकरणाला निश्चितच नवी गती मिळणार आहे.

माननीय जिल्हाधिकारी श्री. पंकजा सर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय एकल महिला सक्षमीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक संपन...
06/07/2026

माननीय जिल्हाधिकारी श्री. पंकजा सर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय एकल महिला सक्षमीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

बैठकीमध्ये जिल्ह्यातील विविध शासकीय विभाग तसेच स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. जिल्ह्यातील एकल महिलांना शासकीय योजनांचा प्राधान्याने लाभ मिळावा, त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध विभागांनी समन्वयाने कोणती ठोस पावले उचलावीत, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

माननीय जिल्हाधिकारी यांनी सर्व विभागांना एकल महिलांची माहिती संकलित करून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा प्राधान्याने लाभ देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच येत्या एका महिन्यात प्रत्येक विभागाने केलेल्या कामाचा आढावा सादर करण्याचे निर्देशही दिले.

या बैठकीस प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सौ. मंजुषा ठाकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. संजय कदम, श्री. मोहन कांडेकर, CYDA संस्था, अहिल्यानगर, श्री. दिवाकर भोयर, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, अहिल्यानगर, श्रीमती सुप्रिया घोगरे, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (NULM), अहिल्यानगर, श्री. अनुशील मेढे, रक्षितम अ‍ॅग्रोनिक्स, अहिल्यानगर श्री. प्रकाश इथापे, साऊ एकल महिला पुनर्वसन समिती, अहिल्यानगर श्री. दीपक माने, महिला आर्थिक विकास महामंडळ (MAVIM), अहिल्यानगर श्री. खालील हवलदार उद्योग निरीक्षक, जिल्हा उद्योग केंद्र, अहिल्यानगर जिल्हा एकल महिला समितीचे सचिव श्री. सोमनाथ जगताप, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

एकल महिलांच्या सन्मानपूर्ण, स्वावलंबी आणि सक्षम जीवनासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून ठोस कृती आराखडा राबविण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

01/06/2026

Address

Ahmednagar

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Umedbook Ahilyanagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Umedbook Ahilyanagar:

Shortcuts

Share