22/04/2021
*डॉ. आरोळेंच्या निःस्पृह रुग्णसेवेला झेप फौंडेशनचा युक्रांदीय सलाम....✊🏽✊🏽✊🏽*
भाजीपाला आणि किराणा साहित्याची मदत सूपूर्द.
रॅमन मॅगसेसे पुरस्कारप्राप्त डॉ. रजनीकांत आरोळे यांनी सुरू केलेला जामखेड (अहमदनगर जिल्हा) येथील ग्रामीण आरोग्य प्रकल्प आज चर्चेत आहे. सध्या डॉ. आरोळे यांचा मुलगा डॉ. रवी आरोळे आणि मुलगी डॉ. शोभा आरोळे हे या आरोग्य प्रकल्पाचं काम बघतात. कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आरोळे दाम्पत्य कोरोना चाचणीपासून ते रुग्णांवरील उपचारापर्यंत स्वतः लक्ष घालून काम पाहत आहेत. सद्यस्थितीत 'आरोळे पॅटर्न' हा चर्चेचा विषय आहे. राज्यात रेमडिसिविर आणि इतर औषधांचा तुटवडा आहे. मात्र आरोळे दाम्पत्याने आहे त्या साधनांचा सुयोग्य वापर करून रुग्ण बरे केले आहेत. कुठल्याही रुग्णांच्यामागे रेमडीसीवीर औषध घेऊनच या असा तगादा लावला नाही. कोविड सेंटरमधून तब्बल साडेतीन हजारांहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
'युवक क्रांती दल' आणि 'झेप फाउंडेशन' यांच्यावतीने आज आरोळे रुग्णालयाला बटाटे, कांदे, कोबी, फ्लावर, चणाडाळ, तांदूळ, भेंडी, भोपळा, शेवगा, गवार असा आवश्यक भाजीपाला आणि धान्य देण्यात आले. यावेळी युक्रांदचे सहकार्यवाह अप्पा अनारसे, राशीन शहर अध्यक्ष विनोद सोनवणे, जामखेड मेडिकल असोसिएशनचे सचिन जाधव, प्रा. तुकाराम घोगरदरे, विनीत पंडित, विजय घोलप, अशोक नेमाने, अक्षय सोनवणे, विशाल रेडे, माऊली राळेभात, विवेक शिंदे उपस्थित होते. जामखेड नगरपरिषदेचे मुख्याअधिकारी मिनीनाथ दंडवते आणि डॉ. शोभा आरोळे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून कार्यकर्त्यांचे कौतुक केले. या कार्यासाठी दानशूर नागरिकांनी पुढे यावे असे आवाहन युवक क्रांती दलाने केले आहे.