Queer Nagar Ahmednagar

Queer Nagar Ahmednagar LGBTQ Support group for community people's rights.

मा. सुप्रीम कोर्टाने समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यास नकार दिला आहे. पण निकाल पूर्णपणे विरोधात दिला नाहीये. सम...
17/10/2023

मा. सुप्रीम कोर्टाने समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यास नकार दिला आहे. पण निकाल पूर्णपणे विरोधात दिला नाहीये. समलिंगी जोडपे मूल दत्तक घेऊ शकतात. Conversion थेरपी अर्थात लैंगिकता बदलण्याच्या थेरपीला परवानगी नाही असंही मा. कोर्टाने म्हणलं आहे. 5 पैकी समलिंगी विवाहाच्या बाजूने 2 तर विरोधात 3 न्यायाधीशांनी निर्णय सांगितला. 3:2 मुळे कोर्टाने मान्यता मिळाली नाही.

बरेच जण ह्याबद्दल हळहळ व्यक्त करतील. रडत बसतील. पण प्रश्न असा आहे की ह्याच रडणाऱ्यांपैकी किती जण खरंच समलिंगी विवाह केला असता जर कोर्टाने मान्यता दिली असती तर. फार कमी जण समलिंगी लग्न करणारे आहेत. कुठेतरी आपण स्वतः कमी तर नाही पडत आहोत ना? मा. कोर्टाच्या विरोधात आपण बोलू शकत नाही.

ह्या प्रश्नावर प्रत्येकाने विचार करायला हवा.

23/09/2023

आई, वडील आणि मुलगा यांच्यातील संवाद

आई : आम्ही तुझ्यासाठी एक मुलगी शोधली आहे. लवकरच तिच्याशी तुझं लग्न लावून देणार आहोत.
मुलगा : पण आई, मला लग्न करायचं नाहीये. मी कित्येक वेळा सांगितलं आहे की मला मुलींमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. मला मुलं आवडतात. तशीही का तुम्ही हा हट्ट करून बसला आहात?

वडील : हट्ट आम्ही करतोय की तू? काय मुलं आवडतात म्हणतो. कसले हे भिकार उद्योग. आपल्या घराण्याची इभ्रत वेशीला टांगायची आहे का तुला? लोक शेण घालतील आपल्या तोंडात. जरा तरी लाज बाळग.

मुलगा : आई, बाबा, कुठल्या जमान्यात वावरताय? काय घराण्याची इभ्रत? तुमच्या पुतण्याला मुलींची छेडछाड करण्याच्या आरोपात जेल झाली. तेव्हा काय घराण्याची इभ्रत वाढली होती का? लोकांनी काय हारतुरे घातले होते का तूमच्या गळ्यात? उद्या मी लग्न केलंच एखाद्या मुलीशी. पण जर मी तिला सुखी नाही ठेऊ शकलो, जर तिला पत्नीचा दर्जा नाही देऊ शकलो, तर मग तिच्या आयुष्याचं काय? मला कुठल्याही स्त्रीची फसवणूक नाही करायची आहे.

आई : अरे लग्न झाल्यावर होईल सगळं ठीक.

वडील : हो. एकदा तुझे लग्न झाले की हे तुझे भिकार चाळे बंद होतील.

मुलगा : ठीक आहे आई. पण आपल्याकडे बहिणीचं लग्न आधी करतात ना? तर तिचं लग्न आधी करूया. माझा एक गे मित्र आहे. चांगला शिकलेला आहे. चांगली नोकरी आहे पगार सुद्धा भरगच्च आहे. त्याच्याशी लग्न लावून देऊया.

वडील : (मुलाच्या एक थोबाडीत देऊन) लाज नाही वाटत तुला? आपल्या स्वतःच्या बहिणी बद्दल असं बोलताना? काय पाप केलं होतं जे तुझ्यासारखा नालायक मुलगा आमच्या पोटी जन्माला आला.

आई : (डोळ्यातून अश्रू काढत) आपल्या बहिणीच्या आयुष्याची राखरांगोळी करायचा विचार तुझ्या मनी कसा काय येऊ शकतो रे? एका गे मुलाशी तुझ्या बहिणीचं लग्न लावून द्यायला निघाला आहेस तू? तुम्हा दोघांना आम्ही लहानच मोठं केलं, खस्ता खाल्ल्या, तळहाताच्या फोडा प्रमाणे जपलं, ह्याची अशी परतफेड करणार आहेस तू?

मुलगा : का बरं? आता का? तुमची मुलगी ती पोटची मुलगी. जी सून म्हणून येणार ती कुणीच नसेल का? तिलाही तिच्या आईने 9 महिने पोटात वाढवलं असतं. तिच्याही आई वडिलांनी तिच्या सारही खस्ता खाल्ल्या असतात. त्यांनीही तिला तळहाताच्या फोडा प्रमाणे जपलेलं असतं. तिला लहानाचे मोठे केलेले असते. माझी बहिण तुमची पोटची मुलगी म्हणून तिच्या आयुष्याची चिंता. पण सून म्हणून येणारी दुसऱ्याच्या पोटची मुलगी म्हणून तिच्या आयुष्यच काहीच नाही? तिच्या भावनांना काहीच किंमत नाही?

आई : अरे पण तू जर लग्न नाही केलं तर लोक काय म्हणतील?

मुलगा : जर मी लग्न केलंच आणि जर तिला मी पत्नीचा दर्जा नाही देऊ शकलो, तर मग काय? आजकाल मुली शिकून आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या असतात. जर तिने कोर्टात केस केली आपल्या विरुद्ध तर मग आपले काय आणि कसे वाभाडे निघतील ह्याचा विचार करा. ज्या समाज आणि लोकांच्या भीती पोटी तुम्ही माझं लग्न लावून देताय, तोच समाज आणि लोक आपल्या तोंडात शेण घालतील. म्हणतील की जर नव्हता मुलींमध्ये इंटरेस्ट तर का केलं लग्न आणि का केली त्या मुलीच्या आयुष्याची नासाडी? हा विचार केलाय का तुम्ही कधी आई बाबा? मी काहीही झालं तरी एखाद्या स्त्रीची फसवणूक करणार नाही.

आई बाबा निरुत्तर.

10/09/2023

समलिंगी जीवन जगताना

मला माहिती आहे की, माझी ही पोस्ट बहुतेक जण न वाचता किंवा पहिल्या 2 ओळी वाचून दुर्लक्षित करतील. त्या ऐवजी जे सुंदर स्त्री पुरुषांचे उघडे नागडे फोटो किंवा एखादी कामुक कथा टाकली तर बरेच जण मोठ्या आवडीने बघतील वाचतील. कमेंट्सचा तर मुसळधार पाऊस पडेल. आपण अनेक जण समलिंगी आकर्षण असणारे आहोत. त्यात लेस्बियन, बायसेक्शुअल, गे, ट्रान्सजेंडर, आणि क्विअर (LGBTQ) असे घटक आहोत. काय आहे आपलं जीवन? आपण ते कसं जगतोय? बरेच जण ओपन नाहीत. लोकांसोबत असताना स्ट्रेट आणि जबाबदार म्हणून जीवन जगतो. पण जेव्हा एऑन समलिंगी जीवन जगतो, तेव्हा आपल्याला फक्त gr ब्लुड सारख्या app आणि टॉप बॉटम डेटिंग एवढंच का दिसतं? एक समलिंगी म्हणून ह्यापलीकडे काहीच नाहीये का? समलिंगी असणे म्हणजे फक्त शारिरीक भूक भागविणे इतकेच असते का? ह्यात काही समलिंगी म्हणून ओपन असलेले सुद्धा असू शकतात. नेमका हा अवेअरनेस बहुतांशी समलिंगी मध्ये नाहीये. डेटिंग करणं मुळीच चूक नाहीये. पण फक्त डेटिंग करणं किंवा 24/7 तोच विचार मनी असणं चूक आहे ना? आपल्याला भूक लागली की आपण जेवण करतो. पण 24/7 जेवण किंवा जेवायचाच विचार नाही ना करत? तसंच इथं आहे. आपल्या कम्युनिटी साठी न्याय मिळावा सोशल मान्यता (acceptance) मिळावं असं नाही का वाटत? समलिंगी म्हणून न लाजता, न घाबरता, निधड्या छातीने, अभिमानाने जगत यावं असं नाही का वाटत? वाटतंय ना मनातून? ही पोस्ट वाचताना हो तुलाच , तुझ्या मनात हा विचार येतोय ना की असं झालं तर किती बरं होईल? मनात डोकावून पाहिलं तर ह्याचं उत्तर नक्कीच मिळेल. जर उत्तर हो असेल तर आपल्याला डेटिंगच्या पलीकडे जाऊन विचार करायला हवा. डेटिंग करा , अवश्य करा. पण समलिंगी असणे म्हणजे फक्त डेट्स करत सुटणं असं नाहीये. अनेक तरुण मुलं मुली स्वतःच्या लैंगिकते बाबत खूप कन्फ्युज असतात. आपल्याला सगळे जण स्वीकारतील का? जर आपल्या घरच्यांना कळले तर काय होईल? ह्या भिती खाली अनेक जण जगत आहे. सर्वात आधी आपण जे काही आहोत, ते स्वतःला मनापासून, त्याचा पूर्णपणे स्वीकार करा. जर आपणच स्वतःला।स्वीकारलं नसेल तर जगाने आपल्याला स्वीकारावं ही अपेक्षा करणंच चुकीचं आहे ना? म्हणून स्वतःला आधी स्वीकारा. आपण जे काही आहोत ते आपल्याला देवाने, निसर्गाने घडवलं आहे. त्याचा अभिमान बाळगा. आपण लोकांचा विचार करू नका. जर लोक आपला विचार करत नसतील तर मग आपण लोकांचा विचार का करायचा बरं? लोक काही आपल्याला रोजचं 2 वेळचं जेवण आणून देणार नाहीत. ना शरीर झाकायला कपडे पुरवणार. आपल्याला स्वतःला कष्ट करून कमवावे लागत आहे. तर मग आत्ता जगाचा विचार करणं सोडून द्या. एक ना एक दिवस हे जग तुम्हाला नक्कीच स्वीकारेल. पण आधी सुरुवात स्वतःपासून तर करा.
आज आम्ही क्विअर नगर, अहमदनगर असो, की YUTAK, पुणे असो, की अजिं क्यू सातारा असो, दर महिन्याला क्विअर कट्टा मीटिंग किंवा Qmeets त्या-त्या शहरात आयोजित करत असतो. ह्या मीटिंग पूर्णपणे विनामूल्य असतात. मीटिंग मध्ये डेटिंग अजिबात चालत नाहीत. मिटिंगच्या बाहेर काहीही करा, that's none of part of our business. आपल्या सर्वांना आपल्या भावना समस्या मन मोकळं करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ तयार केलेलं आहे. जे आपण इतर कुठे व्यक्त करू शकत नाही. फक्त सोशल मीडियावर व्यक्त करून फायदा काही मिळत नाही. हे व्यासपीठ, फक्त एक व्यासपीठ नसून, आपला आवाज बुलंद करणे, आपल्या हक्कांसाठी लढा देणे ह्यासाठी आहे.
तर सहभागी व्हा ह्या लढ्यात, ह्या व्यासपीठावर आणि क्विअर कट्टा मीटिंग किंवा Qmeets मध्ये.

पुढची मीटिंग. ह्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राहुल कडूस आणि विनय, ICTC कौंसेलर, सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर हे उपस्थित असणार...
01/09/2023

पुढची मीटिंग. ह्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राहुल कडूस आणि विनय, ICTC कौंसेलर, सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर हे उपस्थित असणार आहेत. HIV आणि गुप्तरोग ह्यावर माहिती मिळेल. कृपया नगर जिल्ह्यातील सर्वांनी अवश्य उपस्थित रहावं. अशाच प्रकारच्या मीटिंग छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथेही सुरू करण्याचा उद्देश आहे. संभाजी नगर मधील आपल्या मित्रांना ह्याबद्दल माझ्याशी संपर्क करायला सांगा.

टीप-: कृपया डेटिंग साठी कुणीही संपर्क करू नये.

Nagar q***r katta trekking meet. We planned to visit Gorakshnath gad. But due to some problems we made changes in the pl...
14/08/2023

Nagar q***r katta trekking meet. We planned to visit Gorakshnath gad. But due to some problems we made changes in the plan. Then we gone Manjarsumbha fort. It was amazing me. Everyone enjoyed it so much.

चला नगरकर. यावेळी मीटिंग होईल ट्रेकींग मध्ये. गोरक्षनाथ गड वांबोरी, तालुका राहुरी. सर्वांनी सकाळी ठीक 9 वाजता वांबोरी ये...
06/08/2023

चला नगरकर. यावेळी मीटिंग होईल ट्रेकींग मध्ये. गोरक्षनाथ गड वांबोरी, तालुका राहुरी.
सर्वांनी सकाळी ठीक 9 वाजता वांबोरी येथे हजर रहावे.

अहमदनगरच्या माळीवाडा बस स्टँड वरून आणि राहुरीच्या बस स्टँड वरून वांबोरी साठी एसटी महामंडळाच्या बसेस उपलब्ध आहेत. सर्वांनी ठीक सकाळी 9 वाजेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.

तिसरी नगर क्विअर कट्टा मिटिंग रविवारी 10 जुलैला नगरच्या स्नेहालय संस्थेत पार पडली. यात स्नेहालय संस्थेचे दीपक यांनी संस्...
10/07/2023

तिसरी नगर क्विअर कट्टा मिटिंग रविवारी 10 जुलैला नगरच्या स्नेहालय संस्थेत पार पडली. यात स्नेहालय संस्थेचे दीपक यांनी संस्थेच्या अनेक उपक्रम विषयी माहिती दिली. पावसाच्या वातावरणात ओपन स्पेस मध्ये मिटिंग घेणे अवघड असते म्हणून स्नेहालय संस्थेचे अध्यक्ष श्री. डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी स्नेहालय मध्ये मिटिंग घेण्यास परवानगी दिली. क्विअर नगर तर्फे डॉ. गिरीश कुलकर्णी आणि Snehalaya संस्थेचे खूप खूप आभार. स्नेहालयचे असेच आम्हाला साथ मिळत राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो. त्याच सोबत स्नेहालय संस्थेच्या शाळेची जगातील 10 सर्वोत्तम शाळांमध्ये निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.

पावसाळ्यात नगर क्विअर कट्टा स्नेहालयच्या ऑफिस मध्ये घेण्यात येणार आहे. या वेळी मिटींगची थीम ब्लॅक अँड व्हाइट अशी आहे. शक...
04/07/2023

पावसाळ्यात नगर क्विअर कट्टा स्नेहालयच्या ऑफिस मध्ये घेण्यात येणार आहे. या वेळी मिटींगची थीम ब्लॅक अँड व्हाइट अशी आहे. शक्यतो सर्वांनी ब्लॅक अँड व्हाइट या किंवा यापैकी एक ड्रेसकोड मध्ये यावे. त्याच सोबत पावसाळ्यात आमची ही अडचण दूर केल्याबद्दल, डॉ.श्री गिरीश कुलकर्णी आणि Snehalaya संस्थेचे खूप खूप आभार.

क्विअर कट्टा मिटींगीची थीम ब्लॅक अँड व्हाइट. या थीम नुसार सर्वांनी शक्यतो  ब्लॅक अँड व्हाइट कपड्यांमध्ये मिटींगला यावे.
04/07/2023

क्विअर कट्टा मिटींगीची थीम ब्लॅक अँड व्हाइट. या थीम नुसार सर्वांनी शक्यतो ब्लॅक अँड व्हाइट कपड्यांमध्ये मिटींगला यावे.

पावसामुळे नेहमीचे ठिकाण बदलले आहे. नवीन ठिकाणाची नोंद करून घ्यावी.
01/07/2023

पावसामुळे नेहमीचे ठिकाण बदलले आहे. नवीन ठिकाणाची नोंद करून घ्यावी.

द्वितीय नगर क्विअर कट्टा मीटिंग सिद्धी बाग अहमदनगर येथे 18 जून रोजी पार पडली. नगरच्या LGBTQ साठी मार्गदर्शन करण्यास पुण्...
21/06/2023

द्वितीय नगर क्विअर कट्टा मीटिंग सिद्धी बाग अहमदनगर येथे 18 जून रोजी पार पडली. नगरच्या LGBTQ साठी मार्गदर्शन करण्यास पुण्याहून अनिल उकरंडे देखील उपस्थित होता. यावेळी सुद्धा नगर क्विअर कट्टाच्या मिटींगला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.नगर सारख्याछोट्या शहरात होणाऱ्या मिटींगला आजूबाजूच्या तालुक्यातील ग्रामीण भागातील तरुण सहभागी होत आहेत. अनिलचे स्वागत क्विअर नगरने पुष्पगुच्छ न देता एक रोपटे देऊन केला. क्विअर नगर या द्वारे वृक्षारोपणाचा संदेश देखील देत आहे.

नाशिकच्या पहिल्या प्राईडला सपोर्ट करताना क्विअर नगर
16/06/2023

नाशिकच्या पहिल्या प्राईडला सपोर्ट करताना क्विअर नगर

Address

Ahmednagar
414001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Queer Nagar Ahmednagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category