AMC NAGAR

Call Directions Website Contact the organization

AMC NAGAR Ahilyanagar is one of the historical cities of India with a glorious past, an innovative present and a promising future.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केडगाव देवी परिसराची महापौर, आयुक्तांकडून पाहणीस्वच्छता, पाणी, विद्युत व्यवस्था, रस्ते, ...
06/10/2026

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केडगाव देवी परिसराची महापौर, आयुक्तांकडून पाहणी

स्वच्छता, पाणी, विद्युत व्यवस्था, रस्ते, मोकाट कुत्रे, जनावरे व अतिक्रमणांबाबत तातडीच्या उपाययोजनांच्या सूचना

भाविकांनी कायनेटिक चौक-मोहिनीनगर रेल्वे भुयारी मार्गाचा वापर करावा - महापौर ज्योतीताई गाडे

अहिल्यानगर : नवरात्रोत्सवाचा सण जवळ आला असून, केडगाव देवी मंदिर परिसरात दर्शनासाठी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महापौर ज्योतीताई गाडे व मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी केडगाव देवी परिसराची पाहणी केली. यावेळी स्वच्छता, पाणी, विद्युत व्यवस्था, रस्त्यांचे पॅचिंग, मोकाट कुत्रे, जनावरे, अतिक्रमणे आदी विविध बाबींचा आढावा घेऊन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर, नगरसेविका कमल कोतकर, नगरसेविका अश्विनी लोंढे यांच्यासह इंजिनिअर महादेव काकडे, श्रीकांत निंबाळकर, आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर, उद्यान प्रमुख शशिकांत नजन, विद्युत विभाग प्रमुख शांताराम क्षेत्रे आदी उपस्थित होते.
महापौर ज्योतीताई गाडे म्हणाल्या की, केडगाव देवी हे भाविकांचे श्रद्धास्थान असून नवरात्रोत्सवात जिल्हाभरातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. या काळात भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध सुविधा व उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने आज परिसराची पाहणी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.

माध्यमांच्या दृष्टिक्षेपातून… 👀          📰
06/10/2026

माध्यमांच्या दृष्टिक्षेपातून… 👀

📰

05/10/2026

“वेळेत काम, दर्जेदार रस्ता… विकासाचा विश्वास पक्का!” 🛣️✨

शहरातील मुख्य बाजारपेठेतील महत्त्वाचा रस्ता वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल अहिल्यानगर महानगरपालिकेचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐

विकासकामांमध्ये वेग, गुणवत्ता आणि नागरिकांच्या सोयीला प्राधान्य देत पूर्ण झालेल्या या कामामुळे बाजारपेठेतील वाहतूक अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.

“दर्जेदार कामाची गती, नागरिकांच्या विश्वासाची प्रगती!”

🧹 स्वच्छतेसाठी हात पुढे स्वच्छ अहिल्यानगरसाठी संकल्प दृढ!“झाडूच्या पलीकडेही स्वच्छतेची जबाबदारी…हातांनी उचलला कचरा, शहर ...
05/10/2026

🧹 स्वच्छतेसाठी हात पुढे स्वच्छ अहिल्यानगरसाठी संकल्प दृढ!

“झाडूच्या पलीकडेही स्वच्छतेची जबाबदारी…
हातांनी उचलला कचरा, शहर स्वच्छ ठेवण्याचा निर्धार!”

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शहरातील विविध भागांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. रस्ते, चौक व सार्वजनिक ठिकाणी झाडूने सहज न उचलता येणारे प्लास्टिकचे तुकडे, कागद, पिशव्या तसेच इतर सूक्ष्म कचरा स्वच्छता कर्मचारी स्वतः हाताने गोळा करून कचरा संकलित करीत आहेत.

गोळा केलेला कचरा योग्य पद्धतीने संकलित करून त्याची पुढील विल्हेवाट लावण्यासाठी कर्मचारी तत्पर आहेत.

स्वच्छता ही केवळ मोहीम नाही,
ती शहराप्रती आपली जबाबदारी आहे!

05/10/2026

नगर– ‘पाणी कधी मिळणार?’ या प्रश्नाला अखेर उत्तर! प्रभाग १७ मधील जिजाऊ वसाहतीत नवीन पाईपलाईनचे काम सुरू; नगरसेवक मयूर बांगरे यांच्या पाठपुराव्याला यश

🐾🌿 जागतिक प्राणी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌿🐾अहिल्यानगर व परिसरातील समृद्ध प्राणी संपदा, वन्यजीव आणि जैवविविधतेचे संवर्...
04/10/2026

🐾🌿 जागतिक प्राणी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌿🐾

अहिल्यानगर व परिसरातील समृद्ध प्राणी संपदा, वन्यजीव आणि जैवविविधतेचे संवर्धन व संरक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्यांच्या अधिवासाचे जतन करून मानव आणि प्राणी यांच्यातील सहअस्तित्व अधिक दृढ करूया.

🌍❤️ “वसुंधरेचे सौंदर्य साकार,
प्राणी हेच सृष्टीचा आधार!”

प्राणी वाचवा… निसर्ग वाचवा… भविष्य जपवा! 🐾🌱

#जागतिकप्राणीदिन #अहिल्यानगर #अहिल्यानगरमहानगरपालिका #प्राणीसंपदा #जैवविविधता

04/10/2026

Address

Near Pawan Ganapati Mandir Nagar/Sambhajinagar Road
Ahmednagar
414001

Telephone

+919158124365

Alerts

Be the first to know and let us send you an email when AMC NAGAR posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to AMC NAGAR:

Shortcuts

Share