13/09/2026
‼️ भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामी जयंती‼️ ============================
आज दिनांक १३/०९/२०२६ ला सकाळी ११=०० वाजता ग्राम पंचायत कार्यालय सावळापूर मध्ये भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या ८०६ वा अवतार दिन निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार वाहुन त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
बाराव्या शतकातील सामाजिक राजकीय व्यवस्था, अंधश्रद्धा व कर्मकांडांनी ग्रासलेल्या समाजाला श्री चक्रधर स्वामी यांनी भक्ती, मानवता आणि समतेचा मार्ग दाखविला.त्यांनी जातीभेद व वर्णभेद नाकारून सामाजिक दायित्वाची शिकवण दिली. अहिंसा,करुणा,क्षमा,शांती, जीवनदया आणि प्रेम या मूल्यांचा संदेश त्यांनी समाजाला दिला.
तसेच, स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने सर्व अधिकार असावेत अशी भूमिका मांडली,स्त्रियांना ही शिक्षणाचा अधिकार असावा, प्रतिष्ठेने जगण्याचा व आपले विचार मांडण्याचा अधिकार असावा विचार मांडून श्री चक्रधर स्वामींनी समाजाला दिशा दिली.
श्री सर्वज्ञ चक्रधर स्वामी अवतार दिन मोठ्या उत्साहात ग्राम पंचायत मध्ये साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला उपस्थित, श्री.अमोल ना.राऊत ,श्री.श्रेयस दि.फाटे,सामाजिक कार्यकर्ते ग्राम पंचायत कर्मचारी वर्ग, रोजगार सेवक, गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.