Grampanchayat Modale , taluka- Igatpuri , District- Nashik

Grampanchayat Modale , taluka- Igatpuri , District- Nashik "आदर्श गाव मोडाळे "
# माझी वसुंधरा अभियान 4.0
सण 2023-2024 ग्रामपंचायत मोडाळे

🌸 *क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना* 🌸मुलांसाठी एक आशेचा किरण!जगातल्या प्रत्येक बालकाला प्रेम, सुरक्षा आणि...
14/10/2025

🌸 *क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना* 🌸

मुलांसाठी एक आशेचा किरण!
जगातल्या प्रत्येक बालकाला प्रेम, सुरक्षा आणि संधी मिळायला हवी. ही योजना त्या सर्व मुलांसाठी आहे जी जीवनाच्या सुरुवातीला कठीण परिस्थितीत आहेत:

*एकल पालकांची मुले (आई किंवा वडील पैकी एखादा मृत पावला असेल)*

*कॅन्सर किंवा HIV बाधित पालकांची मुले*

*तुरुंगात असलेल्या कैदी पालकांची मुले*

💰 एक एप्रिलपासून मुलांना २,२५० रुपये मदत मिळेल.
आपल्या आजूबाजूच्या विधवा महिला व अनाथ बालकांना हे सहकार्य देणे हे आपल्या समाजाचे कर्तव्य आहे. चला, एकत्र येऊन त्यांच्या जीवनात प्रकाश आणूया! ✨

आवश्यक कागदपत्रे:
1️⃣ अर्ज फॉर्म
2️⃣ जन्म दाखला (आई/वडील/बालक)
3️⃣ पालक कोविड-१९ पॉझिटीव्ह असल्यास अहवाल
4️⃣ शाळेतील प्रमाणपत्र (बालकाचे)
5️⃣ मार्कशीट / चालू शाळेतील दाखला
6️⃣ पालक व बालकाचे पासपोर्ट साइज फोटो
7️⃣ बालकाचे पासपोर्ट साइज फोटो
8️⃣ आधारकार्ड (आई, वडील, बालक) ( वय वर्ष 18 च्या आतील बालक)
9️⃣ बँकेचे पासबुक (स्वतः / बालक / जॉइंट अकाउंट) — बालकाचे खाते DBT लिंक असणे अनिवार्य
🔟 उत्पन्नाचा दाखला (पालक/आई/वडील)
1️⃣1️⃣ रेशनकार्ड
1️⃣2️⃣ रहिवासी दाखला (बालक आणि पालक)

📍 अधिक माहिती व आपल्या इगतपुरी तालुक्यातील गावात कॅम्पच्या नियोजनासाठी संपर्क-

*राहुल राधाकिसन बोंबले*-
*7719806933*

*सामाजिक न्याय विभाग, बार्टी*
*ता. इगतपुरी*

*जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय*
*समाज कल्याण विभाग, नाशिक-पुणे रोड, नाशिक*

✨ *मुलांच्या उज्ज्वल भविष्याची आपण सर्वांनी साथ द्यायला हवी. चला, एकत्र येऊन त्यांच्या आयुष्यात बदल घडवूया*! ✨

।।गणपती बप्पा मोरया।।।।मंगलमूर्ती मोरया।।हा गणेशोत्सव पर्यावरणपुरक साजरा करूया…!सर्वांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक श...
27/08/2025

।।गणपती बप्पा मोरया।।
।।मंगलमूर्ती मोरया।।

हा गणेशोत्सव पर्यावरणपुरक साजरा करूया…!
सर्वांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

*"समृद्ध ग्रामपंचायत अभियान राज्यस्तरीय कार्यशाळेत नाशिक जिल्ह्याचा सर्वांगीण गौरव"* *मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत पंच...
27/08/2025

*"समृद्ध ग्रामपंचायत अभियान राज्यस्तरीय कार्यशाळेत नाशिक जिल्ह्याचा सर्वांगीण गौरव"* *मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत पंचायत राज अभियानांतर्गत राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन दि. 26 ऑगस्ट 2025 रोजी पुणे येथे भव्यदिव्य करण्यात आले. या कार्यशाळेला ग्रामविकास मंत्री आदरणीय श्री. जयकुमारजी गोरे, प्रधान सचिव मा. श्री. एकनाथजी डवले, यशदा उपमहासंचालक श्री. मल्लिनाथ कलशेट्टी, तसेच आदर्श गाव समितीचे प्रेरणादायी नेतृत्व करणारे श्री. पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.*

*नाशिक जिल्हा परिषद – राज्यात प्रथम क्रमांक*
*जिल्हा परिषद नाशिकने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये प्रथम क्रमांक पटकावून इतिहास रचला.*

*"ग्रामपंचायत मोडाळे, ता. इगतपुरी राज्यात सहावा क्रमांक मोडाळे ग्रामपंचायत ने पटकावला. सरपंच सौ. शिल्पा किसन आहेर व ग्रामपंचायत अधिकारी श्री. हनुमान दराडे यांनी पुरस्कार स्वीकारला.*

💐 *अभिनंदन व शुभेच्छा!*🙏
*💫 आदर्श ग्रामपंचायत मोडाळे चे सरपंच ,उपसरपंच , ग्रामसेवक,ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थांचे खूप खूप अभिनंदन..*🌹🌹🌹🌹

पंचायत विकास निर्देशांकात राज्यात ग्रामपंचायत मोडाळे 6 वा क्रमांक 💐💐
21/08/2025

पंचायत विकास निर्देशांकात राज्यात ग्रामपंचायत मोडाळे 6 वा क्रमांक 💐💐

प्लास्टिकला नकार, हरित वसुंधरेचा आधार..!प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळूयाआणि अधिकाधिक कापडी पिशव्या वापरूयात.चला, एकत्र य...
05/07/2025

प्लास्टिकला नकार, हरित वसुंधरेचा आधार..!

प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळूया
आणि अधिकाधिक कापडी पिशव्या वापरूयात.
चला, एकत्र येऊन आपली वसुंधरा स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त बनवूया..!
माझी वसुंधरा अभियान 6.0


.0

पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्या दरम्यान झाडांची छाटणी करुयात, होणारे धोके टाळूयात आणि स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी परिसर निर...
01/07/2025

पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्या दरम्यान झाडांची छाटणी करुयात, होणारे धोके टाळूयात आणि स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी परिसर निर्माण करुया.

Address

Chittagong Division

Telephone

+918788988633

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Grampanchayat Modale , taluka- Igatpuri , District- Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Grampanchayat Modale , taluka- Igatpuri , District- Nashik:

Share