10/06/2021
ग्रंथ तुमच्या दारी- सिडनी
आजपर्यंतचा प्रवास.. Granth Tumchya Dari Kusumagraj Prathishtan
इतक्या मोठया उपक्रमात काम करून तमाम सिडनी मधल्या वाचकांच्या आवडीचे ग्रंथ त्यांच्या पर्यंत पोहचवण्याची संधी दिल्याबद्दल
श्री विनायक रानडे यांचे खूप आभार....जगभरातील मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या वाचकांना ग्रंथसंपदा उपलब्ध करून देण्यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांची *ग्रंथ तुमच्या दारी* ही वाचकप्रिय योजना गेली 13 वर्ष विस्तारत आहे
*ग्रंथ तुमच्या दारी*
मराठी वाचक जेथे ,
ग्रंथ तुमच्या दारी तेथे .
ग्रंथ तुमच्या दारी ची विक्रमी घोडदौड . . .
*2 कोटी 25 लाख रुपयांची ग्रंथ संपदा*
महाराष्ट्र , गोवा , गुजराथ , दिल्ली , सिल्व्हास, तामिळनाडू , कर्नाटक तसेच
*भारताबाहेर*
दुबई , नेदरलँड , टोकियो , अटलांटा , स्वित्झरलॅन्ड , ऑस्ट्रेलिया , फिनलँड , वॉशिंग्टन DC , मॉरिशस , ओमान , मस्कत , सॅनफ्रान्सिस्को , बे एरिया , सिंगापूर , लंडन , श्रीलंका . . . .
वाचन संस्कृतीच्या समृद्धीसाठी प्रत्येकाने त्याच्या वाढदिवसानिमित्त पुस्तक खरेदीसाठी
कुसुमाग्रज प्रतिष्ठानला यथा योग्य देणगी द्यावी या आवाहनाला उस्फुर्त तसेच उदंड प्रतिसाद मिळाला .
ग्रंथ तुमच्या दारी योजनेतील सहभागी सर्व वाचक , समन्वयक , संस्था , देणगीदार , हितचिंतक यांच्या सक्रिय सहभागानेच हा विस्तार होत आहे , सर्वांचे आभार
*विनायक रानडे* ,
कुसुमाग्रज प्रतिष्ठान ,
नाशिक , महाराष्ट्र , भारत .
Please contact -
*Vinayak Ranade*
Mob - +91 99 22 22 5777
Only What'sup - + 91 9423972394
Email - [email protected]
Facebook - https://www.facebook.com/vinayak.ranade.7
Blog - http://granthtumchyadari.blogspot.in/
वाढदिवस , एकसष्ठी , पंच्याहत्तरी , सहस्त्र चंद्र दर्शन तसेच दिवंगत आप्तेष्टांच्या स्मरणार्थ
अशा अनेक प्रसंगानुरूप मिळालेल्या भारतात ८० जी अंतर्गत आयकरात सूट असलेल्या देणग्यांमुळे
असंख्य मराठी वाचकांना त्यांच्या निवासी भागात , कार्यालयात , दवाखान्यात अशा त्यांच्या जवळपासच्या भागात वाचनासाठी विनामोबदला विनासायास उपलब्ध होत आहेत . जगभरात आज मराठी माणूस नाही अशी भूमी नाही म्हणजेच ग्रंथ तुमच्या दारी योजनेच्या भरारीला आता आकाशाला गवसणी घालण्यास कोणतीच बंधने नाहीत, जिथे म्हणून मराठी शब्द ,मराठी भाषा आहे ,मराठी माणूस आहे तिथे तिथे आमची योजना जावी अशी आमची इछा आहे.
*विनायक रानडे*
ग्रंथ तुमच्या दारी
कुसुमाग्रज प्रतिष्ठान
Mobile +919922225777
Only Whatsapp +919423972394