26/03/2026
🌿 ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्यातील एक शांत रक्षक…
कॅमेरा ट्रॅपमध्ये अनेकदा दिसणारा खवले मांजर (Pangolin) हा जंगलासाठी अत्यंत महत्त्वाचा प्राणी आहे 🐾
वर्षभरात कोट्यवधी मुंग्या आणि वाळवी खाऊन तो जंगलाचा समतोल राखतो.
त्याच्या अंगावरील मजबूत खवले त्याला संरक्षण देतात आणि धोक्याच्या वेळी तो स्वतःला गोल करून घेतो.
आनंदाची बाब म्हणजे, आपल्या अभयारण्यात खवले मांजरांची संख्या चांगली आहे 🌿
✨ जंगल वाचवायचं असेल, तर या शांत रक्षकाला जपणं तितकंच गरजेचं आहे.
🐾 खवले मांजर — जंगलाचा खरा ‘Guardian’!