आशाताईं ज्ञानेश्वर मोरमारे

  • Home
  • India
  • Pune
  • आशाताईं ज्ञानेश्वर मोरमारे

आशाताईं ज्ञानेश्वर मोरमारे पंचायत समिती सदस्या
मा.सरपंच उकसान, तालुका मावळ⏰🚨
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी⏰
सौ.आशाताई ज्ञानेश्वर मोरमारे 🙏🏻

14/07/2026

पंचायत समिती, वडगाव मावळ मागील तीन महिन्यांपासून मावळ पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी (BDO) नियमितपणे कार्यरत नसल्यामुळे तालुक्यातील अनेक विकासकामे, प्रशासकीय प्रस्ताव तसेच नागरिकांची महत्त्वाची कामे रखडली आहेत. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मावळ तालुक्यातील सर्व पुणे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांनी पंचायत समिती कार्यालयात तीव्र आंदोलन करत BDO कार्यालयाला प्रतीकात्मक टाळे ठोकले

17/06/2026

”‘मी तुम्हा सर्वांना माझ्या कुटुंबाप्रमाणे मानते’ हे उपमुख्यमंत्री मा. सुनेत्राताई अजितदादा पवार यांचे शब्द केवळ वाक्य नसून जनतेप्रती असलेल्या त्यांच्या प्रेमाची आणि आपुलकीची भावना आहे. मावळकरांना कुटुंबाचा मान देणाऱ्या ताईंचे मनःपूर्वक आभार!” 🌸🙏

👑

सांगिसे📍 सांगिसे गावामध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्यात शिक्षणावि...
16/06/2026

सांगिसे📍
सांगिसे गावामध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्यात शिक्षणाविषयी आवड निर्माण करण्यासाठी शाळेस भेट दिली. विद्यार्थ्यांच्या उत्साहात सहभागी होत त्यांना नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा व प्रेरणा दिली. तसेच इयत्ता दहावीमध्ये उत्कृष्ट गुण संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.” 📚🏆🌸

मावळ📍“१५ जून… नवीन शैक्षणिक वर्षाची आनंददायी सुरुवात! चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य आणि उत्साह पाहून मन आनंदान...
16/06/2026

मावळ📍
“१५ जून… नवीन शैक्षणिक वर्षाची आनंददायी सुरुवात! चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य आणि उत्साह पाहून मन आनंदाने भरून आले. ज्ञानाच्या या प्रवासात प्रत्येक विद्यार्थ्याचे भविष्य उज्ज्वल होवो, हीच सदिच्छा!” 📚✨

📍 मावळ‘शाळा प्रवेशोत्सव २०२६-२७’ च्या शुभमुहूर्तावर उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी मावळ तालुक्यातील...
15/06/2026

📍 मावळ

‘शाळा प्रवेशोत्सव २०२६-२७’ च्या शुभमुहूर्तावर उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी मावळ तालुक्यातील ‘पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कान्हे’ येथे सदिच्छा भेट दिली. पहिल्याच दिवशी शाळेत पाऊल ठेवणाऱ्या चिमुकल्यांचे स्वागत करण्यासाठी आयोजित या विशेष सोहळ्याला शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी सुनेत्रावहिनी व उपस्थितांनी विद्यार्थ्यांशी अत्यंत मनमोकळा संवाद साधला, ज्यामुळे उपस्थित सर्वांच्या शालेय जीवनातील जुन्या आणि गोड आठवणींना उजाळा मिळाला.

भावी पिढी घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना आधुनिक आणि दर्जेदार शिक्षण देण्याबरोबरच प्रत्येक शाळेत आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे ही शासन स्तरावरील एक मुख्य नैतिक जबाबदारी आहे. याच अनुषंगाने आजच्या या मुख्य कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील ३०३ केंद्रप्रमुखांना दिल्या जाणाऱ्या टॅबपैकी प्रातिनिधिक स्वरूपात ४ केंद्रप्रमुखांना मान्यवरांच्या हस्ते टॅब प्रदान करण्यात आले.

आजचे युग हे स्पर्धा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे (AI) असल्याने, शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील विद्यार्थीही कुठेही मागे पडू नयेत यासाठी शासन डिजिटल क्लासरूम व दर्जेदार पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. तसेच अभ्यासासोबतच खेळांनाही प्रोत्साहन देण्यासाठी तालुक्यात उत्तम क्रीडांगणे आणि सुविधा उभारल्या जात असून, शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना दर्जेदार ज्ञान देण्याचे आवाहन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे याच शाळेतील गुणवंत विद्यार्थिनी कु. रुद्रा गणेश राजगुरे हिने चाचणी परीक्षेत घवघवीत यश संपादन करून थेट ‘नासा’ (NASA) सारख्या जागतिक संस्थेला भेट दिली. मावळ तालुक्याचा गौरव वाढवणाऱ्या रुद्राचा यावेळी सुनेत्रावहिनींच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला व तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

🗓️ सोमवार,  ८ जून २०२६📍 करंजगाव (मावळ) नाशिकचे जिल्हाधिकारी साहेबांनी भेट दिली व सर्व गावाची पाहणी केली असता त्यांना गाव...
08/06/2026

🗓️ सोमवार, ८ जून २०२६
📍 करंजगाव (मावळ)
नाशिकचे जिल्हाधिकारी साहेबांनी भेट दिली व सर्व गावाची पाहणी केली असता त्यांना गाव छान वाटले आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी झाल्याबद्दल अभिनंदन केले💐.

“समृद्ध मावळच्या पायाभरणीचा मार्ग, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे विकासाचा मार्ग!”⏰
05/06/2026

“समृद्ध मावळच्या पायाभरणीचा मार्ग,
राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे विकासाचा मार्ग!”⏰

नविन उकसान येथे गावभेट दौरा धिला व ग्रामस्थांच्या आडचणींवर उपाय शोधू आश्वासन देण्यात आले..🙏🏻🙏🏻   ⏰
04/06/2026

नविन उकसान येथे गावभेट दौरा धिला व ग्रामस्थांच्या आडचणींवर उपाय शोधू आश्वासन देण्यात आले..🙏🏻🙏🏻

🗓️ रविवार, १९ एप्रिल २०२६📍करंजगावमावळचे कार्यसम्राट आमदार श्री.सुनिल(आण्णा) शेळके यांच्या माध्यमातून करंजगाव येथे अंतर्ग...
19/04/2026

🗓️ रविवार, १९ एप्रिल २०२६
📍करंजगाव
मावळचे कार्यसम्राट आमदार श्री.सुनिल(आण्णा) शेळके यांच्या माध्यमातून करंजगाव येथे अंतर्गत रस्ते काँक्रीट करण्यासाठी २० लक्ष रुपये निधी उपलब्ध झाला. भूमिपूजन समारंभास जि.परिषद सदस्य श्री.अनंताभाऊ पावशे , पंचायत समिती सदस्या सौ.आशाताई ज्ञानेश्वर मोरमारे, पंचायत समिती सदस्या सौ.प्राचीताई देवाभाऊ गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीती मध्ये करण्यात आला.
यावेळी गावातील आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य त्याप्रमाणे प्रतिष्ठित नागरिक,युवा सहकारी उपस्थित होते.

Address

Maval
Pune
410506

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आशाताईं ज्ञानेश्वर मोरमारे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share