Yuva Umed

Yuva Umed Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Yuva Umed, Public Service, Bhokar Assembly Constituency, .

स्वप्न मोठं… पाऊल ठाम...!अभ्यास, परिश्रम व नवनिर्मितीचा संकल्प करूया. तरुणाईच्या शक्तीने भारताला नव्या उंचीवर नेऊया.स्वा...
15/08/2025

स्वप्न मोठं… पाऊल ठाम...!
अभ्यास, परिश्रम व नवनिर्मितीचा संकल्प करूया.
तरुणाईच्या शक्तीने भारताला नव्या उंचीवर नेऊया.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🇮🇳
#स्वातंत्र्यदिन #स्वतंत्रता_दिवस

बँक ऑफ बडोदात अधिकारी बनण्याची संधी. विविध विभागात एकूण 800+ पदांसाठी भरती.
12/08/2025

बँक ऑफ बडोदात अधिकारी बनण्याची संधी.
विविध विभागात एकूण 800+ पदांसाठी भरती.

भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलटसाठी मेगाभरती. दहावी व ITI उमेदवारांना सुवर्णसंधी. #भारतीयरेल्वे  #रोजगार
18/04/2025

भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलटसाठी मेगाभरती.
दहावी व ITI उमेदवारांना सुवर्णसंधी.

#भारतीयरेल्वे #रोजगार

       #रोजगारमेळावा  #नांदेडAdv Sreejaya Ashok Chavan
23/02/2025

#रोजगारमेळावा #नांदेड
Adv Sreejaya Ashok Chavan

भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या 'युवा उमेद' उपक्रमांतर्गत आज शंकरराव ...
22/02/2025

भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या 'युवा उमेद' उपक्रमांतर्गत आज शंकरराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूर, जि. नांदेड येथे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तर राज्यमंत्री ना.सौ. मेघनाताई साकोरे-बोर्डीकर (सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महिला व बाल विकास विभाग) यांच्या हस्ते भव्य रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सचिव डी. पी. सावंत, भारतीय जनता पक्षाचे नांदेड ग्रामीण उत्तरचे अध्यक्ष किशोर देशमुख, नांदेड महानगर कार्यकारी अध्यक्ष अमरनाथ राजूरकर, नांदेड महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

युवा उमेद उपक्रमांतर्गत येत्या शनिवारी २२ फेब्रुवारी रोजी अर्धापूर येथील शंकरराव चव्हाण महाविद्यालयात आयोजित भव्य रोजगार...
19/02/2025

युवा उमेद उपक्रमांतर्गत येत्या शनिवारी २२ फेब्रुवारी रोजी अर्धापूर येथील शंकरराव चव्हाण महाविद्यालयात आयोजित भव्य रोजगार मेळाव्याच्या तयारीचा माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, आ. श्रीजया चव्हाण व श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सचिव डी पी सावंत यांनी आज कार्यक्रम स्थळाला भेट देऊन आढावा घेतला.

17/02/2025

येत्या शनिवारी २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता शंकरराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूर येथे आयोजित भव्य रोजगार मेळाव्याच्य...
16/02/2025

येत्या शनिवारी २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता शंकरराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूर येथे आयोजित भव्य रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून महाराष्ट्रासह व इतर राज्यातील अनेक नामांकित कंपन्या नोकरीची संधी घेऊन आपल्या दारापर्यंत येत असून, सुशिक्षित बेरोजगारांनी या संधीचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री व राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.

शनिवारी दुपारी अर्धापूर येथील नरहरी मंगल कार्यालयात आयोजित मेळावापूर्व आढावा बैठकीत संवाद साधताना खा. चव्हाण म्हणाले की, ग्रामीण भागात रोजगार हा प्रमुख विषय आहे. आ. श्रीजया चव्हाण यांनी सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींसाठी विविध उपक्रम राबविण्याचे आश्वासन निवडणूक प्रचाराच्या काळात दिले होते. हा रोजगार मेळावा त्याच आश्वासनाच्या पूर्ततेचा एक भाग असून, या मेळाव्यामध्ये महाराष्ट्रासह देशाच्या इतर प्रमुख शहरातील सुमारे १२० कंपन्या सहभागी होणार आहेत. विविध क्षेत्रातील या कंपन्यांमध्ये १० वी, १२ वी, आयटीआय, पदवी, पदव्युत्तर असे विविध स्तरापर्यंतचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध असतील.

त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या विविध संस्था, मंडळे, महामंडळे आदींच्या माध्यमातून सुरू असलेले तांत्रिक प्रशिक्षण, कर्ज योजना, अनुदान योजना, शिष्यवृत्ती योजना, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आदींबाबतची माहिती देण्यासाठी या मेळाव्यात स्टॉल्स उपलब्ध असणार आहेत. या रोजगार मेळाव्यातून ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुण-तरुणींना रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा आ. श्रीजया चव्हाण यांचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
Adv Sreejaya Ashok Chavan

येत्या शनिवारी २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता शंकरराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूर येथे आयोजित भव्य रोजगार मेळाव्याच्य...
15/02/2025

येत्या शनिवारी २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता शंकरराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूर येथे आयोजित भव्य रोजगार मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज अर्धापूर येथे बैठक झाली.
या मेळाव्याच्या माध्यमातून महाराष्ट्रासह इतर राज्यातील अनेक नामांकित कंपन्या नोकरीची संधी घेऊन आपल्या दारापर्यंत येत असून, सुशिक्षित बेरोजगारांनी या संधीचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आमचे आवाहन आहे.

येत्या २२ फेब्रुवारी रोजी शंकरराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूर येथे आयोजित भव्य रोजगार मेळाव्यात मुलाखत कशी द्यावी, या व...
15/02/2025

येत्या २२ फेब्रुवारी रोजी शंकरराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूर येथे आयोजित भव्य रोजगार मेळाव्यात मुलाखत कशी द्यावी, या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज मुदखेड येथे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले.

'युवा उमेद' उपक्रमांतर्गत शनिवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी मुदखेड आणि भोकर येथे रोजगार मेळावापूर्व प्रशिक्षण कार्यक्र...
14/02/2025

'युवा उमेद' उपक्रमांतर्गत शनिवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी मुदखेड आणि भोकर येथे रोजगार मेळावापूर्व प्रशिक्षण कार्यक्रम होणार आहेत.
नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, ही विनंती.

Address

Bhokar Assembly Constituency

431801

Telephone

+918169311988

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yuva Umed posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Yuva Umed:

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share