24/04/2014
Date 24 /04/ 2014
मुख्य निवडणूक आयुक्त ( महाराष्ट्र)
मंत्रालय मुंबई ४०० ०३२.
विषय : वारंवार सुचित करून सुद्धा राजकीय पक्षाकडून तसेच वर्तमान पत्राकडून आचार सहिंतेचे उल्लंघन केल्याची तक्रार करण्याबाबत ……
माननीय महोदय ,
आज दिनांक २४/४/२०१४ रोजी 1 लोकमत, 2 महानायक , 3 सामना , 4 महाराष्ट्र टाइम्स , 5 लोकसत्ता 6 सकाळ, 7 पुढारी , 8 मुंबई चॉफ़ेर ,9 संध्याकाळ , 10 नवाकाळ , 11 लोकनायक , 12 हमारा महानगर , 13 यशोभूमी , 14 नव भारत , 15 नव भारत टाइम्स ,16 पुण्य नगरी , 17 सम्राट , 18 प्रहार , 19 संध्यानंद , 20 वार्ताहर , 21 डी एन ए आणि काल दिनांक २३/०४/२०१४ रोजी 1 लोकमत, 2 महानायक , 3 सामना , 4 महाराष्ट्र टाइम्स , 5 लोकसत्ता 6 सकाळ, 7 पुढारी , 8 मुंबई चॉफ़ेर ,9 संध्याकाळ , 10 नवाकाळ , 11 लोकनायक , 12 हमारा महानगर , 13 यशोभूमी , 14 नाव भारत , 15 नव भारत टाइम्स ,16 पुण्य नगरी , 17 सम्राट , 18 प्रहार , 19 संध्यानंद , 20 वार्ताहर , 21 डी एन ए वगैरे वर्तमान पत्रात उघडपणे १) कॉंग्रेस ,२) भारतीय जनता पार्टी ३) राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ४) शिवसेना ५) महाराष्ट्र नवनिर्माण सेना ६) बहुजन समाज पार्टी या सर्व पक्षांची तसेच त्यांच्या उमेदवारांची पैसे देवून जाहिरात देण्यात आलेली आहे. या जाहिरातीतून मतदारांना स्वतःच्या पक्षांतर्गत उभे असलेल्या उमेदवारांना मते देण्याचे जाहीर आव्हान करण्यात आले आहे . या जाहिरातीतून मतदारांचे लक्ष विचलित केले जात आहे. जेणे करून मतदाराला स्वतःचा स्वतंत्र निर्णय घेण्यास बाधा उत्पन करण्यात आली आहे.
मी दीपक गोपीचंद राठोड बहुजन मुक्ती पार्टी चा प्रसिद्धी प्रमुख (मुंबई कमिटी ) या नात्याने दिनांक २३ एप्रिल २०१४ रोजी आपणास तक्रार केली होती कि कोणताही पक्ष अथवा उमेदवार किंवा त्यांचे शुभचिंतकांकडून पक्षाचा किंवा उमेदवाराची जाहिरात प्रचार प्रसार माध्यमातून देणे हा कायदेशीर गुन्हा असून हा आचार साहिन्तेचा उघडपणे केला गेलेला भंग आहे , आणि शिक्षेस ते पात्र आहे. तरीही वरील दिलेल्या वर्तमान पत्रात उघडपणे पैसे देऊन जाहिरात करण्यात आली आहे. वरील सर्व वर्तमान पत्रावर द्वारे पक्षाकडून तसेच वाचकांकडून पैसा कमाविण्यासाठी दिनांक २३ एप्रिल २०१४ आणि निवडणूक च्या दिवशी म्हणजे २४ एप्रिल २०१४ रोजी निवडणूक आयुक्ताला न जुमानता वरील सर्व पक्ष ,सर्व पक्षांतर्गत उभे असलेल्या उमेदवार तसेच वरील सर्व वर्तमान पत्राचे संपादकांनी आचार संहितेचे उल्लघन केले आहे.
मुंबई कमिटी प्रसिद्धी प्रमुख या नात्याने आपणास कळवितो कि वरील तक्रारीस गंभीर बाब मानून वरील सर्व पक्षा तर्फे उभे करण्यात आलेल्या उमेदवारांचे पात्रता रद्द करण्यात यावी व तसेच वरील सर्व वर्तमान पत्राचे परवाने रद्द करण्यात यावे आणि संपादकावर आचार सहितेचा भंग केल्याचे गुन्हा दाखल करून त्यांचावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी जर यावर योग्य अशी कार्यवाही केले गेली नाहीतर बहुजन मुक्ती पार्टी तर्फे या सर्व विषयांवर लक्ष घालून भारतीय निवडणूक आयोगासमोर पक्षपाती पणाचे धोरण स्वीकार केल्याचा ठपका ठेवून एक लाख लोकासोबात जन आंदोलन करण्यात येईल तसेच हि बाब सुप्रीम कोर्टा पर्यंत नेण्यात येईल ह्याची निवडणूक आयोगाने गंभीर अशी दखल घाव्यी.
आपण या तक्रारीवर त्वरित लक्ष घालून योग्य ती कार्यवाही कराल अशी अपेक्षा बाळगतो.
आपण वरील तक्रारीवर करीत असलेल्या कार्यवाहीच प्रतिसाद वेळोवेळी मिळावा.
दीपक गोपीचंद राठोड
(प्रसिद्धी प्रमुख मुंबई कमिटी - बहुजन मुक्ती पार्टी )
+91 8097458787