Vasai-Virar City Municipal Corporation

  • Home
  • Vasai-Virar City Municipal Corporation

Vasai-Virar City Municipal Corporation vvcmc_official

02/06/2026
आपल्या वसई विरार शहर महानगालिका क्षेत्रात जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला सुरु असून १४ जून २०२६  पर्यंत प्रगणक आपल्या...
02/06/2026

आपल्या वसई विरार शहर महानगालिका क्षेत्रात जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला सुरु असून १४ जून २०२६ पर्यंत प्रगणक आपल्या घरी भेट देणार आहेत.त्यांना अचूक व संपूर्ण माहिती देणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करा, देशाच्या विकासात आपला महत्वाचा हातभार लावा.

वसई विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागदि.०१/०६/२०२६*प्रेसनोट**मा. उपसंचालक, आरोग्य सेवा परीमंडळ, ठाणे यांची भे...
01/06/2026

वसई विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग

दि.०१/०६/२०२६

*प्रेसनोट*

*मा. उपसंचालक, आरोग्य सेवा परीमंडळ, ठाणे यांची भेट*

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, राष्ट्रीय आयुष अभियान, राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम, आयुष्मान भारत डिजिटल मिशन, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियान तसेच राष्ट्रीय व राज्य आरोग्य कार्यक्रमांतर्गत कार्यान्वित आरोग्य संस्थांमार्फत राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण व परिणामकारक आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहेत. राष्ट्रीय व राज्य आरोग्य कार्यक्रम व योजनांची प्रभावी आणि व्यापक स्वरूपात अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रासाठी समन्वय अधिकारी म्हणून डॉ. अशोक नांदापुरकर, उपसंचालक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मा. डॉ. अशोक नांदापुरकर, उपसंचालक, आरोग्य सेवा परीमंडळ, ठाणे यांनी वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील सर डी.एम. पेटिट रुग्णालय, वसई येथे भेट देऊन रुग्णालयाची पाहणी केली. तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, वसई व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, दिवाणमान येथे भेट देऊन पाहणी करून त्यामध्ये PMJAY, ABHA Card, OPD Services, HLL Lab, Pharmacy, Inj. HPV Vaccination Campaign, NCD Programme, टी.बी मुक्त भारत अभियान व इतर राष्ट्रीय कार्यक्रमाचा आढावा घेऊन त्याबददल योग्य त्या सूचना देण्यात आल्या.

नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, आयुष्मान आरोग्य मंदीर, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी, जी.एन.एम, ए.एन.एम, आशा स्वयंसेविका यांची १३ आरोग्य सेवाबाबत माहिती व आढावा घेण्यात आला. तसेच आरोग्य केंद्रामध्ये देण्यात येणाऱ्या सुविधांचा व विविध राष्ट्रीय कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. अधिकारी / कर्मचारी यांच्या बरोबर संवाद करुन पोर्टलमध्ये येणाऱ्या अडचणी बाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय आरोग्य विभाग, मुख्यालय, विरार (प.) येथील कामकाजाचा आढावा घेतला. वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाचे कामकाज समाधानकारक असल्याचे नमूद करून, सेवांमध्ये अधिक सुधारणा करण्याबाबत मार्गदर्शन केले.

वैद्यकीय आरोग्य विभाग
वसई विरार शहर महानगरपालिका

पीएम स्वनिधी योजनेची ६ वर्षे यशस्वी पूर्ण!!केंद्र शासनाच्या पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत वसई-विरार शहर महानगरपालिकेमार्फत आ...
01/06/2026

पीएम स्वनिधी योजनेची ६ वर्षे यशस्वी पूर्ण!!

केंद्र शासनाच्या पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत वसई-विरार शहर महानगरपालिकेमार्फत आजपर्यंत एकूण 34,075 कर्ज प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे. या मंजूर कर्जांची एकूण रक्कम ₹50 कोटी 25 लाख इतकी आहे.
तसेच, लाभार्थ्यांना 31,906 कर्ज प्रकरणांद्वारे ₹46 कोटी 4 लाखांची कर्ज रक्कम वितरित करण्यात आली असून, या योजनेमुळे शहरातील पथविक्रेते व लघु व्यावसायिकांना आर्थिक बळ मिळाले आहे.
“पीएम स्वनिधी – स्वावलंबनाकडून समृद्धीकडे!”

क्षयरुग्णांना मदत करणेआता अत्यंत सोपे…सरळ सोपी  प्रक्रिया, थेट संपर्क आजच TB Mukt Bharat App डाउनलोड करा आणि निःक्षय मित...
01/06/2026

क्षयरुग्णांना मदत करणे
आता अत्यंत सोपे…
सरळ सोपी प्रक्रिया, थेट संपर्क

आजच TB Mukt Bharat App डाउनलोड करा आणि निःक्षय मित्र बना.





31/05/2026

30/05/2026
वसई-विरार शहर महानगरपालिका                                                                                              ...
29/05/2026

वसई-विरार शहर महानगरपालिका
दि.२९/०५/२०२६

*महानगरपालिकेतील १० अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त*
*मान्यवरांच्या उपस्थितीत सदर अधिकारी-कर्मचारी यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न*

वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरून दिनांक ३१ मे २०२६ रोजी नियत वयोमानानुसार एकूण १० अधिकारी-कर्मचारी निवृत्त होत आहेत. या सेवानिवृत्त होत असलेल्या अधिकारी-कर्मचारी यांचा सेवापूर्ती सोहळा कार्यक्रम दि.२९ मे २०२६ रोजी महानगरपालिका मुख्यालयातील सभागृहात संपन्न झाला.
सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये सहाय्यक आयुक्त श्री.हरेश्वर वसंत पाटील, अधिक्षक श्री.नंदकुमार बुधाजी पाटील, वरिष्ठ लिपिक श्री.विष्णू काळू पाटील व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये श्री.विकास जाधव, श्री.सुनील पोपट महामुनी व श्री.बुधल मंगळ्या पाटील, मजुर कर्मचारी श्री.नरेंद्र ना.जाधव त्याचप्रमाणे आरोग्य कर्मचारी श्री.शांताराम पांढरे, श्री.विलास बसवनाथे व श्री.यशवंत मंजी दवडे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस आस्थापनेचे वरिष्ठ लिपिक श्री.उमेश मसणेकर यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांविषयी थोडक्यात माहिती दिली. यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करीत महानगरपालिकेच्या प्रगतीमध्ये या निवृत्त होत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी जबाबदारीने कर्तव्य पार पाडून संस्थेची व जनतेची सेवा केली आहे व विशेष म्हणजे त्यांची सेवा ही निष्कलंक असल्याने त्यांचे कार्य नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.
सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी महानगरपालिकेच्या सेवेत अनेक वर्षे प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्य करत नागरिकांच्या सेवेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्या सेवाकाळात महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये काम करताना नागरिकाभिमुख प्रशासन उभारण्यासाठी दिलेल्या योगदानाचा विशेष उल्लेख करण्यात आला. निवृत्त होत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करत सन्मा.महापौर श्री.अजीव पाटील, सन्मा.उपमहापौर श्री.मार्शल लोपीस, सन्मा.सभागृह नेते श्री.प्रफुल साने, सन्मा. स्थायी समिती सभापती श्री.प्रविण शेट्टी यांचे हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह व सेवानिवृत्तीनंतरच्या लाभाचे धनादेश देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही आपल्या सेवाकाळातील अनुभव व्यक्त करत सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली व मान्यवरांचे, महानगरपालिका अधिकाऱ्यांचे व विशेषतः आस्थापना विभागाचे आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर मा.महापौर श्री.अजीव पाटील, मा.उप-महापौर श्री.मार्शल लोपीस, मा.सभागृह नेते श्री.प्रफुल्ल साने, मा.स्थायी समिती सभापती श्री.प्रवीण शेट्टी, मा.उप-आयुक्त श्री.अजित मुठे, मा.उप-आयुक्त श्रीम.हर्षला राणे, मा.नगरसचिव श्री.विश्वनाथ तळेकर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसचिव श्री.विश्वनाथ तळेकर यानी केले व आभार प्रदर्शन श्री.उमेश मसणेकर यांनी केले.

बुधवार दिनांक २७ मे २०२६ रोजी वसई विरार शहर महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शासनाच्या निर्देशानुसार एकल वापर...
29/05/2026

बुधवार दिनांक २७ मे २०२६ रोजी वसई विरार शहर महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शासनाच्या निर्देशानुसार एकल वापर प्लास्टिक बंदीबाबत मोहीम घेण्यात आली. प्रभाग समिती ई येथील श्रीप्रस्था ३ रा रस्ता नालासोपारा पश्चिम येथील गोडाऊन मध्ये धाड टाकण्यात आली. कारवाई दरम्यान एकूण ३२०० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले व ५०००/- इतका दंड आकारण्यात आला. सदर मोहिमेमध्ये घनकचरा विभागाचे मा. उपायुक्त सौ. अर्चना दिवे, प्र. सहा. आयुक्त श्री. जितेंद्र नाईक, स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता मार्शल व इतर कर्मचारी उपस्थित होते.

🌳

Address

Vasai Virar

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vasai-Virar City Municipal Corporation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share