19/01/2026
*विश्वास, विकास आणि सेवाभावाचा हॅट्रिक इतिहास*
✌️
*प्रभाग क्रमांक २४ थेरगाव*
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये प्रभाग क्रमांक २४ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार *सौ. मायाताई संतोष बारणे यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत हॅट्रिक नगरसेविका होण्याचा मान पटकावला.* हा विजय केवळ निवडणुकीतील यश नसून, थेरगावच्या जनतेने त्यांच्यावर दाखवलेल्या अढळ विश्वासाची पावती आहे.
या यशामागे *श्री. संतोष अण्णा नागुभाऊ बारणे* मा. विरोधी पक्षनेते, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे भक्कम नेतृत्व आहे. २००७ साली प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आलेले. संतोष अण्णा यांनी २००९ मध्ये विरोधी पक्षनेतेपद भूषवले. २०१२ व २०१७ मध्ये *सौ. मायाताई संतोष बारणे नगरसेविका म्हणून निवडून आल्या आणि २०२६ मध्ये त्यांनी विकासाच्या जोरावर नवा इतिहास रचला.*
*संतोष अण्णा आणि मायाताई दोघांची मिळून ही नगरसेवक पदाची चौथी टर्म असून, हे यश म्हणजे थेरगावकर नागरिकांनी त्यांच्या कार्यावर टाकलेला सार्थ विश्वास आहे.*
थेरगाव परिसरात राबवलेल्या भरीव विकासकामांमुळे हा विजय अधिक ठळक ठरतो.
डांगे चौक येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ग्रेड सेपरेटर, गुजर नगर परिसरात सबवे, मंगल नगर ते थेरगाव फाटा २४ मीटर रस्ता रुंदीकरण व शोभिकरण, नगर येथील लक्ष्मी बारणे उद्यानाचे नूतनीकरण, लक्ष्मीबाई बारणे उद्यानात ओपन जिम, गुजर नगर येथे महिलांसाठी बंदिस्त जलतरण तलाव, तसेच २५ दशलक्ष लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात आली.
आनंदवन येथे खेळाचे मैदान विकसित, थेरगाव परिसरात १५ ट्रान्सफॉर्मर उभारणी, डांगे चौक येथे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित भव्य शिल्प, तसेच शासन आपल्या दारी ही कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवण्यात आली.
कोविड १९ महामारीच्या कठीण काळात बारणे कुटुंबीयांनी स्वतःच्या स्वखर्चाने औषध फवारणी, अन्नधान्य किट वाटप, डॉक्टर आपल्या दारी, कोविड लसीकरण, ट्रॅव्हल ई-पास, रुग्णालयात बेड उपलब्ध करून देणे अशा अनेक सेवा दिल्या. दुःखद प्रसंगी प्रत्यक्ष सहभाग ही त्यांच्या कार्याची ओळख ठरली.
महानगरपालिकेतील अनेक भ्रष्टाचार प्रकरणे उघडकीस आणत त्यांनी प्रशासनाला जबाबदार धरले.
जय गणेश नागरी पतसंस्था यांच्या माध्यमातून अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून अनेक कुटुंबांना आर्थिक आधार दिला जातो.
शिक्षण, आरोग्य व सामाजिक बांधिलकी यावरही त्यांचा भर आहे. थेरगाव परिसरातील दहावी, बारावी व उच्चशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा दरवर्षी सन्मान सोहळा, मार्गदर्शन व्याख्याने, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे, मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी मदत, गौरी गणपती सजावट स्पर्धा, तसेच प्रगती शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ दिला जातो.
अध्यात्माची आवड जपत आई वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचा सन्मान करण्याची परंपराही बारणे परिवाराने जपली आहे.
*या सर्व कार्याची दखल घेतच थेरगावच्या जागरूक नागरिकांनी सौ. मायाताई संतोष बारणे यांना तिसऱ्यांदा नगरसेविकेपदी विराजमान केले आहे.*
⏰✌️💐🤝
*२४ तास नागरिकांसाठी उपलब्ध, नागरिकांच्या सुख–दुःखात नेहमी सहभागी राहणारे हे नेतृत्व म्हणजेच खऱ्या अर्थाने लोकसेवेचे प्रतीक आहे.*
*लेखन* 🖋️:
*श्री. ऋषिकेश रेवणनाथ काशिद*
डायरेक्टर : हेड ऑपरेशन : नमस्ते टीव्ही मराठी.