Vijay Kumbhar FC

Vijay Kumbhar FC Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vijay Kumbhar FC, Pune.

14/08/2023

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त मा. विजय कुंभार (उपाध्यक्ष, आप, महाराष्ट्र राज्य) यांच्याकडून झेंडावंदन सोहळा निमित्ताने सर्व पुणेकरांना निमंत्रण देण्यात आले.

11/07/2023

माहितीचा अधिकार
एक दिवसीय कार्यशाळा

दि.23 जुलै 2023 । पुणे
वेळ स. 10 ते सायं 4 वाजे पर्यंत

पत्ता - विद्यार्थी साहाय्यक समिती, ललित हॉटेल समोर HDFC बँक मागे फर्ग्युसन कॉलेज रोड, शिवाजी नगर पुणे- 411005

वक्ते
मा. विजय कुंभार
( माहिती अधिकार कार्यकर्ते व राज्य संघटक आम आदमी पार्टी)
विषय- माहिती अधिकार मधील केस स्टडी व यशस्वी उदाहरण.

मा. प्रल्हाद कचरे
(माजी जिल्हाधिकारी, यशदा)
विषय- माहितीचा अधिकार कलम 4

मा. अक्षय दावडीकर
(प्रशिक्षक माहितीचा अधिकार )
विषय- अर्ज दाखल व अपील

नोंदणी- 1000 (सकाळचा नाश्ता, जेवण, चहा खर्च समाविष्ठ)

.. पुणेकरांच्या भावना समजून घ्या. बोजवारा उडालेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही पुण्यातील मोठी समस्या आहे.लाखो लोक  े प्र...
08/07/2023

.. पुणेकरांच्या भावना समजून घ्या. बोजवारा उडालेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही पुण्यातील मोठी समस्या आहे.लाखो लोक े प्रवास करत असतात. त्रासलेल्या PMPML प्रवाशांना तिच्यात काही सुधारणा करून दिलासा देण्याचे काम ओम बकोरिया करत होते.त्यांच्या अवेळी बदलीने पुणेकरांच्या मनात आक्रोश आहे.तो समजून घेउन बकोरियांची बदली रद्द करा.

“.. पुणेकरांच्या भावना समजून घ्या. बोजवारा उडालेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही पुण्यातील मोठी समस्या आहे.ल...

.. what is the reason that chairman and managing director of   Om Prakash Bakoria has been transferred within 10 months ...
06/07/2023

.. what is the reason that chairman and managing director of Om Prakash Bakoria has been transferred within 10 months of his appointment? It is clear violation of “Government Servants Regulation Of Transfers and Prevention Of Delay In Discharge Of Official Duties Act.

“.. what is the reason that chairman and managing director of Om Prakash Bakoria has been transferred within 10 months of his appointment? It is clear violation of “Government Servants Regulation Of Transfers and Prevention Of Delay In Discharge Of Official…”

नुकताच  ने आपला राष्ट्रीय दर्जा गमावला. एरवी ते स्वतःला  #राष्ट्रीय वगैरे काहीही म्हणू शकतात.परंतु केवळ  ला कुणीही राष्ट...
06/07/2023

नुकताच ने आपला राष्ट्रीय दर्जा गमावला. एरवी ते स्वतःला #राष्ट्रीय वगैरे काहीही म्हणू शकतात.परंतु केवळ ला कुणीही राष्ट्रीय अध्यक्ष झाल्याचं कळविल्याने काही फरक पडेल असं वाटत नाही.

“नुकताच ने आपला राष्ट्रीय दर्जा गमावला. एरवी ते स्वतःला #राष्ट्रीय वगैरे काहीही म्हणू शकतात.परंतु केवळ ला...

मागील वर्षभर शिंदे फडणवीस सरकारच्या कामगिरीचे वाभाडे काढल्यानंतर वर्ष पूर्तीनिमित्त शासनाच्या कामगिरीची वारेमाप स्तुती क...
05/07/2023

मागील वर्षभर शिंदे फडणवीस सरकारच्या कामगिरीचे वाभाडे काढल्यानंतर वर्ष पूर्तीनिमित्त शासनाच्या कामगिरीची वारेमाप स्तुती करणाऱ्या च्या #लोकराज्य या मासिकाच्या प्रकाशन सोहळ्यात अजित पवारांना सहभागी व्हावे लागले.बहुतेक यालाच नियतीचा खेळ म्हणत असावेत.मंत्रिमंडळ बैठकीत हे प्रकाशन मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री व यांच्या हस्ते पार पडले.

“मागील वर्षभर शिंदे फडणवीस सरकारच्या कामगिरीचे वाभाडे काढल्यानंतर वर्ष पूर्तीनिमित्त शासनाच्या कामगिरीची वार...

05/07/2023
03/07/2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी भ्रष्टाचारियोके डाग अच्छे हें।

02/07/2023

बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे झालेल्या अपघाताला केवळ मानवी चूक समजून त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही.ट्रक, टुरिस्ट बस, ट्रेलर, डंपर यासारख्या ट्रान्स्पोर्ट वाहनांना स्पीड गव्हर्नर बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु त्याची अंमलबजावणी किती होते? सगळ्या यंत्रणा याबाबतीत का गप्प आहेत? टुरिस्ट बसेस ( विशेषतः रात्री ) ज्या वेगाने चालवतात ते या यंत्रणांना का दिसत नाही? ही “न दिसण्याची” कारणे थांबवली तरी अनेक अपघात कमी होतील.SLD चं बंधन फक्त उत्पादकांचं उखळ पांढरं करून देण्यासाठी होतं का?

*महाराष्ट्राच्या मंत्रालयात समित्यांची त्सुनामी ...*शिंदे फडणवीस सरकारने अवघ्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये विविधविषयांशी ...
30/06/2023

*महाराष्ट्राच्या मंत्रालयात समित्यांची त्सुनामी ...*
शिंदे फडणवीस सरकारने अवघ्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये विविध
विषयांशी संबधित २६४ इतक्या समित्या अवघ्या १ वर्षाच्या काळात स्थापन
केल्या आहेत. अर्थात यामध्ये पुनर्गठीत, पुनर्रचित किंवा मुदतवाढ
दिलेल्या समित्या यांचा समावेश नाही.त्यांचा समावेश केला तर तो आकडा ५२१
इतका होतो. एखाद्या विषयाला बगल द्यायची असेल, तो विषय टाळायचा असेल,
किंवा इतर काही त्यामागे हेतू असेल तर त्या विषयावर समिती स्थापन
करण्याचा हातखंडा शासन प्रशासनामध्ये वापरला जातो.
महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्या नंतर सुरुवातीच्या काळात समित्या
स्थापन करण्याचा प्रकार नगण्य असा होता. महाराष्ट्रातील पहिली समिती
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाची १९६२ मध्ये स्थापन झाली. त्यानंतर
दुसरी समिती १९६३ मध्ये स्थापन झाली. त्यानंतर १९६४ ते १९७० या काळात
अवघ्या 3 समित्या स्थापन करण्यात आल्या.परंतु नंतर लोकांच्या प्रश्नाकडे
दुर्लक्ष करण्याचं प्रमाण वाढलं आणि त्याबरोबरच समित्या स्थापनेचे
प्रमाणही तेवढेच वाढले.

समित्या स्थापल्याने त्या विषयाचा पाठपुरावा करणाऱ्यांना बरं वाटतं. आपला
विषय मार्गी लागला असं वाटतं. परंतु प्रत्यक्षात तसं घडत नाही. नंतर
समित्यांची पुनर्रचना, पुनर्गठण, मुदतवाढ असे प्रकार केले जातात. मुळात
शासनात अपवाद वगळता समित्यांची गरज पडत नाही. प्रत्येक विषयासाठी समिती
स्थापन करायची तर मग अधिकारी,लोकप्रतिनिधींनी आणि मंत्र्यांनी करायचं
काय?.

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर मंत्रालयात समित्या स्थापन करण्याचे
प्रमाण किती आणि कसे वाढले ते पहा.

१९६४ ते १९७० या ७ वर्षांच्या काळात अवघ्या ३ समित्यांची स्थापना करण्यात
आली.त्यानंतर १ जानेवारी १९७१ ते ३१ डिसेंबर १९७५ या ५ वर्षात
कालावधीमध्ये अवघ्या ४ समित्यांचे गठन, पुनर्रचना किंवा पुनर्गठन करण्यात
आले, १ जानेवारी १९७६ ते ३१ डिसेंबर १९८० या कालावधीमध्ये ८ , १
जानेवारी १९८१ ते ३१ डिसेंबर ८५ या कालावधीत १८ समित्या, १ जानेवारी
१९८६ ते ३१ डिसेंबर १९९० या कालावधीमध्ये २३ समित्या , १ जानेवारी
१९९१ ते ३१ डिसेंबर १९९५ या कालावधीमध्ये ३९ समित्यांचे गठन, पुनर्रचना
किंवा पुनर्गठन करण्यात आले

त्यानंतर १ जानेवारी १९९६ ते ३१ डिसेंबर २००० या कालावधीमध्ये १२४
समित्या, १ जानेवारी २००१ ते ३१ डिसेंबर २००५ या कालावधीमध्ये २८०
समित्या, १ जानेवारी २००६ ते १ डिसेंबर २०१० या कालावधीमध्ये ८२८
समित्या. १ जानेवारी २०११ ते ३१ डिसेंबर २०१५ या कालावधीमध्ये १२४३, १
जानेवारी २०१५ ते ३१ डिसेम्बर २०२० या कालावधीत ३०१६ व १ जानेवारी २०२१
ते २९ जून २०२३ पर्यंत राज्य शासनाने १३२५ एवढ्या समित्या स्थापन केल्या
किंवा त्यांची पुनर्रचना- पुनर्गठन करण्यात आले किंवा त्यासंदर्भात
काहीतरी कार्यवाही करण्यात आली. यातील जवळपास दोन वर्षांचा कालावधी हा
कोविड कालावधी होता. शिंदे फडणवीस सरकारने मागील एक वर्षात एकूण २६४
समित्या स्थापन केल्या. यामध्ये पुनर्रचना- पुनर्गठन करण्यात आलेल्या
किंवा मुदतवाढ दिलेल्या समित्यांचा समावेश नाही.

शिंदे फडणवीस सरकारने मागील एक वर्षात स्थापन केलेल्या समित्यांची यादी
पहाण्यासाठी https://vijaykumbhar-marathi.blogspot.com/2023/06/blog-post_30.html
इथे जा.

शिंदे फडणवीस सरकारने अवघ्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये सुमारे विविध विषयांशी संबधित २६४ इतक्या समित्या अवघ्या १...

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vijay Kumbhar FC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share