CPI-M Chhatrapati sambhajinagar

  • Home
  • CPI-M Chhatrapati sambhajinagar

CPI-M Chhatrapati sambhajinagar communist party of india (CPI -M) Chhatrapati sambhajinagar

भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)दिनांक २९ एप्रिल ते ४ मे २०२६ या कालावधीतशिव विचार जागर सप्ताहया कालावधीमध्ये राज्य...
27/04/2026

भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)

दिनांक २९ एप्रिल ते ४ मे २०२६ या कालावधीत

शिव विचार जागर सप्ताह

या कालावधीमध्ये राज्यभर

👉 'शिवाजी कोण होता' या पुस्तकाचे वाचन व वाटप

👉चर्चासत्रे व व्याख्याने

👉पोवाडे, गायन व नाट्य कलाकृती

👉वकृत्व व निबंध स्पर्धा

👉अभ्यास सत्रे

आयोजित करत आहोत.

पक्षाच्या सर्व महाराष्ट्रभरातील शाखा व जनसंघटनांच्या शाखा वरील कार्यक्रम उत्साहात आयोजित करतील.

जनतेने या कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा व छत्रपती शिवाजी महाराज यांचे खरे खरे विचार व कार्यकर्तृत्व सर्वांसमोर आणावे असे आवाहन करत आहोत.

डॉ. अजित नवले
राज्यसचिव
भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
Ajit Nawale

भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्स...
14/04/2026

भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तर्फे क्रांतिकारी अभिवादन! 💙❤️✊

आज देशात भांडवलशाही आणि मनुवादाची जी युती झाली आहे, ती सामान्य कष्टकरी, दलित, शोषित आणि बहुजनांच्या हक्कांवर गदा आणत आहे.
​बाबासाहेबांनी आपल्याला 'स्टेट अँड मायनॉरिटीज' मधून जो आर्थिक समतेचा मार्ग दाखवला आणि संविधानातून जो सामाजिक न्यायाचा विचार दिला, तो आज भांडवलधार्जिण्या धोरणांमुळे धोक्यात आला आहे. अशा काळात बाबासाहेबांचा लढा अधिक तीव्र करणे, हीच त्यांना आजच्या जयंती दिनी खरी मानवंदना ठरेल! ✊
छत्रपती संभाजीनगर येथील भडकल गेट येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून CPIM तर्फे अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी कॉ.भगवान भोजने कॉ.सतीश कुलकर्णी कॉ.सचिन गंडले, कॉ. गोरख राठोड, कॉ. सुरेश वाघचौरे ,कॉ.सीमा शिंदे, कॉ.दादासाहेब शिंदे, डॉ.उमाकांत राठोड, कॉ. सुनीता लोंढे, कॉ. सुनील राठोड, कॉ.हनुमान लव्हाळे कॉ.लोकेश कांबळे यांसह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) च्या वतीने अभिवादन! दि. १४ एप्रिल २०२६ ...
14/04/2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) च्या वतीने अभिवादन!

दि. १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ०८:०० वाजता
स्थळ - भडकल गेट, छत्रपती संभाजीनगर

#१४एप्रिल

महात्मा ज्योतिबा फुले यांचा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार; भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)वतीने अभिवादन.​छत्रपती...
13/04/2026

महात्मा ज्योतिबा फुले यांचा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार; भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)वतीने अभिवादन.

​छत्रपती संभाजीनगर:
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) वतीने औरंगपुरा येथील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून क्रांतिकारी अभिवादन करण्यात आले.
​या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. भगवान भोजने म्हणाले की, "महात्मा ज्योतिबा फुले यांनी मांडलेले विचार आजही तितकेच प्रासंगिक आहेत. समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी आणि शोषितांना न्याय मिळवून देण्यासाठी फुलेंचा सत्यशोधकी विचार घराघरात पोहोचवणे ही काळाची गरज आहे. सद्यस्थितीत निर्माण झालेली आव्हाने पेलण्यासाठी फुलेंचा लढा पुढे नेण्याचा निर्धार पक्षाने केला आहे."

​या अभिवादन कार्यक्रमाला​ कॉ.सचिन गंडले, ​कॉ. गोरख राठोड​ ,मनिषा बल्लाळ ​डॉ. लोकेश कांबळे ,सीमा शिंदे, ​दादासाहेब शिंदे, डॉ . श्रीधर जाधव,निशिकांत कांबळे पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#11एप्रिल

क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त क्रांतिकारी अभिवादन  विशेष अभिवादन कार्यक्रमदिनांक: ११ एप्रिल २०२६...
11/04/2026

क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त क्रांतिकारी अभिवादन

विशेष अभिवादन कार्यक्रम

दिनांक: ११ एप्रिल २०२६
वेळ: सकाळी ८:०० वाजता

स्थळ: औरंगपुरा, छत्रपती संभाजीनगर

आयोजकःभारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) - (CPIM)

#11एप्रिल

प्रति,मा. संपादक प्रेस नोट्सभोंदू अशोक खरात प्रकरणी आमदारांवर कारवाईची मागणी; क्रांती चौकात जोरदार निदर्शनेछत्रपती संभाज...
07/04/2026

प्रति,
मा. संपादक

प्रेस नोट्स

भोंदू अशोक खरात प्रकरणी आमदारांवर कारवाईची मागणी; क्रांती चौकात जोरदार निदर्शने

छत्रपती संभाजीनगर : भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)च्या वतीने भोंदू अशोक खरात यांना भेटलेल्या आमदारांवर कारवाई करण्यात यावी, तसेच राज्यात अंधश्रद्धा पसरवणाऱ्या अशा भोंदू बाबांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत क्रांती चौक येथे जोरदार निदर्शने करण्यात आली.
या वेळी महाराष्ट्र विधिमंडळातील जे आमदार भोंदू अशोक खरात यांना भेटले, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. अशा प्रकारच्या घटनांमुळे महाराष्ट्राची देशभरात मोठ्या प्रमाणावर बदनामी होत असूनही सरकार योग्य ती पावले उचलत नसल्याने जनतेमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाल्याचे आंदोलकांनी सांगितले.
महाराष्ट्राची ओळख ही पुरोगामी राज्य म्हणून असताना राज्यातील काही आमदार, मंत्री तसेच उपमुख्यमंत्री अशा भोंदू बाबा-बुवांच्या पुढे लोटांगण घालत असल्याची घटना अत्यंत खेदजनक असल्याची टीका यावेळी करण्यात आली. अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
या निदर्शनात पक्षाचे सचिव कॉ. भगवान भोजने, कॉ. प्रकाश पाटील, कॉ. सचिन गंडले, कॉ. भाऊसाहेब झिरपे, कॉ. अजय भवलकर, कॉ. मंगल ठोंबरे, कॉ. गोरख राठोड, कॉ. सुनीता लोंढे, कॉ. विशाल भुमरे, कॉ. दामोदर माणकापे, कॉ. सुनील राठोड, कॉ. मनिषा बल्लाळ आदींसह पक्षाच्या विविध जनवादी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

#अंधश्रद्धा_थांबवा #महाराष्ट्र_घडवा

दि. २९ मार्च २०२६ रोजी कॉम्रेड अ‍ॅडव्होकेट  #उद्धव भवलकर यांच्या पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमास मराठवाडा तसेच संपूर्ण महा...
06/04/2026

दि. २९ मार्च २०२६ रोजी कॉम्रेड अ‍ॅडव्होकेट #उद्धव भवलकर यांच्या पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमास मराठवाडा तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार! 🙏

#माकपचे पदाधिकारी #सिटूचे पदाधिकारी, किसान सभेचे पदाधिकारी, विविध कंपन्यांतील कामगार बांधव, #आशा व गटप्रवर्तक तसेच , DYFI कार्यकर्ते, #यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे निलेश राऊत आणि त्यांचे सहकारी, तसेच #शहीद भगतसिंग विद्यालय चे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक — या सर्वांनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली.

आपल्या या सहकार्यामुळे आणि सहभागामुळेच कार्यक्रम यशस्वी झाला. पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक #आभार! 🙏

#कॉम्रेड

कामगार नेते कॉम्रेड उद्धव भवलकर यांच्या अर्धाकृती पुतळा अनावरण सोहळा.दिनांक :- २९ मार्च २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता  स्थ...
28/03/2026

कामगार नेते कॉम्रेड उद्धव भवलकर यांच्या
अर्धाकृती पुतळा अनावरण सोहळा.

दिनांक :- २९ मार्च २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता
स्थळ :- शहीद भगतसिंग हायस्कूल बजाज नगर, छत्रपती संभाजीनगर

सर्व डाव्या व लोकशावादी पक्षाचे नेते, कामगार प्रतिनिधी व सभासद यांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे ही विनंती...!

२३ मार्च १९३१भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)छत्रपती संभाजीनगर जिल्हा समिती स्वतंत्र आणि समाजवादी  भारताचे स्वप्न प...
23/03/2026

२३ मार्च १९३१

भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
छत्रपती संभाजीनगर जिल्हा समिती

स्वतंत्र आणि समाजवादी भारताचे स्वप्न पाहात फासावर चढलेले महान मार्क्सवादी क्रांतिकारक कॉम्रेड भगतसिंग, कॉम्रेड राजगुरू आणि कॉम्रेड सुखदेव यांना हौतात्म्य दिनी क्रांतिकारी अभिवादन!

लाल सलाम!

भारताचा कम्युनिस्ट पक्ष ( मार्क्सवादी) व जाती अंत संघर्ष समिती, महाराष्ट्रआयोजित🔴🔵 महाड चवदार तळे सत्याग्रह व मनुस्मृती ...
19/03/2026

भारताचा कम्युनिस्ट पक्ष ( मार्क्सवादी) व जाती अंत संघर्ष समिती, महाराष्ट्र

आयोजित

🔴🔵 महाड चवदार तळे सत्याग्रह व मनुस्मृती दहनाच्या, शताब्दी वर्ष 🔵🔴

मानवी हक्क परिषद

|| १९ मार्च २०२६, दुपारी २ वाजता ||
कॉ. आर.बी. मोरे नगरी, बेटकर महाराज मठ, मु.लाडवली, महाड
************************

|| २० मार्च २०२६.सकाळी ९ पासून ||
चवदार तळे व क्रांतीभुमी येथे मिरवणूकीने चवदार तळे सत्याग्रहींच्या स्मृतीस क्रांतिकारी अभिवादन!

*** प्रमुख उपस्थिती ***
- कॉ. एम.ए. बेबी (सरचिटणीस, माकप)
- डॉ.अशोक ढवळे (पॉलिट ब्युरो सदस्य, माकप)
- कॉ. मरियम ढवळे (पॉलिट ब्युरो सदस्य, माकप)
- मा. तुषार गांधी (महात्मा गांधींचे पणतू)
- कॉ. नरसय्या आडम मास्तर ( जेष्ठ कामगार नेते, माकप)
- डॉ. प्रज्ञा दया पवार (आंबेडकरी साहित्यिक)
- विद्रोही शाहीर, संभाजी भगत
- आमदार कॉ. विनोद निकोले (केंद्रीय समिती सदस्य, माकप)

चलो महाड. मोठ्या संख्येने सहभागी व्हा!
समाज परिवर्तनाच्या चळवळीत, सक्रिय व्हा!

आपला,भ्रातृभावी
डॉ. अजित नवले
राज्य सचिव, भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
कॉ. शैलेन्द्र कांबळे (निमंत्रक,जाती अंत संघर्ष समिती, महाराष्ट्र)
#माकप_चवदार_तळे१०० Communist Party of India (Marxist) Shailendra Kamble Ajit Nawale

कामगार नेते कॉ. उद्धव भवलकर यांच्या ७४ व्या जयंतीनिमित्त क्रांतिकारी अभिवादनछत्रपती संभाजीनगर, दि. १२ मार्च – कामगार चळव...
13/03/2026

कामगार नेते कॉ. उद्धव भवलकर यांच्या ७४ व्या जयंतीनिमित्त क्रांतिकारी अभिवादन

छत्रपती संभाजीनगर, दि. १२ मार्च –

कामगार चळवळीतील ज्येष्ठ नेते कॉम्रेड उद्धव भवलकर यांच्या ७४ व्या जयंतीनिमित्त सीपीआय (एम) व सीटूच्या वतीने सिटू भवन येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कॉ. उद्धव भवलकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला क्रांतिकारी अभिवादन केले. कामगारांच्या हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर दिलेला लढा, संघटन उभारणीसाठी केलेले योगदान आणि कामगार चळवळीतील त्यांचे विचार यांचा यावेळी उपस्थितांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

कॉ. उद्धव भवलकर यांनी कामगारांच्या प्रश्नांवर सातत्याने संघर्ष करत संघटित चळवळ मजबूत केली. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन कामगारांच्या हक्कांसाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमास सीपीआय (एम) व सीटूचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कामगार उपस्थित होते.

Address

CPIM Bhavan, Ajab Nagar, Chhatrapati Sambhajinagar

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when CPI-M Chhatrapati sambhajinagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share