Shri Siddheshwar Tempale Naigaon

Shri Siddheshwar Tempale Naigaon Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shri Siddheshwar Tempale Naigaon, Public & Government Service, Saswad-Supa Road, Sacramento, CA.

10/03/2021

mahaleader is the news web portal which will give you the latest update around you
Instagram: https:

10/03/2021

शेती आणि बागायती कामे पार पाडण्यासाठी ट्रॅक्टर हा सर्वात महत्वाची भूमिका बजावतो. ट्रॅक्टर हे एक असे कृषी यंत्र आ.....

10/02/2021

पुरंदर तालुक्यातील नायगाव येथे नुकताच राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने नायगाव मधील अंगणव.....

09/27/2021

सच्या सहाय्याने ग्रामीण भागामध्ये विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे धोरण अवलंबिले आहे. यानुसार पोस....

*नायगाव व पिसर्वे ग्रामस्थांनी लोकसहभागातून बनविला रस्ता*
08/24/2021

*नायगाव व पिसर्वे ग्रामस्थांनी लोकसहभागातून बनविला रस्ता*

सध्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये पानंद रस्ते, शिवरस्ते , शेतरस्ते ,यांची मोठी आवश्यकता भासू लागली आहे .पुरंद...

आपल्या गावातील गौरी(कै. लक्ष्मण भाऊसाहेब कड) यांची कन्या हिला ब्रेन ट्युमर असून तिला मदतीची खूप आवश्यकता आहे. एका शास्त्...
07/23/2021

आपल्या गावातील गौरी(कै. लक्ष्मण भाऊसाहेब कड) यांची कन्या हिला ब्रेन ट्युमर असून तिला मदतीची खूप आवश्यकता आहे. एका शास्त्रक्रिये साठी तिला 18 लाखांची गरज आहे. आपल्याच गावातील कन्येसाठी सर्वानी सढळ हाताने मदत करावी आपली छोटीशी मदत तिचे आयुष्य वाचवू शकेल.

मदतीसाठी खलील लिंक ओपन करून paytm करू शकता
https://milaap.org/stories/help-gauri-shrikant-s?utm_source=facebook&utm_medium=stories-title

Ganesh Kad (पेशंटचा भाऊ) 7020097001 या नंबर वर फोन पे(phone pe) करू शकता

After undergoing a surgery to remove a brain tumour, Gauri Sh*tole suffered from complications. She needs prolonged treatment to recover.

07/21/2021

शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे: जयदीप बारभाईमयुर कुदळे जेजुरी प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्याचे उ.....

06/30/2021

महाराष्ट्रामध्ये असणा-या गिरीदुर्गांचा इतिहास पाहता, 'मल्हारगड' हा निर्माण झालेला अखेरचा गिरीदुर्ग. या किल्ल्या....

05/01/2021

राजांनी सांगितलय जीव राखावा !
त्यामुळं घरीच राहु आणि आपल्या महाराष्ट्राला सुरक्षित ठेवूयात...
महाराष्ट्र दिन चिरायु होवो !!

#महाराष्ट्र_दिन
#श्रीशंभूछत्रपतीराज्याभिषेकसोहळा
#राजधानीरायगड

'मल्हारगड'महाराष्ट्रामध्ये असणा-या गिरीदुर्गांचा इतिहास पाहता, 'मल्हारगड' हा निर्माण झालेला अखेरचा गिरीदुर्ग. या किल्ल्य...
04/29/2021

'मल्हारगड'

महाराष्ट्रामध्ये असणा-या गिरीदुर्गांचा इतिहास पाहता, 'मल्हारगड' हा निर्माण झालेला अखेरचा गिरीदुर्ग. या किल्ल्याची निर्मिती इ.स.१७५७ ते इ.स. १७६० च्या दरम्यान झाली, म्हणजे या गिरीदुर्गाचे वयोमान उणेपुरे अवघे अडीचशे वर्ष. अन्य दुर्गांच्या पंक्तीमध्ये वयोमानानुसार याचे अखेरचे स्थान म्हणून याला अभ्यासक तरुणगड असेही म्हणतात. पायथ्याला असणार्‍या सोनोरी गावामुळे या गडाला 'सोनोरी' म्हणूनही ओळखले जाते. मराठेशाहीतील उत्तरार्धात
पेशव्यांनी पुण्यातून कारभार सुरु केल्यानंतर, सरदार पानसेंना तोफखान्याचे प्रमुख म्हणून स्वतःच्या कर्तबगारीवर सरदारकी मिळाली. सरदार पानसेंनी स्वराज्य भक्कम करण्यासाठी पुणे आणि किल्ले पुरंदर यांच्या मध्ये पुण्याजवळ किल्ला उभारण्याचे योजले. त्यासाठी त्यांनी क-हेपठरावरील सोनोरी गावाजवळ डोंगराची निवड केली. दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. पानसेंनी आपल्या उत्कर्षाच्या काळात या किल्ल्याची निर्मिती केली परंतु ते आपल्या घराण्याच्या कुलस्वामी खंडेरायाला मात्र विसरले नाहीत किल्ल्याला त्यांनी मल्हारगड असे नाव देवून आपल्या कुलस्वामी प्रती श्रद्धा व्यक्त केलेली आढळून येते. किल्ल्याला मल्हारगड नाव देण्यामागे ही एक दंतकथा सांगितली जाते ती पुढे दिलीच आहे, अशा दंतकथांना ऐतिहासक दस्तऐवज म्हणून पाहता येत नसले तरी त्यावेळचे समाजमन समजण्यासाठी यांचा उपयोग होतो. मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकारचा असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकारचा तट आहे. गडाची उंची समुदसपाटीपासून ३१६६ फूट आहे, इतर किल्ल्यांच्या तुलनेमध्ये मल्हारगड आकाराने लहान आहे, साधारणपणे साडेचार ते पाच एकर क्षेत्रावर, या किल्ल्याचा विस्तार आहे. तटबंदीची काही ठिकाणी पडझड झाली असली तरी ब-यापैकी शाबूत आहे. गड किल्ल्यांच्या उभारणीविषयी किंवा नावाविषयी अनेक दंतकथा , भयकथा आणि रंजककथा अबालवृद्धांमध्ये प्रिय असतात, अशाच प्रकारची एक दंतकथा सोनोरी गावातील वयस्कर व्यक्तींकडून ऐकायला मिळाली. अशा दंतकथा आचंबित करणा-या असतात, तर किल्ल्याला मल्हारगड नाव देण्यामागे एक आचंबित करणारी दंतकथा सांगितली जाते,'किल्ल्याच्या उभारणीचे बांधकाम चालू असताना तटबंदी अनेक
वेळा ढासळत होती म्हणून खडक सुरुंग लावून फोडण्याचे ठरले, मजूर सुरुंगासाठी खाणत्या घेत असताना एके ठिकाणी रक्ताचा पाझर फुटला, हा अजब प्राकार पाहून मजूर काम सोडून पळून गेले, सरदार पानासेंच्या कानावर ही वार्ता गेली. अनेक प्रयत्न करून सुद्धा रक्ताचा पाझर काही केल्या थांबेना तेव्हा सरदार पानासेंनी जेजुरीच्या कुलस्वामी खंडेरायास नवस केला हाती घेतलेले कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे, तुझ्या नावाचा महिमा गायिन आणि आजन्म तुझी सेवा करीन' अशा रीतीने नवस बोलून जेजुरीहून आणलेला भंडार त्याठिकाणी वाहिल्यानंतर तो रक्ताचा पाझर थांबला, आणि गडाचे बांधकाम सुरळीतपणे पार पडले. सरदार पानासेंनी बोलल्याप्रमाणे गडाला "मल्हार" असे नाव दिले तर गडावर छोटे खानी मल्हारी मार्तंडाचे मंदिर बांधले. जेजुरी पासून बत्तीस किलोमीटर अंतरावर असलेला मल्हारगड सासवडच्या उत्तरेकडे आहे. सोनोरी गावातून समोरच मल्हारगड दिसतो, गावातून किल्ल्यावर जाण्यास अर्धा-पाऊण तास लागतो .सगळ्यात महत्वाचे म्हणजे गडावर फारसे लोक किंवा पर्यटक येत नाहीत. जे जातिवंत भटके आहेत त्यांचाच केवळ राबता या गडावर असतो. त्यामुळे गडाचा परिसर मात्र अगदी स्वच्छ आहे. प्लॅस्टिकच्या बाटल्या नाहीत आणि इतस्ततः फेकून दिलेले कागद आणि प्लॅस्टिकचा केर-कचराही नाही. गडावर गेल्यावर मन अगदी प्रसन्न होते. पाण्याची आणि जेवणाची सोय स्वतःच करावी लागते. गडावर पाणीही नाही आणि खायला काहीही मिळत नाही. डोंगराच्या सोंडेवरुनही गडावर प्रवेश करता येत असला तरी उजवीकडील बाजूने गेल्यास आपल्याला किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार लागते. याठिकाणी आपल्याला नैसर्गिकरित्या डोंगराला पडलेला बोगदा दिसतो त्याला सुईचे भोक (needle hole) असेही म्हणतात. पूर्वेकडच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डाव्या बाजूने पुढे गेले असता बालेकिल्ल्याच्या तटाआधी आपल्याला एका वाड्याचे अवशेष दिसतात. बाजूलाच एक विहीर आहे. बालेकिल्ल्यात प्रवेश न करता तटाच्या बाजूने पुढे गेल्यावर समोरच एक तळे लागते. किल्ल्याच्या दक्षिणेला असणारे हे तळे तटाला लागूनच असून पावसाळ्यात व हिवाळ्यात पाण्याने भरलेले असते. यातील पाणी वापरण्यास उपयुक्त असले तरी पिण्यायोग्य मात्र नाही.पुढे किल्ल्याच्या टोकावर असणा-या पश्चिम बुरुजाकडे जाताना अजून एक विहीर लागते. या विहीरीतही पाणी नाही. या बुरूजाच्या खाली एक बुजलेला
दरवाजा दिसतो. या बुरुजाकडून उजवीकडे पुढे गेल्यावर आपल्याला आणखी एक अतिशय लहान दरवाजा दिसतो. झेंडेवाडीकडून आल्यास आपण या दरवाज्यातुन किल्ल्यात प्रवेश करतो. बालेकिल्ल्यात दोन मंदिरे आहेत. यातील लहान देऊळ श्रीखंडोबाचे आणि दुसरे त्यापेक्षा थोडेसे मोठे देऊळ महादेवाचे आहे. बालेकिल्ल्याच्या उत्तरेला प्रवेशद्वार आहे. सन १७७१ - ७२ मध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात. स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके आणि त्यांच्या सहका-यांनी गनिमी काव्याने लढण्यासाठी व इंग्रजांपासून बचाव करण्यासाठी याच गडाचा आश्रय घेतला. बरेच दिवस ते किल्ल्याच्या आधाराने बचाव करू शकले होते. परंतु फितुरीचा शाप भोवला आणि इंग्रजांना कुणकुण लागलीच व गडावर साहेबी सैन्य थडकलं सुदैवाने क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके निसटून जाण्यात यशस्वी झाले या गडाचे जनक, सरदार पानसे यांच्या वाड्याचे अवशेष सोनोरी गावात पहायला मिळतात. अंबारीसह हत्ती जाऊ शकेल अशा प्रवेशद्वाराची भव्यदिव्य कमान, तटबंदीचे बुरुज, मराठा साम्राज्याच्या वैभवाची आणि सुबत्तेची साक्ष देत आजही उभे आहेत. प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस उत्तरेकडे तटबंदीला लागूनच सरदार भिवराव पानसे यांची समाधी आहे त्याच्या बाजूलाच पाण्याची मोठी पाय-यांची विहीर आहे. तटबंदीचे बुरुज, हत्ती बांधायची साखळी, वाड्यातील लक्ष्मी नारायणाचे मंदिर, विठ्ठल रुख्मिणी मंदिर प्रेक्षणीय आहे.पानसे यांचे वंशज आज तिथे राहत नाहीत, सारे जण नोकरी धंद्या निमित्त बाहेर असतात परंतु कृष्ण जन्माष्टमीचेवेळी बहुतांश इथे जमा होतात.सरदार पानसे यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची, जेजुरीच्या मल्हारी मार्तंडावर अपार श्रद्धा होती. त्यापैकीच महिपतराव लक्ष्मण व रामराव लक्ष्मण पानसे या बंधूद्वयांनी मल्हारी मार्तंडाच्या चरणी एक मण वजनाचा खंडा आणि
ढाल वाहिलेली आहे ते आपणांस जेजुरगड मंदिरामध्ये पहावयास मिळते.

श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यात्रा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली आहे याची सर्व भाविक ...
04/26/2021

श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यात्रा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली आहे याची सर्व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी

मराठ्यांची लढाऊ तुकडी बाजूला झाली आणि ताज्या दमाची एक तुकडी संथ चालत पुढे आली. त्या तुकडीत मध्यभागी एक रुबाबदार आणि धिप्...
02/26/2021

मराठ्यांची लढाऊ तुकडी बाजूला झाली आणि ताज्या दमाची एक तुकडी संथ चालत पुढे आली. त्या तुकडीत मध्यभागी एक रुबाबदार आणि धिप्पाड गडी घोड्यावर आऊट होता. त्याने अंगावर चिलखत चढवले होते. डोक्यावर मराठा पद्धतीची दोन बाजूंना निमूळती लांब पगडी, पगडीच्या एका बाजूला मोत्यांची माळ आणि मधोमध लाल खड़ा असलेले खोवलेले सोन्याचे पान. तो गडी शुभ्र घोड्यावर स्वार होता. पल्लेदार मिश्या, थोराड बांधा, त्याची पगडी आणि एकूण पेहराव बघून तो बहुदा म्होरक्या असावा असा अंदाज येत होता. एका जागेवरून जवळच्या सरदारांना तो कुठून जाऊन कोणी हल्ला करायचा, याच्या सूचना देत होता. शहजादा कामबक्षने त्याला दुरून पाहिले. तो मराठ्यांचा कुणीतरी मुख्य सेनापती असावा, हे त्याने ताडले. त्याच्याकडे पाहत शेजारी उभ्या एका शिपायाला त्याने विचारले,

"वह कौन है?' त्यावर तो शिपाई म्हणाला,

"मराठोंका सिपहसालार धनाजी जाधव, हुजूर!

धनाजी जाधव हे नाव ऐकून कामबक्षच्या हातांची बोटे गार पडली. डोळे मोठे झाले. 'क्या? भयमिश्रीत आश्चर्याने तो जवळजळ ओरडलाच. गडबडीत त्याने घोड्याला टाच दिली आणि तिथून निघून भरधाव वेगाने छावणीकडे पळू लागला. इतका वेळ पळणारे सैन्य तो थांबवत होता. पण आता त्यांना थांबवण्याऐवजी 'भागो, अपनी जान बचाओ।' असे सांगत स्वतः तिथून माघार घेऊ लागला. खुद्द शहजादा माघार घेतोय हे बघून जे काही बाकीचे लढणारे सैन्य होते ते सुद्धा पा लागले. रक्ताच्या चिखलातून मेलेली माणसे मोगलांनी रणांगणातून माघार घेतल्यावर दरवाजा मोकळा झाला. तुडवत मोगल जीवानिशी धावू लागले.

पुस्तकाचे नाव : मुकद्दर - कथा औरंगजेबाची
लेखक : स्वप्नील रामदास कोलते
पुस्तकाची पाने : २४३
पुस्तक किंमत : ३००
प्रकाशक : न्यू इरा पब्लिशिंग हाऊस

हे पुस्तक व्हाट्सअँप किंवा कॉलवरून
मागविण्यासाठी संपर्क
सिद्धार्थ संगीता शेलार
: 9921982828

#मुकद्दर

Address

Saswad-Supa Road
Sacramento, CA
412104

Telephone

+19168913095

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Siddheshwar Tempale Naigaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share