25/08/2023
खबरदार…ग्रामीण भागात अवास्तव लोडशेडीग कराल तर…तात्काळ विज पुरवठा सुरळीत करा शेतकरी सर्व सामान्य जनतेला वेठीस धरु नका
खा हेमंत अप्पा गोडसे
खासदार हेमत गोडसे व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर
अन्यथा… शिवसेना स्टाईलने आंदोलन
गणेश कदम सहसंपर्क प्रमुख
अनिल ढिकले जिल्हाप्रमुख
विदूत भवन नाशिक रोड येथे महावितरण अधिकारी यांच्या सोबत खा हेमंत अप्पा गोडसे यांच्या नेत्रुत्वाखाली ग्रामीण भागातील लोडशेडीगमुळे पिके अंधारमय झाले असुन बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी,नागरीक त्रस्त झाले असुन भितीचे वातावर निर्माण झाले रात्रीच्या वेळी लोडशेडिग होणार नाही यासाठी ठोस उपाययोजना करा असे निर्देश खा हेमंत गोडसे यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना दिला
रात्रीच्या वेळी तासनतास लोडशेडिंग होत असल्याने शेतकरी नागरीकामध्ये प्रचंड संताप असुन कारवाई न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा सहसंपर्क प्रमुख गणेश कदम जिल्हाप्रमुख
अनिल ढिकले यांनी दिला
या बैठकीला मा आमदार काशिनाथ मेंगाळ, जिल्हा संघटक योगेश म्हस्के ,मा आमदार पांडुरंग गांगड, इगतपुरी तालुका प्रमुख संपत काळे, सय्यद पिप्री सरपंच भाऊसाहेब ढिकले, कैलास पोटींदे, निलेश पेखळे आकाश आहेर यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते