20/11/2025
कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा येथे पी एम किसान निधीची २१वी किस्त वितरण सोहळा थेट प्रक्षेपण व मार्गदर्शन आयोजित करण्यात आले. याप्रसंगी मा प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेचे महत्त्व अधोरेखित केले. ही योजना केवळ आर्थिक मदत नसून, शेतकऱ्यांच्या कष्टाचा सन्मान असे संबोधले. त्यांनी केवळ आर्थिक मदतीवरच नव्हे, तर कृषी क्षेत्रातील भविष्यातील बदलांवर आणि नैसर्गिक शेतीच्या महत्त्वावर अधिक भर दिला. वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ जीवन कतोरे यांच्या अधिपत्याखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
तांत्रिक सत्रा दरम्यान डॉ रुपेश झाडोदे यांनीचना पीक लागवड व खत व्यवस्थापन विषयी तर डॉ निलेश वझीरे यांनी रबी पिकातील कीड व रोग नियंत्रण या विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. प्रेरणा धुमाळ यांनी मशरूम उत्पादन तंत्रज्ञान विषयी तसेच डॉ सविता पवार यांनी शेतमाल प्रक्रिया उद्योग विषयी विस्तृत माहिती दिली. सदर कार्यक्रमाकरिता सेवाग्राम, तळेगाव, दिघी, बोपापूर, चिखली, अडेगाव, नंदोरी, सालोड, सोनेगाव बाई, गौळ येथील शेतकरी बंधू व भगिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार डॉ अंकिता अंगाईतकर यांनी मानले. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनाकरिता कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा, येथील कु. पायल उजाडे, श्री किशोर सोळंके, कु. वैशाली सावके, समीर शेख, गजेंद्र मानकर, वसीम खान, दिनेश चराटे, माधुरी डफाडे, किशोर उगलमुगले, गणेश वायरे, रूतुजा कोरडे, वैभव चौधरी यांनी योगदान दिले.