31/10/2025
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा मा.श्री.ना.चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते महाराष्ट्राच्या औद्योगिक, व्यापारी आणि कृषी क्षेत्राला नवे बळ देणाऱ्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रिकल्चर (MACCIA) या राज्यस्तरीय अग्रगण्य संस्थेचे मा.श्री.रवींद्रजी माणगांवे यांचा नव-नियुक्त अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार सोहळा हॉटेल ककून, सांगली येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्यास उपस्थित राहून श्री.रविंद्रजीना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संपूर्ण महाराष्ट्रातील व्यापार, उद्योग आणि शेती क्षेत्राला एकत्र आणून, “आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक प्रगती” या ध्येयाने MACCIA नव्या उंचीवर नेईल,असा विश्वास या कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आला.
यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, दीपक बाबा शिंदे-म्हैशाळकर, नीताताई केळकर,भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, प्रकाश ढंग,रावसाहेब पाटील, भालचंद्र पाटील,चेअरमन,ट्रस्ट बोर्ड MACCIA आशिष पेडणेकर, उपाध्यक्ष करुणाकरन शेट्टी, महा.उपाध्यक्ष रमाकांत मालू,गिरीष चितळे,प्रमोद चौगुले,रमेश आरवाडे, रौनक शहा,शरद नलवडे आदी सांगली जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटना,सर्व गव्हनिंग कौन्सिल आणि समिती सदस्य मान्यवर उपस्थित होते.
#महाराष्ट्रचेंबरऑफकॉमर्स #सत्कार_समारंभ Chandrakant Patil