25/03/2026
👆🚩🔥 *ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಲಿಂಗಾಯತ ಪಂಚಮಸಾಲಿ ಹಾಗೂ ಲಿಂಗಾಯತ ಉಪ ಸಮಾಜಗಳ ಮೀಸಲಾತಿಗಾಗಿ ಚಿಂತನಾ ಮಂಥನ ಸಮಾವೇಶದ ಪೂರ್ವಭಾವಿ ಸಭೆ ಸಾಂಗ್ಲಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ನೇರವರಿತು-*
ಈ ಸಭೆಯಲ್ಲಿ ರಾಜ್ಯ ಯುವ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸಂಜಯ್ ಸಾಹುಕಾರ್ , ಕೇಂದ್ರ ಕೈಗಾರಿಕಾ ನಿಗಮ ಅಧ್ಯಕ್ಷ ಡಾ. ಅರಳಿ, ಸಾಂಗ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾ ಸಂಘಟನೆಯ ಉಸ್ತುವಾರಿ ಉಮೇಶ್ ಪಾಟೀಲ್ , ಕೊಲ್ಲಾಪುರ ಸಂಘಟನೆಯ ಉಸ್ತುವಾರಿ ಕಿರಣ್ ಪಾಂಗ್ರೆ, ಸೊಲ್ಲಾಪುರ ಜಿಲ್ಲಾ ಯುವ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸುರಾಜ್ , ರೋಹನ್, ನಿತಿನ್ ಪಾಟೀಲ್ , ರಾಜು ಚೌಗಲಾ ಮೊದಲಾದವರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು.
काल आमच्या सांगली धामणी येथील निवासस्थानी परमपूज्य जगद्गुरू श्री बसव जय मृत्युंजया महास्वामीजी, प्रमुख – पंचम पंचमशाली पीठ, Kudalasangama यांचे पावन आगमन लाभले, हा आमच्या कुटुंबीयांसाठी व समस्त समाजबांधवांसाठी अविस्मरणीय आणि परमभाग्याचा क्षण ठरला.
महाराजांचे विधिवत स्वागत करून पाद्यपूजन करण्याचा सन्मान आम्हाला लाभला. त्यांच्या पवित्र दर्शनाने संपूर्ण परिसर भक्तिमय आणि उत्साहपूर्ण झाला. त्यांनी आमच्या कुटुंबातील सदस्यांना व उपस्थित समाजबांधवांना आशीर्वाद देत धर्मरक्षणाची प्रेरणा दिली तसेच जगद्गुरु महात्मा Basavanna यांच्या समता, न्याय आणि कर्मयोगाच्या विचारांची पताका दृढपणे पुढे नेत असल्याचे प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कर्नाटक राज्यात पंचमशाली समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी व आरक्षण हक्कांसाठी त्यांनी उभारलेले प्रभावी आंदोलन आणि समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेले अथक प्रयत्न पाहून आम्ही सर्वजण भारावून गेलो. धर्म व समाजरक्षणासाठी त्यांची संवेदनशीलता, कृतज्ञता आणि संघर्षशील नेतृत्व आम्हाला प्रेरणादायी वाटले. बसवेश्वर महाराजांच्या विचारांचा वसा खांद्यावर घेऊन ते ज्या सामर्थ्याने लढत आहेत, त्यातून आम्हालाही समाजकार्यासाठी नवी दिशा मिळाली.
महाराष्ट्रातील तमाम लिंगायत बांधवांच्या हक्कांसाठी आणि समाजहितासाठी शासनाच्या विविध विभागांमार्फत जे काही न्याय्य लाभ मिळवून द्यायचे आहेत, त्यासाठी आम्ही सदैव त्यांच्या विचारांशी निष्ठावंत राहून समाजकार्य करण्यास कटिबद्ध आहोत.
हा पवित्र योग घडवून आणण्यासाठी आमचे सन्मित्र किरण तांबिरे व राजू चौगुले यांचे मनःपूर्वक आभार. तसेच नूतन नगरसेवक म्हणून निवड झाल्याबद्दल सन्मानित झालेले सन्मित्र संजयजी तेलनाडे यांचेही अभिनंदन व शुभेच्छा. अल्पावधीत सूचना देऊनही आवर्जून उपस्थित राहिलेल्या सर्व समाजबांधवांचे मनःपूर्वक आभार.
कालचा हा कार्यक्रम अत्यंत भक्तिमय, प्रेरणादायी आणि समाजएकतेचा संदेश देणारा ठरला. अशा दिव्य क्षणांचे साक्षीदार होण्याचे भाग्य आम्हाला लाभले, याबद्दल आम्ही स्वतःला खरोखरच धन्य समजतो. 🙏