04/03/2026
पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आज (दि.५)
छत्रपती संभाजीनगर, दि.४(जिमाका)- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व देवगिरी औद्योगीक प्रशिक्षण संस्था, स्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा गुरुवार दि.५ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
यामेळाव्यात छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. टोयोटा किर्लोस्कर मोटर, बीजी-ली-ईन इलेक्ट्रिकल्स लि.,औरंगाबाद ॲटो ॲसिलरी, लिभेर अप्लायसेंन्स इंडिया प्रा.लि. शेंद्रा, वार्नर इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मेटलमन ऑटो प्रा.लि., रॅडिको एन व्ही डिस्टीलरीज महाराष्ट्र लि., युवान इलेक्ट्रीकल सिस्टीम प्रा.लि, रत्नप्रभा मोटर्स प्रा.लि., नेक्सलॅड कंन्सल्टींग एल एल पी, चैतन्य इंडिया फिन क्रेडिट प्रा.लि ,एस एस कंट्रोल प्रा.लि., डिस्टील एज्युकेशन ॲड टेक्नॉलॉजी प्रा.लि. (एथर एनर्जी लि.), सुदर्शन सौर शक्ती प्रा.लि., श्री समर्थ प्लाय, अशा विविध १६ आस्थापना कडून ८०० रिक्तपदे प्राप्त झालेली असून ते प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखत घेणार आहे. त्यासाठी कोणत्याही शाखेची पदवी, इंजिनीअरींग, डिप्लोमा, आय टी आय, एच एस सी, एस एस सी उतीर्ण इत्यादी पात्रताधारक युवक युवतींसाठी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध रिक्तपदांना एम्प्लॉयमेंट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी युजरआयडी व पासवर्ड ने लॉग इन होऊन ऑनलाईन अप्लाय करावे किंवा बायोडाटाच्या १६ प्रती घेऊन प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
संकेतस्थळावर नोंदणी करताना अथवा रिक्तपदांसाठी अर्ज करताना काही अडचण आल्यास कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक ०२४०-२९५४८५९ वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. गुरुवार दि.५ रोजी सकाळी साडेनऊ वाजता देवगिरी औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे उपस्थित राहून पात्रतेप्रमाणे विविध नियोक्त्यांकडे मुलाखती देवून रोजगार संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त रा. नि. वाकुडे यांनी केले आहे.
०००००
Overview: The Government of Maharashtra has introduced the Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana, an initiative designed to provide internship opportunities to the unemployed youth of the state. This scheme aims to enhance the employability and skill set of young individuals, preparing them for...