ZP School Marlegaon जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मार्लेगाव

  • Home
  • India
  • Umarkhed
  • ZP School Marlegaon जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मार्लेगाव

ZP School Marlegaon जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मार्लेगाव This page is dedicated for promotion of students skills through various curricular activities conduct

27/08/2024

बालगोपाळ जल्लोष

16/08/2024

🇮🇳जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मारलेगाव येथे 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी आकर्षक असे पिरॅमिड्स सादर केले 🇮🇳

शिक्षण सप्ताह चा तिसरा दिवस क्रीडा दिवस
25/07/2024

शिक्षण सप्ताह चा तिसरा दिवस क्रीडा दिवस

तिसरा दिवस क्रीडा दिवस
25/07/2024

तिसरा दिवस क्रीडा दिवस

जि.प.उ.प्राथ शाळा मार्लेगाव येथे   शिक्षण सप्ताहाचा दुसरा दिवस  मूलभूत संख्याज्ञान दृढ करण्याकरता विविध उपक्रमाचे आयोजन ...
25/07/2024

जि.प.उ.प्राथ शाळा मार्लेगाव येथे शिक्षण सप्ताहाचा दुसरा दिवस मूलभूत संख्याज्ञान दृढ करण्याकरता विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले .विद्यार्थ्यांनी गणिताच्या वेगवेगळ्या संकल्पना घेऊन आकर्षक उपयुक्त असे सुंदर मॉडेल्स तयार केले .वर्ग पहिलीतील चिमुकल्यांनी अंकांचे सुंदर असे गाणे श्रीमती जायभाये मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केले . . वर्ग सातवीतील विद्यार्थ्यांनी नी गणिती कोडे गणिती सूत्रांच्या आधारे उखाणे तसेच श्रीमती आशा लहाने मॅडम यांनी सोप्या ट्रिक वापरून पाच सेकंदात हजारापर्यंत पाढे कसे बनवायचे हे मुलांना समजावून सांगितले तसेच कुठल्याही संख्येचा वर्ग सेकंदामध्ये कसा काढायचा या सोप्या ट्रिक मुलांना श्रीमती जायभाये मॅडम, पवार सर , केंद्रे सर ,जाधव सर यांनी मुलांना शिकवल्या.....श्री रोकडे सर यांनी देखील गणिताच्या छोट्या छोट्या ट्रिक्स मुलांना स्पर्धा परीक्षांमध्ये कशा प्रकारे उपयोगी येतील या समजावून सांगितल्या अतिशय उपयुक्त व सोप्या ट्रिक्स शिकून मुले खूप आनंदी झाले अशाप्रकारे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षण सप्ताहातील दुसरा दिवस पार पडला💐💐🙏🙏

*राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण देशामध्ये दिनांक 22 जुलै ते 28 जुलै 2024 दरम्यान "...
25/07/2024

*राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण देशामध्ये दिनांक 22 जुलै ते 28 जुलै 2024 दरम्यान "शिक्षण सप्ताह" आयोजित करण्यात येत आहे...त्या अंतर्गत आज जि.प.केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा-मार्लेगाव येथे 22 जुलै रोजी शिक्षण सप्ताहा चा पहिला दिवस अध्ययन-अध्यापन साहित्य निर्मिती व वापराच्या विषयी ओळख करून देण्यात आली....श्रीमती आशा लहाने मॅडम व श्री राहुल रोकडे सर यांनी भाषा व गणित विषयाच्या या अध्यापन साहित्याची सर्व विद्यार्थ्यांना सविस्तर अशी माहिती दिली...विद्यार्थ्यांनी त्यास भरभरून प्रतिसाद दिला* 🌹🌹

आज दिनांक 30 जून शाळेचा शुभारंभ व प्रवेशोत्सव कार्यक्रम मार्लेगाव शाळेत अतिशय जल्लोषात संपन्न झाला. या दिनी आषाढी एकादशी...
30/06/2023

आज दिनांक 30 जून शाळेचा शुभारंभ व प्रवेशोत्सव कार्यक्रम मार्लेगाव शाळेत अतिशय जल्लोषात संपन्न झाला. या दिनी आषाढी एकादशीच्या औचित्य साधून वारीचा सुंदर देखावा विद्यार्थ्यांनी सादर केला . वारीमध्ये खेळण्यात येणारे पारंपारिक खेळ फुगडी झिम्मा विद्यार्थ्यांनी जल्लोषात खेळून दाखवले. अशाप्रकारे महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा व परंपरा पुढचा पिढीला देण्याचा व जपण्याचा एक छोटासा प्रयत्न शाळेतर्फे करण्यात आला. या वारीमध्ये वर्ग पहिली मध्ये दाखल पात्र विद्यार्थ्यांना घरापासून शाळेपर्यंत सजवलेल्या कार मध्ये आणण्यात आले. शाळेच्या प्रवेशद्वारा जवळ त्यांचे औक्षण करून त्यांना फुल व चॉकलेट देऊन त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले .नंतर सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आली.तसेच शाळेच्या उच्चश्रेणी मुख्याध्यापिका सौ.आडे मॅडम त्यांचा वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या. शाळे कडून त्यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देण्यात आल्या व पुढील आयुष्य निरोगी व सुखी जावो या सदिच्छा दिल्या.मॅडमनी शाळेला सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट म्हणून दिले. त्यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी बैल गाडी पेक्षा खेड्यातील मुलांना फोर व्हीलर गाडीचे आकर्षक वाटते हि गोष्ट लक्षात घेऊन शिंदे सरांनी आपली फोर व्हीलर मुलांना आणण्यासाठी दिली, गावातील तरुण शुभम कदम ने आपले डेकोरेशन, साऊंड सिस्टीम ची विनामूल्य सेवा दिली. शुभम चे युवा मित्र मंडळी यांनी खुप सहकार्य केले, उपाध्यक्ष विनायक भाऊ, सर्व शिक्षक वर्गांचे सहकार्य लाभले💐💐💐

कु. पायल संजय इटकरे ही1ली ते 8वी पर्यंत आपल्या जी प मार्लेगाव शाळेत शिकली. कला शाखेत तालुक्यातील अनेक शाळेच्या विद्यार्थ...
27/05/2023

कु. पायल संजय इटकरे ही
1ली ते 8वी पर्यंत आपल्या जी प मार्लेगाव शाळेत शिकली. कला शाखेत तालुक्यातील अनेक शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असेल. त्यामधून आपल्या शाळेची मुलगी प्रथम येणे . तसेच प्रायमरी त तिला कुठलीही Tution नव्हती. केवळ आमचं मार्गदर्शन व पुढे तिची मेहनत यातून ती यशोशिखरावर पोहचली.
विद्यार्थ्याचा पाया मजबूत करण्याचं कार्य
आम्ही करत आहोत
पालकांनी यातून बोध घ्यावा
पुनश्च पूनमला पुढील
वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा💐💐💐

🎊🎊 🙏  🙏🎊🎊आज आपल्या शाळेत "राजमाता जिजाऊ जयंती" व राष्ट्रीय युवादिन निमित्ताने "विवेकानंद जयंती" साजरी करण्यात आली.या प्र...
12/01/2023

🎊🎊 🙏 🙏🎊🎊

आज आपल्या शाळेत "राजमाता जिजाऊ जयंती" व राष्ट्रीय युवादिन निमित्ताने "विवेकानंद जयंती" साजरी करण्यात आली.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी जिजाऊ व विवेकानंदाची वेशभूषा परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. 💐💐

🎊🎊🎊  🎊🎊🎊🎉 आपल्या जिल्हा परिषद मार्लेगाव शाळेची हुशार विद्यार्थीनी🎊 कु.प्रांजली विपुलराव शिंदे  (वर्ग सातवा)🎊हिने मा. खास...
12/01/2023

🎊🎊🎊 🎊🎊🎊

🎉 आपल्या जिल्हा परिषद मार्लेगाव शाळेची हुशार विद्यार्थीनी

🎊 कु.प्रांजली विपुलराव शिंदे (वर्ग सातवा)🎊

हिने मा. खासदार हेमंत पाटील ह्यांच्या वाढदिवस निमित्ताने घेतलेल्या पंचायत समिती उमरखेड तालुकास्तरीय ✒️निबंध स्पर्धेत संपूर्ण तालुक्यातून 🏆''द्वितीय क्रमांक'' पटकावून शाळेचा व गावाचा नावलौकिक वाढवला.

तिला पारितोषिक रूपाने रुपये दोन हजार देऊन सन्मानित करणात येणार आहे.

हि स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मा.गटशिक्षणाधिकारी श्री. दर्शनवाड साहेब ह्यांचे मार्गदर्शन लाभले.

कु.प्रांजली हिच्या भावी शैक्षणिक उज्वल यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व शुभआशीर्वाद.💐💐💐

👏🏻- मुख्यध्यापिका आडे मॅडम, व स.शिक्षीका जाधव मॅडम व समस्त शिक्षकवृंद शाळा मार्लेगाव.


💐💐💐 💐💐💐🎉 आपल्या मार्लेगाव शाळेची ✨ कु. दुर्गा अशोकराव शिंदे ✨हिने माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत संपूर्ण जिल्ह्यातुन 🏆सहा...
06/01/2023

💐💐💐 💐💐💐

🎉 आपल्या मार्लेगाव शाळेची

✨ कु. दुर्गा अशोकराव शिंदे ✨

हिने माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत संपूर्ण जिल्ह्यातुन 🏆सहावा क्रमांक पटकावून शाळेचा व गावाचा नावलौकिक वाढवला,

तिच्या भावी उज्वल यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व आशीर्वाद.💐💐💐

👏🏻-मुख्यध्यापिका व समस्त शिक्षकवृंद शाळा मार्लेगाव

Address

Umarkhed
445206

Alerts

Be the first to know and let us send you an email when ZP School Marlegaon जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मार्लेगाव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share