Veer maharashtra news वीर महाराष्ट्र न्युज

  • Home
  • India
  • Tuljapur
  • Veer maharashtra news वीर महाराष्ट्र न्युज

Veer maharashtra news वीर महाराष्ट्र न्युज veermaharashtranews.in

उस्मानाबाद-लातूर-बीड विधान परिषद निवडणुक 2026शेवटच्या दिवशी उमेदवारी मागे घेतलेले उमेदवार1.महालिंगे मिलिंद गणपती,चाकूर- ...
04/06/2026

उस्मानाबाद-लातूर-बीड विधान परिषद निवडणुक 2026

शेवटच्या दिवशी उमेदवारी मागे घेतलेले उमेदवार

1.महालिंगे मिलिंद गणपती,चाकूर- अपक्ष
2.अर्चना विनोद गंगणे,तुळजापूर - अपक्ष
3.शरद रामभाऊ यादव, माजलगाव- अपक्ष
4.अहमदखान सय्यद नूर राज सय्यद,माजलगाव- अपक्ष
5.संजय पांडुरंगजी मुंदडा,कळंब- अपक्ष
6.सचिन भारतराव पवार,धाराशिव- अपक्ष
7.सहालबिन आमेर चाऊस, माजलगाव - अपक्ष

#वीरमहाराष्ट्रन्यूज

व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला यश; नगराध्यक्षांच्या मध्यस्थीनंतर तोडगामहाद्वार परिसरातील दुकानदारांना एक फूट फुटपाथ व तीन फूट...
03/06/2026

व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला यश; नगराध्यक्षांच्या मध्यस्थीनंतर तोडगा

महाद्वार परिसरातील दुकानदारांना एक फूट फुटपाथ व तीन फूट सायवानची परवानगी देण्याचे आश्वासन

प्रतिनिधी : जुबेर शेख

तुळजापूर : तुळजापूर शहरातील महाद्वार परिसरात अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे नाराज झालेल्या व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या मध्यस्थीने आणि मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेनंतर व्यापाऱ्यांच्या काही प्रमुख मागण्यांवर सकारात्मक तोडगा निघाला असून दुकानदारांना एक फूट फुटपाथ व तीन फूट सायवान वापरण्याची परवानगी देण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि साडेतीन शक्तीपीठांपैकी पूर्ण शक्तीपीठ असलेल्या आई तुळजाभवानीच्या पवित्र नगरीत काही आठवड्यांपूर्वी नगरपरिषदेने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली होती. या मोहिमेमुळे महाद्वार चौक व परिसरातील रस्ते आणि सार्वजनिक जागा मोकळ्या झाल्या असल्या, तरी अनेक लहान-मोठ्या व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर त्याचा प्रतिकूल परिणाम झाल्याची भावना व्यापारी वर्गात निर्माण झाली होती.

दरम्यान, पावसाळा जवळ येत असल्याने दुकानाबाहेर ठेवण्यात येणारा माल सुरक्षित ठेवणे, ग्राहकांना संरक्षण मिळणे आणि व्यवसाय सुरळीत चालविणे या दृष्टीने व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे तीन फूट फुटपाथ व पाच फूट सायवान वापरण्याची मागणी केली होती. मात्र या मागणीवर तत्काळ निर्णय न झाल्याने भवानी रोड आणि महाद्वार रोड परिसरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून आंदोलन सुरू केले.

आंदोलनादरम्यान व्यापाऱ्यांनी आणखी एक महत्त्वाची मागणी पुढे केली. मंदिर संस्थानमार्फत बंद करण्यात आलेला महाद्वार मार्ग पूर्ववत सुरू करून भाविकांना त्या मार्गाने प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात आली. भाविकांची वर्दळ वाढल्यास स्थानिक व्यवसायांनाही चालना मिळेल, असा व्यापाऱ्यांचा दावा होता.

दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी आंदोलनस्थळी भेट देत व्यापाऱ्यांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांच्या अडचणी आणि मागण्या समजून घेतल्या. त्यानंतर त्यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून विषयाची माहिती दिली. मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली.

चर्चेनंतर व्यापाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानुसार व्यापाऱ्यांना एक फूट फुटपाथ आणि तीन फूट सायवान वापरण्याची परवानगी देण्याचे आश्वासन देण्यात आले. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

या निर्णयामुळे व्यापारी आणि प्रशासन यांच्यातील तणाव निवळला असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. तसेच भविष्यात शहरातील वाहतूक व्यवस्था, भाविकांची सोय आणि व्यापाऱ्यांचे हित यांचा समतोल साधत निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

#तुळजापूर

#आईतुळजाभवानी
#महाद्वार
#व्यापारीआंदोलन
#व्यापाऱ्यांनाआश्वासन
#नगरपरिषदतुळजापूर
#विनोदगंगणे
#अजिंक्यरणदिवे
#राणाजगजितसिंहपाटील
#अतिक्रमणहटावमोहीम
#महाद्वारचौक
#भवानीरोड
#स्थानिकबातम्या
#धाराशिव




#वीरमहाराष्ट्रन्यूज

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीरराज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफी...
02/06/2026

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर

राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50 हजारांचे प्रोत्साहन

प्रतिनिधी : जुबेर शेख

मुंबई : महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026" जाहीर केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झालेल्या या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार असून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे.

राज्यातील शेतकरी वारंवार नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट यांसारख्या संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडत असल्याने त्यांच्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 आणि महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 राबविण्यात आली होती.

1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची 30 सप्टेंबर 2025 रोजी थकबाकी असलेली व 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली कर्जे या योजनेस पात्र ठरणार आहेत. अशा शेतकऱ्यांना मुद्दल व व्याजासह एकत्रित थकबाकीच्या रकमेपैकी कमाल 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे.

2022-23, 2023-24 आणि 2024-25 या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांत पीक कर्ज वेळेत फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. तसेच कमी रकमेचे कर्ज वेळेत फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाही किमान 5 हजार रुपये किंवा प्रत्यक्ष फेडलेल्या रकमेइतका लाभ मिळणार आहे.

ज्या शेतकऱ्यांची थकबाकी 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना अतिरिक्त रक्कम भरल्यानंतर "एकवेळ समझोता योजना" (OTS) अंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंतचा लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

माजी व विद्यमान मंत्री, खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य, 25 हजार रुपयांपेक्षा जास्त वेतन घेणारे सरकारी अधिकारी-कर्मचारी, आयकर भरणारे व्यक्ती, 25 हजार रुपयांपेक्षा जास्त निवृत्तीवेतन घेणारे नागरिक तसेच काही सहकारी संस्थांचे पदाधिकारी या योजनेस अपात्र असतील.

योजनेची संपूर्ण अंमलबजावणी ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असून लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी बंधनकारक असेल. योजनेच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात येणार आहे.

राज्यातील लाखो शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करून शेती क्षेत्राला आर्थिक बळकटी देण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत असून, कर्जबाजारीपणाच्या दुष्टचक्रातून शेतकऱ्यांची कायमस्वरूपी सुटका करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनाही राबविण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

#पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर
#शेतकरीकर्जमुक्तीयोजना2026
#कर्जमाफी
#महाराष्ट्रशासन
#शेतकरीहित
#कृषीबातम्या
#महाराष्ट्रन्यूज







#वीरमहाराष्ट्रन्यूज



माजी नगराध्यक्ष अर्चना विनोद (पिंटू) गंगणे यांचा उमेदवारी अर्ज वैध; विधान परिषद निवडणुकीत राजकीय चर्चांना उधाणअर्चना गंग...
02/06/2026

माजी नगराध्यक्ष अर्चना विनोद (पिंटू) गंगणे यांचा उमेदवारी अर्ज वैध; विधान परिषद निवडणुकीत राजकीय चर्चांना उधाण

अर्चना गंगणे यांचा अर्ज वैध; विधान परिषद निवडणुकीत नवा राजकीय ट्विस्ट!

प्रतिनिधी : जुबेर शेख

तुळजापूर : उस्मानाबाद–बीड–लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी घडलेल्या एका महत्त्वाच्या राजकीय घडामोडीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तुळजापूर नगर परिषदचे नगराध्यक्ष विनोद (पिंटू) गंगणे यांच्या पत्नी तसेच माजी नगराध्यक्ष अर्चना विनोद (पिंटू) गंगणे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांचा अर्ज छाननी प्रक्रियेत वैध ठरला आहे.

महायुतीकडून या मतदारसंघासाठी बसवराज पाटील यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपशी संबंधित मानल्या जाणाऱ्या गंगणे कुटुंबाकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने विविध राजकीय तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. या निर्णयामागील राजकीय भूमिका काय असणार, याबाबत स्थानिक राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

मंगळवारी झालेल्या अर्ज छाननी प्रक्रियेत एकूण 9 उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे सर्व 9 उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याने निवडणुकीची रंगत आणखी वाढली आहे.

दरम्यान, ४ जून ही उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत कोणते उमेदवार आपला अर्ज मागे घेतात आणि अंतिम लढतीत कोण उमेदवार कायम राहतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उमेदवारी माघारीनंतरच निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार असून मतदारसंघातील राजकीय समीकरणांमध्ये कोणते बदल होतात, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

अर्चना गंगणे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे निवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण झाला असून आगामी काळात या निर्णयाचा राजकीय परिणाम काय होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

#धाराशिव #तुळजापूर #विधानपरिषदनिवडणूक #राजकारण #वीरमहाराष्ट्रन्यूज

महाविकास आघाडी कडून महेश देशमुख रिंगणात; विधान परिषदेची महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील व महेश देशमुख यांच्यात होणार लढत ...
02/06/2026

महाविकास आघाडी कडून महेश देशमुख रिंगणात; विधान परिषदेची महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील व महेश देशमुख यांच्यात होणार लढत

सा. नेक्स्ट फ्रेम मध्ये बातमी प्रकाशित.

#साप्ताहिक_नेक्स्ट_फ्रेम #मराठी_बातम्या #ताज्या_बातम्या #राजकारण #महाराष्ट्र #धाराशिव #उस्मानाबाद #लातूर #बीड

माजी मंत्री तथा माजी खासदार डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मनोगत शिनगारे यांचा विशेष अग्रलेखसा. नेक्स्ट फ...
02/06/2026

माजी मंत्री तथा माजी खासदार डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मनोगत शिनगारे यांचा विशेष अग्रलेख

सा. नेक्स्ट फ्रेम मध्ये बातमी प्रकाशित.

#साप्ताहिक_नेक्स्ट_फ्रेम #मराठी_बातम्या #ताज्या_बातम्या #राजकारण #महाराष्ट्र #धाराशिव #उस्मानाबाद #लातूर #बीड

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची शिवसेनेच्या वतीने जयंती साजरी सा. नेक्स्ट फ्रेम मध्ये बातमी प्रकाशित.   #साप्ताहिक_नेक्स...
02/06/2026

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची शिवसेनेच्या वतीने जयंती साजरी

सा. नेक्स्ट फ्रेम मध्ये बातमी प्रकाशित.

#साप्ताहिक_नेक्स्ट_फ्रेम #मराठी_बातम्या #ताज्या_बातम्या #राजकारण #महाराष्ट्र #धाराशिव #उस्मानाबाद #लातूर #बीड

माजी मंत्री तथा माजी खासदार डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष आग्रह सा. नेक्स्ट फ्रेम मध्ये बातमी प्रक...
02/06/2026

माजी मंत्री तथा माजी खासदार डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष आग्रह

सा. नेक्स्ट फ्रेम मध्ये बातमी प्रकाशित.

#साप्ताहिक_नेक्स्ट_फ्रेम #मराठी_बातम्या #ताज्या_बातम्या #राजकारण #महाराष्ट्र #धाराशिव #उस्मानाबाद #लातूर #बीड

तुळजापुरात चित्रपट निर्माते शालिनीताई राठोड यांचा सन्मान सा. नेक्स्ट फ्रेम मध्ये बातमी प्रकाशित.   #साप्ताहिक_नेक्स्ट_फ्...
02/06/2026

तुळजापुरात चित्रपट निर्माते शालिनीताई राठोड यांचा सन्मान

सा. नेक्स्ट फ्रेम मध्ये बातमी प्रकाशित.

#साप्ताहिक_नेक्स्ट_फ्रेम #मराठी_बातम्या #ताज्या_बातम्या #राजकारण #महाराष्ट्र #धाराशिव #उस्मानाबाद #लातूर #बीड

राज्यात 20 जून पासून विशेष सखोल मतदान पुनरीक्षण ; 9.86 कोटी मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी सा. नेक्स्ट फ्रेम मध्ये बातमी प्...
02/06/2026

राज्यात 20 जून पासून विशेष सखोल मतदान पुनरीक्षण ; 9.86 कोटी मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी

सा. नेक्स्ट फ्रेम मध्ये बातमी प्रकाशित.

#साप्ताहिक_नेक्स्ट_फ्रेम #मराठी_बातम्या #ताज्या_बातम्या #राजकारण #महाराष्ट्र #धाराशिव #उस्मानाबाद #लातूर #बीड

Address

Raje Sambhaji Nagar
Tuljapur
413601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Veer maharashtra news वीर महाराष्ट्र न्युज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Veer maharashtra news वीर महाराष्ट्र न्युज:

Share