District Information Office Thane

District Information Office Thane Official page of District Information Office, Thane

ठाण्यात जलसंवर्धनासाठी ‘महा वॉकेथॉन’ उत्साहात संपन्नपाणी व माती वाचवण्याची उपस्थितांनी घेतली शपथ     ठाणे, दि.२१(जिमाका)...
21/08/2026

ठाण्यात जलसंवर्धनासाठी ‘महा वॉकेथॉन’ उत्साहात संपन्न

पाणी व माती वाचवण्याची उपस्थितांनी घेतली शपथ

ठाणे, दि.२१(जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आणि ‘जलसंधारण दिन’ तसेच 'जलसंधारण सप्ताह' अभियानाचा भाग म्हणून ठाणे शहरात आज ‘महा वॉकेथॉन - वॉक फॉर वॉटर’ या भव्य जनजागृती रॅलीचे अत्यंत उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आले.
‘माती वाचवा, पाणी जपा - सुरक्षित भविष्य घडवा’ आणि ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या मुख्य संकल्पनेवर आधारित असलेल्या या महा वॉकेथॉनचा शुभारंभ उपवन तलाव येथून झाला. त्यानंतर आदिवासी आश्रम क्रांतिवीर राघोजी भांगरे चौक, आदिवासी वीरांगना झलकारी बाई मार्ग, वसंत विहार फाटा मार्गे ही रॅली डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे पोहोचून संपन्न झाली. सुमारे ३ किलोमीटरच्या या पदभ्रमण मोहिमेमध्ये ठाण्यातील शेकडो नागरिक, विविध शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, तरुण वर्ग आणि शासकीय अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात वॉर्म-अप सत्राने झाली. या झुंबा व्यायाम प्रकाराचा उपस्थित सर्वांनी मनसोक्त आनंद घेतला.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले की, ठाण्यात या मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून तब्बल ६ ते ७ हजारांहून अधिक जणांनी यासाठी नोंदणी केली होती. संपूर्ण मार्गावर जलजागृतीचे माहिती फलक (फ्लेक्स) लावून नागरिकांना पाणी बचतीचा संदेश देण्यात आला. या अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या रील स्पर्धेला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याने सहभागाची मुदत वाढवण्यात आली असून, नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने रील्स तयार करून या जनजागृती चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
मृद व जलसंधारण विभाग, छत्रपती संभाजीनगरचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय देवराज यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, १५ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट या कालावधीत राबवण्यात आलेला जलसंधारण सप्ताह हा केवळ एका विभागापुरता मर्यादित न राहता लोकसहभागातून एक मोठी लोकचळवळ व्हावा, हा शासनाचा मुख्य उद्देश आहे. जनतेच्या प्रचंड उत्साहामुळे रील स्पर्धेची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले.
या महा वॉकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या स्थानिक नागरिकांनी व शिक्षकांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शासकीय तंत्रनिकेतन ठाणे येथील इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या प्राध्यापिका श्रीमती सुजाता नागरगोजे यांनी माती आणि पाणी हे मानवी जीवनाचे मूळ आधारस्तंभ असून प्रत्येकाने त्याचे नियोजनबद्ध संवर्धन केले पाहिजे, अशी भावना व्यक्त केली.
श्रीमती तरुलता धानके यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना म्हटले की, पाणी अडवा पाणी जिरवा हा संदेश प्रत्येक शेतापर्यंत, बांधापर्यंत आणि तरुणांच्या मनापर्यंत पोहोचून समृद्ध व दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडण्यास मदत होईल.
याशिवाय स्थानिक तरुण सहभागी श्री.पवन चौहान आणि श्री. धीरेंद्र चौधरी यांनी नियमित वॉकिंगचे महत्त्व अधोरेखित करत वृक्षतोड थांबवणे, झाडे जगवणे आणि पाण्याचा अपव्यय टाळणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.
या उपक्रमामध्ये जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव, ठाणे शहराचे उपमहापौर कृष्णा पाटील, अधीक्षक अभियंता सूरज शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता फरीद खान, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धीरज महांगडे, तहसिलदार सचिन चौधर, उमेश पाटील, नायब तहसिलदार दिनेश पैठणकर, गिरीश काळे, यांच्यासह जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे तसेच पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
याप्रसंगी उपस्थित सर्व नागरिक, मान्यवर व विद्यार्थ्यांनी घेतलेल्या सामूहिक मृद व जलसंधारण शपथेने झाली. यामध्ये उपस्थितांनी काळ्या मातीचे आणि पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे रक्षण करून जलसमृद्ध महाराष्ट्र घडवण्याचा आणि सुरक्षित भविष्यासाठी जलसंधारणाचे नियम दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचा दृढ संकल्प केला.
शेवटी या महा-वॉकेथॉन मधील सहभागींना लकी ड्रॉद्वारे पारितोषिके देवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.तरुलता धानके यांनी केले.

CMOMaharashtra Maharashtra DGIPR Collector Thane ZILLA PARISHAD THANE Ddikonkan Konkanbhavan

20/08/2026

शुक्रवारी 'जलसंधारण दिनी' राज्यभरात 'महा वॉकॅथॉन २०२६'चे आयोजन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नागरिकांना सहभागाचे आवाहन

ठाणे (जिमाका) : "माती वाचली तर शेती वाचेल आणि पाणी जपले तर उद्याचे भविष्य समृद्ध होईल. पाणी हा केवळ आजचा प्रश्न नसून पुढच्या पिढ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे जलसंधारणाची चळवळ ही केवळ शासनाची न राहता प्रत्येक नागरिकाची लोकचळवळ झाली पाहिजे," असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट हा दिवस राज्यभरात 'जलसंधारण दिन' म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने राज्यभरात विविध जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत.
* 'महा वॉकॅथॉन २०२६' (Walk for Water):
* दिनांक व वेळ: शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७
* स्थळ: राज्यातील सर्व जिल्ह्यांची मुख्यालये
* उद्देश: जल आणि मृद संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करणे.
* मृद व जलसंधारण 'रील चॅलेंज' स्पर्धा:
* १५ ते १९ ऑगस्ट दरम्यान माती आणि जलसंधारण या विषयावर आधारित राज्यस्तरीय रील चॅलेंज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
* या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विजेत्यांसाठी शासनामार्फत आकर्षक बक्षिसे ठेवली गेली आहेत. नागरिकांनी जाहिरातीतील QR कोड स्कॅन करून आपली नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

"पाणी अडवूया, पाणी जिरवूया" चा संकल्प
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व नागरिकांना, तरुणांना आणि शेतकऱ्यांना या उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. "चला, आज एक संकल्प करूया— पाणी अडवूया, पाणी जिरवूया आणि जलसमृद्ध, हरित व संपन्न महाराष्ट्र घडवूया," असा संदेश त्यांनी दिला.

मृद व जलसंधारण दिनानिमित्त 15 ते 21 ऑगस्टदरम्यान आयोजित ‘Reel for Soil & Water Conservation’ स्पर्धेत 15 ते 30 वयोगटातील...
18/08/2026

मृद व जलसंधारण दिनानिमित्त 15 ते 21 ऑगस्टदरम्यान आयोजित ‘Reel for Soil & Water Conservation’ स्पर्धेत 15 ते 30 वयोगटातील युवक-युवतींनी सहभागी व्हा!

मृद व जलसंधारण, पाणी बचत, वृक्षारोपण व पर्यावरण संरक्षण या विषयांवर 30 ते 60 सेकंदांची Instagram Reel तयार करून तुमच्या Public Instagram Account वर पोस्ट करा. Reel च्या सुरुवातीला उद्देश, स्वतःचे संपूर्ण नाव व जिल्ह्याचे नाव नमूद करणे, तसेच मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत Instagram Account ला Tag करून हा हॅशटॅग वापरणे अनिवार्य आहे.

सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र, तर विजेत्यांचा ‘युवा मृद-जलदूत’ म्हणून विशेष गौरव करण्यात येईल.

कॅमेरा रेडी? स्टोरी रेडी? मग आता फक्त अ‍ॅक्शन!'माती आणि पाणी' संवर्धनासाठी आजच रील करा आणि आपल्या सुरक्षित भविष्याच्या च...
18/08/2026

कॅमेरा रेडी? स्टोरी रेडी?
मग आता फक्त अ‍ॅक्शन!

'माती आणि पाणी' संवर्धनासाठी आजच रील करा आणि आपल्या सुरक्षित भविष्याच्या चळवळीत सहभागी व्हा..!

https://register.mahaevent.co.in

जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली एसआयआर (SIR) चे काम यशस्वीरित्या पूर्ण     ठाणे,दि.18(जिमाका): ...
18/08/2026

जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली एसआयआर (SIR) चे काम यशस्वीरित्या पूर्ण

ठाणे,दि.18(जिमाका): भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्हा प्रशासनाने मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) अंतर्गत नियोजित कामे अत्यंत नियोजनबद्ध रीतीने आणि शंभर टक्के यशस्वीरीत्या पूर्ण करून मोठा टप्पा गाठला आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या प्रभावी व सातत्यपूर्ण मार्गदर्शनाखाली तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांच्या वेळोवेळी मिळालेल्या सहकार्यामुळे आणि सक्रिय समन्वयामुळे हे उद्दिष्ट वेळेत साध्य झाले आहे.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी, मनपा आयुक्त, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी, सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सर्व सहायक मतदार नोंदणी अधिकारी, बीएलओ साठी नियुक्त सहाय्य्क, पर्यवेक्षक, सर्व राजकीय पक्ष प्रतिनिधी, सर्व प्रसारमाध्यम या सर्वांचे सहकार्य लाभले.
मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (BLO) अचूक व सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले होते. सर्व बीएलओंचे प्रशिक्षण वेळेत पूर्ण करून त्यांना क्षेत्रीय कामकाजासाठी सज्ज करण्यात आले. त्याचप्रमाणे सर्व मतदार यादी भागांचे ईएफ (EF) डाऊनलोड करण्याचे कामही पूर्णत्वास नेण्यात आले.
मतदार यादीनुसार नोंदणीकृत असलेल्या एकूण मतदार 74 लाख 50 हजार 515 मतदारांचे सर्वच्या सर्व 100% टक्के ईएफ (EF) मुद्रित (Print) करण्यात आले. त्यानंतर क्षेत्रीय पातळीवर बीएलओंच्या अथक परिश्रमातून ईएफ डिजिटायझेशनचे कामही प्रशासनाने जलद गतीने पूर्ण करत आतापर्यंत 45 लाख 88 हजार 756 इतके म्हणजेच 61.59% पूर्ण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण मतदार यादी भाग 6 हजार 894 होते तर एकूण बीएलओ संख्या 6 हजार 894 होती.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी संपूर्ण प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवून अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य दिशानिर्देश दिले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी विविध पथकांमध्ये सातत्यपूर्ण समन्वय राखत क्षेत्रीय अडचणी सोडवून कामाला गती दिली.
या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, बीएलओ आणि जिल्हा निवडणूक शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या सांघिक परिश्रमामुळेच हे 100% यश शक्य झाले असून, या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ठाणे जिल्हा प्रशासनाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

CMOMaharashtra Chief Electoral Officer Maharashtra Maharashtra DGIPR Collector Thane Ddikonkan Konkanbhavan DEOThane

18/08/2026
18/08/2026
Save Soil, Save Water, Secure Tomorrow!21 ऑगस्ट रोजी होणाऱ्या ‘महा वॉकेथॉन 2026 – वॉक फॉर वॉटर’मध्ये नागरिकांनी मोठ्या स...
18/08/2026

Save Soil, Save Water, Secure Tomorrow!

21 ऑगस्ट रोजी होणाऱ्या ‘महा वॉकेथॉन 2026 – वॉक फॉर वॉटर’मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हा.

सहभागी होण्यासाठी क्यूआर आधारित ऑनलाइन नोंदणी करा. सहभागी होणाऱ्या प्रत्येकास ई-प्रमाणपत्र दिले जाईल.

विशेष लेख: चला, जलयुक्त व समृद्ध महाराष्ट्रासाठी एकत्र येऊ या!   पाणी आणि माती ही केवळ निसर्गाची देणगी नसून आपल्या उद्या...
17/08/2026

विशेष लेख: चला, जलयुक्त व समृद्ध महाराष्ट्रासाठी एकत्र येऊ या!

पाणी आणि माती ही केवळ निसर्गाची देणगी नसून आपल्या उद्याच्या पिढीच्या अस्तित्वाचा भक्कम पाया आहेत. खालावलेली भूजल पातळी आणि सततची पाणीटंचाई या आव्हानांवर मात करण्यासाठी आता प्रत्येकाने घराबाहेर पडून प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आली आहे.
“पाणी अडवा, पाणी जिरवा” हा विचार केवळ घोषणा न राहता आपल्या दैनंदिन जगण्याचा भाग बनायला हवा. याच उद्देशाने राज्यात १५ ते २१ ऑगस्ट दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ आणि १५ ऑगस्ट ते २६ जानेवारी दरम्यान व्यापक ‘जलसंधारण अभियान’ राबवले जात आहे. आपल्या गावाला, शहराला आणि पर्यायाने संपूर्ण महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण सर्वांनी पुढे येऊन या महाअभियानात सक्रिय सहभाग नोंदवायचा आहे.
*२१ ऑगस्ट: महा वॉकॅथॉन – पाण्यासाठी एक पाऊल*
२१ ऑगस्ट रोजी ‘जलसंधारण दिना’निमित्त राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत “महा वॉकॅथॉन – वॉक फॉर वॉटर” चे आयोजन केले आहे. १५ वर्षे व त्यावरील प्रत्येक सुजाण नागरिकासाठी ही केवळ ३ किलोमीटरची चालण्याची स्पर्धा नसून, पाण्याचे रक्षण करण्याचा सामूहिक संकल्प आहे. या महाफेरीमध्ये सहभागी होऊन जलसंधारणाची शपथ घेऊ या आणि पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याचा संदेश घराघरात पोहोचवू या. यात सहभागी होणाऱ्या नागरिकांना टी-शर्ट, कॅप, ‘मी जलदूत’ बॅज आणि डिजिटल ई-प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे.
*युवकांसाठी डिजिटल आवाहन: रील्स स्पर्धा*
आपल्याकडील कल्पकता आणि सोशल मीडियाच्या ताकदीचा वापर निसर्गाच्या संवर्धनासाठी करण्याची मोठी संधी तरुणाईला मिळाली आहे. १५ ते ३० वर्षे वयोगटातील युवक-युवतींसाठी राज्यव्यापी ‘Reel for Soil and Water Conservation’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
• सहभाग व विषय: माती व जलसंधारण, पावसाच्या पाण्याचे संकलन, वृक्षारोपण किंवा गावातील यशस्वी जलकामे यांवर ३० ते ६० सेकंदांची प्रभावी Instagram Reel तयार करून या हॅशटॅगसह पोस्ट करायची आहे.
• आकर्षक पारितोषिके: जिल्हास्तरावर प्रथम ₹२५,०००, द्वितीय ₹१५,००० आणि तृतीय ₹१०,००० अशी रोख बक्षिसे तसेच ‘महाराष्ट्र युवा जलदूत’ सन्मानचिन्ह देऊन गौरव केला जाईल.
स्थानिक पातळीवरील लोकसहभाग आणि कृती
पाणी संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून ती प्रत्येक नागरिकाची जनचळवळ बनली पाहिजे. आपल्या परिसरातील नाला, तलाव, विहिरींची स्वच्छता करणे, ‘एक पेड माँ के नाम’ मोहिमेंतर्गत वृक्षारोपण करणे आणि घरात पाण्याचा काटकसरीने वापर करणे, ही काळाची गरज आहे.
शाळा आणि महाविद्यालयांनीही निबंध, चित्रकला स्पर्धांसोबतच ‘एक शाळा - एक शोषखड्डा’ उपक्रम राबवून या अभियानात आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि जिल्हा मृदा व जलसंधारण अधिकारी फरीद खान यांनी केले आहे.
यासाठी आपण आपली नोंदणी https://register.mahaevent.co.in/ #/register याद्वारे करू शकता. चला तर मग, "माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा" हा मूलमंत्र अंगीकारून जलसमृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी आजच कटिबद्ध होऊ या!

मनोज सुमन शिवाजी सानप
जिल्हा माहिती अधिकारी
ठाणे

17/08/2026

'MahaWalkathon - Walk for Water 2026'

माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीदिनी शुक्रवार दि. २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिनानिमित्त राज्यातील सर्व जिल्ह्यांत आयोजित करण्यात आलेल्या ‘महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर २०२६’ मध्ये सहभागी व्हा. यानिमित्त जलसंधारणाचा संदेश देणाऱ्या रिल स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी अधिकृत QR कोड स्कॅन करा. या जनजागरणात आपल्यापैकी प्रत्येकजण सहभागी होऊया... जलदूत बनून पाण्यासाठी चालूया, पाणी अडवा पाणी जिरवा या मूलमंत्राला जगवूया
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

#महावॉकेथॉन२०२६ #जलसंधारण #राज्यस्तरीयअभियान #पाणीवाचवा #पाणीअडवापाणीजिरवा #मृदवजलसंधारण #महाराष्ट्रशासन #शाश्वतविकास

Address

Thane

Alerts

Be the first to know and let us send you an email when District Information Office Thane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to District Information Office Thane:

Shortcuts

Share